एक्स्प्लोर

Nilesh Rane : चुकीला माफी नाही! हिशेब चुकता करायला मी येतोय; निलेश राणेंच्या सभेची जोरदार पोस्टरबाजी

Guhagar News : या सभेच्या निमित्ताने निलेश राणे यांची जोरदार पोस्टरबाजी करण्यात आली आहे. निलेश राणे याचे बॅनर मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण येथे लावण्यात आले आहेत. विषेश म्हणजे या बॅनरवर 'टायगर कमिंग बॅक' असंही लिहिण्यात आलं आहे.

Nilesh Rane Banner : भाजपचे (BJP) माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांची शनिवारी, 16 फेब्रुवारीला सभा होणार आहे. नितेश राणे यांची भास्कर जाधवांच्या (Bhaskar Jadhav) गुहागर (Guhagar) मतदारसंघात तळी (Tali) येथे सायंकाळी 5 वाजता जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या निमित्ताने निलेश राणे यांची जोरदार पोस्टरबाजी करण्यात आली आहे. निलेश राणे याचे बॅनर मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण येथे लावण्यात आले आहेत. विषेश म्हणजे या बॅनरवर 'टायगर कमिंग बॅक' असंही लिहिण्यात आलं आहे. निलेश राणेंचे हे बॅनर भास्कर जाधवांच्या कार्यालयाजवळ लावण्यात आले आहेत. 

निलेश राणे यांची जोरदार बॅनरबाजी

निलेश राणे यांच्या जाहीर सभेसाठी तळकोकणासह कोकणातून जवळपास साडेतीनशे कार्यकर्त्यांच्या गाड्या येणार आहेत. भास्कर जाधव आणि राणे यांच्यातील 11 वर्षापासूनचा राजकीय संघर्ष पाहायला मिळत असून हा अद्यापही कायम आहे. निलेश राणे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर उबाठाचे नेते भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर पोलिस संरक्षण वाढवण्यात आलं आहे. भास्कर जाधवांच्या गुहागर मतदारसंघात निलेश राणेंची जाहिर सभा असल्याने पोलीस प्रशासन कामाला लागलं आहे. भास्कर जाधवांनी राणे पिता-पुत्रांवर  टीकेला प्रतिउत्तर देण्यासाठी निलेश राणेंनी जाहिर सभा आयोजित केली आहे.

निलेश राणे विरुद्ध भास्कर जाधव

कोकणकरांना भास्कर जाधव आणि निलेश राणे हा संघर्ष काही वेगळा नाही. कोकणातील दोन दिग्गज नेते कोकणावरती आपापलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आपापसात लागलेली चढाओढ आणि त्यातून संघर्ष वर्षानुवर्षे चालत आलेला आहे. राणे आणि जाधव हे दोन्ही मराठा समाजाचे नेते असून राज्याचे माजी मुख्यमंत्री असलेल्या राणे आणि त्यांच्या पुत्रांना आता सिंधुदूर्गसह रत्नागिरी जिल्ह्यावरही पूर्ण वर्चस्व स्थापन करायचं असल्यानेच हा संघर्ष सुरू झाल्याचे राजकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचं मत आहे.

या संघर्षाचा इतिहास काय?

राणे यांच्या आधीच भास्कर जाधव यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली होती. ‘मातोश्री’वर तिकीट मागायला गेलो असताना पैसे मागितल्याचा घणाघाती आरोप करून जाधव यांनी शिवसेनेला रामराम ठोकून अपक्ष निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत त्यांचा केवळ काहीशे मतांनीच पराभव झाला होता. मात्र, मतदारसंघातील त्यांचे वर्चस्व हेरून शरद पवार यांनी त्यांना विधान परिषदेवर नेले. त्यानंतर निवडणुकीत ते निवडून आल्यानंतर त्यांना तात्काळ राज्यमंत्रीपदही दिले.जाधव यांना राज्यमंत्री केल्यानंतर त्यांनीही राणे यांच्याच स्टाईलमध्ये चिपळूण आणि आजूबाजूच्या परिसरावर आपले वर्चस्व स्थापन करण्यासाठी चंग बांधला. या पार्श्वभूमीवर येत्या निवडणुकांच्या निमित्ताने हा वाद अधिक चिघळला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसंABP Majha Headlines :  9 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis  : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीसRohit Pawar on Kangana Ranaut : रोहित पवारांचा कंगना रणावत यांच्यावर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
Embed widget