एक्स्प्लोर

रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम ईडीच्या ताब्यात; दापोलीमधील साई रिसॉर्टप्रकरणी कारवाई

Sadanand Kadam Detained by ED: रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना ईडीनं ताब्यात घेतलं आहे. दापोलीमधील साई रिसॉर्टप्रकरणी कारवाई केली आहे.

Sadanand Kadam Detained by ED:  रामदास कदम (Ramdas Kadam) यांचे बंधू सदानंद कदम (Sadanand Kadam) यांना ईडीनं (ED) ताब्यात घेतलं आहे. दापोलीमधील कथित साई रिसॉर्टप्रकरणी ईडीनं कारवाई केल्याची माहिती मिळत आहे. सदानंद कदम यांना घेऊन ईडीचं पथक मुंबईकडे रवाना झाल्याचीही माहिती मिळत आहे. 

उद्योजक सदानंद कदम हे रामदास कदम यांचे लहान बंधू आहे. आज त्यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. ईडीनं त्यांना ताब्यात घेतलं असून ईडीचं पथक त्यांना घेऊन मुंबईकडे रवाना झालं आहे. रत्नागिरीतील खेडमधील कुडोशी येथील सदानंद कदमांच्याच अनिकेत फार्म हाऊस येथून त्यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं आहे. दापोली तालुक्यातील मुरुड येथील कथित साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीनं कारवाई केल्याची माहिती मिळत आहे. सध्या दापोलीतील साई रिसॉर्टची सध्या मालकी सदानंद कदम यांच्याकडे आहे. सदानंद कदम हे ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांचे सख्खे लहान भाऊ आहेत. 

पाहा व्हिडीओ : Sadanand Kadam Detained by ED : रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम ईडीच्या ताब्यात

गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी उद्धव ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्यावर सातत्याने आरोप केले होते. याच साई रिसॉर्ट प्रकरणी सोमय्यांकडून सदानंद कदमांचंही नाव जोडण्यात आलं होतं. याप्रकरणी विनायक राऊतांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी एबीपी माझानं त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सांगितलं की, काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंची खेडमध्ये झालेली सभा यशस्वी होण्यामागे सदानंद कदम यांचा मोठा वाटा होता. त्यामुळेच सुडबुद्धीने ही कारवाई केल्याचं विनायक राऊतांनी म्हटलं आहे. 

कदमांवर राजकीय सूडबुद्धीनं कारवाई : संजय कदम 

सदानंद कदम यांच्यावर ईडीनं केलेल्या कारवाईचा ठाकरे गटाचे नेते संजय कदम यांच्याकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. सदानंद कदम यांच्यावरील कारवाई राजकीय सूडबुद्धीनं केली जात असल्याचा संजय कदमांचा आरोप आहे.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अविमुक्तेश्वर महाराजांकडून स्तुतीसुमने, हाती धनुष्यबाण; सांगितला CM चा वेगळाच लाँग फॉर्म
अविमुक्तेश्वर महाराजांकडून स्तुतीसुमने, हाती धनुष्यबाण; सांगितला CM चा वेगळाच लाँग फॉर्म
उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढून आमदार होऊन दाखवावे; भाजपचं चॅलेंज, फडणवीसांचा दिला दाखला
उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढून आमदार होऊन दाखवावे; भाजपचं चॅलेंज, फडणवीसांचा दिला दाखला
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
Devendra Fadnavis : 48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maratha Aandolak On Laxman Hake : पुण्यात मराठा आंदोलकांनी हाकेंना घेरलं, मद्यप्राशन केल्याचा आरोपABP Majha Headlines : 11 PM : 30 सप्टेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सBaramati Student Murder : बारामतीमध्ये दिवसाढवळ्या महाविद्यालयात विद्यार्थ्याची कोयत्याने हत्याZero Hour Israel vs lebanon : लेबनॉनवर इस्त्रायलचे हल्ले; हिजबुल्लाचा म्होरक्या हसन नसरल्लाचा खात्मा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अविमुक्तेश्वर महाराजांकडून स्तुतीसुमने, हाती धनुष्यबाण; सांगितला CM चा वेगळाच लाँग फॉर्म
अविमुक्तेश्वर महाराजांकडून स्तुतीसुमने, हाती धनुष्यबाण; सांगितला CM चा वेगळाच लाँग फॉर्म
उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढून आमदार होऊन दाखवावे; भाजपचं चॅलेंज, फडणवीसांचा दिला दाखला
उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढून आमदार होऊन दाखवावे; भाजपचं चॅलेंज, फडणवीसांचा दिला दाखला
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
Devendra Fadnavis : 48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
पुण्यात CBI ची धाड, 10 जणांना अटक; कॉल सेंटरवर छापे, लाखो रुपयांसह 3 लक्झरी कार जप्त
पुण्यात CBI ची धाड, 10 जणांना अटक; कॉल सेंटरवर छापे, लाखो रुपयांसह 3 लक्झरी कार जप्त
Supreme Court : ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
पाहुण्याला उमेदवारी नको, विपुल कदमांना रामदासभाईंचा विरोध; थेट एकनाथ शिंदेंनाच दिला इशारा
पाहुण्याला उमेदवारी नको, विपुल कदमांना रामदासभाईंचा विरोध; थेट एकनाथ शिंदेंनाच दिला इशारा
India vs Bangladesh, 2nd Test : टीम इंडियाच्या धुरंदरांनी अनिर्णित होणारी कसोटी विजयाकडे खेचली; चौथ्या दिवशी विक्रमांचा पाऊस पाडला!
टीम इंडियाच्या धुरंदरांनी अनिर्णित होणारी कसोटी विजयाकडे खेचली; चौथ्या दिवशी विक्रमांचा पाऊस पाडला!
Embed widget