एक्स्प्लोर

Ratnagiri News : उशिराने आलेला मोहर, रोगाचा प्रादुर्भाव, आता उष्माघातामुळे फळगळ; हापूस आंब्यासमोर संकटांची मालिका

Ratnagiri News : उशिराने आलेला मोहर, मग थ्रिप्स आणि तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव आणि आता उष्माघातामुळे फळगळ, यामुळे कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे.

Ratnagiri News : कोकणचा (Konkan) हापूस आंबा (Alphonso Mango) जगात प्रसिद्ध. अगदी इंग्लंडच्या राणीने देखील हापूस आंब्याची चव चाखल्यानंतर ती त्याच्या प्रेमात पडली. पण याच हापूस समोर सध्या संकटांची मालिका उभी आहे. उशिराने आलेला मोहर, मग थ्रिप्स आणि तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव आणि आता उष्माघातामुळे (Heat Stroke) फळगळ, यामुळे कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी (Farmer) हवालदिल झाला आहे. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे.

हापूस आंब्यासमोर संकटांची मालिका

लांबलेला पावसाळा आणि उशिराने सुरु झालेली थंडी यामुळे हापूस काहीसा उशिराने मोहरला. त्यानंतर देखील या मोहरावर थ्रिप्स आणि तुडतुडा या रोगाचा प्रादुर्भाव वाढला. परिणामी मोठ्या प्रमाणात औषध फवारणी करावी लागली. अशा परिस्थितीमध्ये काही प्रमाणात का असेना हापूस हाताशी लागेल अशी आशा इथल्या शेतकऱ्यांना होती. पण सध्या वातावरणात उष्मा वाढला असून त्याचा परिणाम आता हापूसवर जाणवत आहे. कारण सध्या झालेल्या फळधारणापैकी जवळपास 75 टक्के हापूस हा गळून पडत आहे. परिणामी कोकणातला शेतकरी पूर्णतः हतबल झाला आहे. अशा या परिस्थितीमध्ये तो मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता देखील आहे. त्यामुळे आता या वातावरण बदलाचा अभ्यास अभ्यासकांनी करावा आणि त्यातून किमान काय मार्ग असेल तर सुचवावा, अशी मागणी हा शेतकरी करत आहेत.

मे महिन्यात आंब्याची कमतरता भासेल : आंबा उत्पादक शेतकरी

बदलत्या हवामानामुळे (Climate Change) हापूस आंब्याला फटका बसत आहे. रोगामुळे नाईलाजाने औषधांची फवारणी करावी लागते. मार्चमध्ये लोकांकडे आंबा होता, तो जास्तीत जास्त एप्रिल महिन्याच्या 10 तारखेपर्यंत मिळेल. त्यानंतर आणि मे महिन्यात आंब्याची कमतरता भासेल. मागच्या मोहरावर अवलंबून होतो, पण त्यावरही वातावरण बदलाचा परिणाम झाला आहे. या वातावरण बदलाचा आंब्यावर होणाऱ्या परिणामांबाबत अभ्यासकांनी संशोधन करावं आणि त्यातून किमान काय मार्ग असेल तर सुचवावा, अशी प्रतिक्रिया हापूस उत्पादक शेतकरी प्रदीप सावंत यांनी दिली.

सन बर्नमुळे फळगळ

फळांचा राजा कोकणचा हापूस आंब्याला सततच्या बदलत्या वातावरणाचा फटका बसला आहे. कोकणात दिवसा तापमानात झालेल्या वाढीमुळे उष्माघाताचा फटका आंब्याला बसला आहे. बहुतांश ठिकाणी आंब्यावर डाग उठल्याने आंबे खराब होऊन गळू लागले आहेत. सन बर्न झालेले हे आंबे बागायतदारांना फेकून देण्याशिवाय पर्याय नाही.

हेही पाहा

Alphonso Mango : हापूस आंब्याला उष्माघाताचा फटका, आंब्यावर डाग उठल्याने फळगळ

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narhari Zirwal NCP: नरहरी झिरवळ अडचणीत, राष्ट्रवादी काँग्रेस कोंडीत, सुनेत्रा पवारांनी बोलवली महत्त्वाची बैठक
नरहरी झिरवळ अडचणीत, राष्ट्रवादी काँग्रेस कोंडीत, सुनेत्रा पवारांनी बोलवली महत्त्वाची बैठक
Dhananjay Munde : देवाभाऊ म्हणजे कामधेनू, त्यांना आमच्या मनातील इच्छा माहीत; धनुभाऊंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांनी डोक्यात टपली मारली
देवाभाऊ म्हणजे कामधेनू, त्यांना आमच्या मनातील इच्छा माहीत; धनुभाऊंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांनी डोक्यात टपली मारली
Ulhasnagar Crime: सावकाराची गुंडागर्दी, व्याजाचे पैसे न दिल्याने तरुणाचं अपहरण करून मारहाण, लॉजमध्ये डांबून अमानुष छळ; उल्हासनगरमध्ये चौघांविरोधात गुन्हा दाखल
सावकाराची गुंडागर्दी, व्याजाचे पैसे न दिल्याने तरुणाचं अपहरण करून मारहाण, लॉजमध्ये डांबून अमानुष छळ; उल्हासनगरमध्ये चौघांविरोधात गुन्हा दाखल
तेलंगणात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतपत्रिकेवर मतदानात काँग्रेसची त्सुनामी; भाजप, बीआरएस अन् एमआयएला धोबीपछाड, राहुल गांधी म्हणाले..
तेलंगणात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतपत्रिकेवर मतदानात काँग्रेसची त्सुनामी; भाजप, बीआरएस अन् एमआयएला धोबीपछाड, राहुल गांधी म्हणाले..

व्हिडीओ

Tipu Sultan Controversy : टीपू सुलतानवरुन वक्तव्य, सपकाळ वादात, फडणवीस आक्रमक
Mulund Metro Accident : मुलुंडमध्ये LBS रोडवर वडाळा-कासारवडवलीच्या मेट्रोच्या बांधकामाचा स्लॅब कोसळला
Ganesh Naik Vs Eknath Shinde : एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक पुन्हा वाद उफाळला
Dhananjay Munde : देवाभाऊ म्हणजे कामधेनू, त्यांना आमच्या मनातील इच्छा माहीत; धनुभाऊंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांनी डोक्यात टपली मारली
Sanjay Raut : म्हात्रोळीतील जमीन गुजराती उद्योगपतीच्या घशात घालण्यासाठी राहुल नार्वेकर गेले होते; संजय राऊतांचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narhari Zirwal NCP: नरहरी झिरवळ अडचणीत, राष्ट्रवादी काँग्रेस कोंडीत, सुनेत्रा पवारांनी बोलवली महत्त्वाची बैठक
नरहरी झिरवळ अडचणीत, राष्ट्रवादी काँग्रेस कोंडीत, सुनेत्रा पवारांनी बोलवली महत्त्वाची बैठक
Dhananjay Munde : देवाभाऊ म्हणजे कामधेनू, त्यांना आमच्या मनातील इच्छा माहीत; धनुभाऊंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांनी डोक्यात टपली मारली
देवाभाऊ म्हणजे कामधेनू, त्यांना आमच्या मनातील इच्छा माहीत; धनुभाऊंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांनी डोक्यात टपली मारली
Ulhasnagar Crime: सावकाराची गुंडागर्दी, व्याजाचे पैसे न दिल्याने तरुणाचं अपहरण करून मारहाण, लॉजमध्ये डांबून अमानुष छळ; उल्हासनगरमध्ये चौघांविरोधात गुन्हा दाखल
सावकाराची गुंडागर्दी, व्याजाचे पैसे न दिल्याने तरुणाचं अपहरण करून मारहाण, लॉजमध्ये डांबून अमानुष छळ; उल्हासनगरमध्ये चौघांविरोधात गुन्हा दाखल
तेलंगणात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतपत्रिकेवर मतदानात काँग्रेसची त्सुनामी; भाजप, बीआरएस अन् एमआयएला धोबीपछाड, राहुल गांधी म्हणाले..
तेलंगणात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतपत्रिकेवर मतदानात काँग्रेसची त्सुनामी; भाजप, बीआरएस अन् एमआयएला धोबीपछाड, राहुल गांधी म्हणाले..
वरिष्ठ पदांवर असलेल्यांनी रिटायर होताच 20 वर्ष पुस्तक लिहिण्याचा नाद अजिबात करायचा नाही! सरकार नवा आदेश जारी करणार?
वरिष्ठ पदांवर असलेल्यांनी रिटायर होताच 20 वर्ष पुस्तक लिहिण्याचा नाद अजिबात करायचा नाही! सरकार नवा आदेश जारी करणार?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? ‘सो कॉल्ड Infra Man’ फडणवीस निर्माणाधीन बांधकाम कोसळल्याची जबाबदारी घेतील का? काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल; आदित्य ठाकरेंचाही सडकून प्रहार
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? ‘सो कॉल्ड Infra Man’ फडणवीस निर्माणाधीन बांधकाम कोसळल्याची जबाबदारी घेतील का? काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल; आदित्य ठाकरेंचाही सडकून प्रहार
BBM 6 Elimination : विजेतेपदाचा दावेदारच घराबाहेर? बिग बॉस मराठी 6 मधून डबल एलिमिनेशनने धक्का, कोणाची Exit?
विजेतेपदाचा दावेदारच घराबाहेर? बिग बॉस मराठी 6 मधून डबल एलिमिनेशनने धक्का, कोणाची Exit?
Sunetra Pawar and Jayant Patil: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत मोठी अपडेट, जयंत पाटील सुनेत्रा पवारांना म्हणाले, 'मनात कोणताही किंतू बाळगू नका, काही मदत लागली तर...'
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत मोठी अपडेट, जयंत पाटील सुनेत्रा पवारांना म्हणाले, 'मनात कोणताही किंतू बाळगू नका, काही मदत लागली तर...'
Embed widget