एक्स्प्लोर
Alphonso Mango : हापूस आंब्याला उष्माघाताचा फटका, आंब्यावर डाग उठल्याने फळगळ
कोकणात दिवसा तापमानात झालेल्या वाढीमुळे उष्माघाताचा फटका आंब्याला बसला आहे. बहुतांश ठिकाणी आंब्यावर डाग उठल्याने आंबे खराब होऊन गळू लागले आहेत.
Sindhudurg Alphonso Mango
1/10

फळांचा राजा कोकणचा हापूस आंब्याला सततच्या बदलत्या वातावरणाचा फटका बसला आहे.
2/10

कोकणात दिवसा तापमानात झालेल्या वाढीमुळे उष्माघाताचा फटका आंब्याला बसला आहे.
3/10

बहुतांश ठिकाणी आंब्यावर डाग उठल्याने आंबे खराब होऊन गळू लागले आहेत.
4/10

यामुळे जगप्रसिद्ध कोकणच्या हापूसचे पहिल्या टप्प्यातील पीक धोक्यात आले आहे.
5/10

रात्री कमी होणारे तापमान आणि दिवसा अचानक वाढणारे तापमान याच्या तफावतीमुळे हा परिणाम आंब्यावर होत आहे.
6/10

सन बर्न झालेले हे आंबे बागायतदारांना फेकून देण्याशिवाय पर्याय नाही.
7/10

फळांच्या दक्षिण भागाला सन बर्न म्हणजे उष्ण तापमान सहन होत नसल्याने आंब्याची मोठी फळगळ होत आहे.
8/10

कोकण किनारपट्टी भागातील आंबा बागायदारांना याचा सर्वाधिक फटका बसला होता.
9/10

यावर्षी हापूस आंब्याचं एकूण उत्पन्न 20 टक्केच येणार असल्याची माहिती आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी दिली आहे.
10/10

दरम्यान, यंदा 90 टक्के आंबा बागा मोहरले नसल्याने कोकणच्या अर्थकारणाला मोठा फटका बसणार आहे.
Published at : 20 Feb 2023 12:52 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
रायगड
राजकारण
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
