एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Ratnagiri News: मोठी बातमी! राजापुरातील हातिवले टोलनाका बंद, मंत्री उदय सामंत यांची माहिती, स्थानिकांचा होता विरोध

Ratnagiri News: स्थानिकांच्या विरोधानंतर अखेर राजापुरातील हातिवले टोलनाका बंद करण्यात आला आहे.

Ratnagiri News:  मुंबई - गोवा महामार्गावरील राजापूर तालुक्यातील म्हणजेच रत्नागिरी (Ratanagiri) आणि सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्याच्या सीमेवरील हातिवले (Hativale Toll Naka) टोलनाका सुरू करण्यात आला होता. मात्र, स्थानिकांनी या टोलनाक्याला विरोध केला होता. त्यानंतर आज राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी हा टोलनाका बंद करत असल्याची माहिती दिली. स्थानिक लोकांचे समाधान होत नाही तोवर टोल चालू होणार नाही असेही त्यांनी म्हटले. 

हा टोलनाका मंगळवार, 11 एप्रिलपासून सुरू करण्यात आला होता.  मुंबई-गोवा महामार्गावरून (Mumbai-Goa National Highway) प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आणि सुट्टीसाठी गावी येणाऱ्या कोकणवासियांच्या खिशावर भार पडण्यास सुरुवात झाली होती. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या मार्गावर टोल वसुली करण्यास मान्यता दिल्यानंतर टोल वसुलीस सुरुवात झाली.  हातिवले टोलनाक्यावरती टोल वसुलीसाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. सिग्नल यंत्रणाही बसवण्यात आली होती. मात्र, स्थानिकांनी या टोलनाक्याला विरोध केला होता. 

काही महिन्यांपूर्वी सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी आणि स्थानिकांनी विरोध करत टोलानाका सुरू करण्याचा प्रयत्न हाणून पडला होता.  महामार्गाचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोलवसुली करून देणार नाही, अशी भूमिका सर्वपक्षीय राजकीय नेते आणि स्थानिकांनी घेतली होती. 22 डिसेंबरला राजापूरच्या हातिवले येथे टोलवसुली सुरू करण्याचा प्रयत्न झाला. माजी खासदार निलेश राणे ( Nilesh Rane) यांच्यासह सर्वपक्षीय नेते थेट टोलनाक्यावर धडकले. यावेळी त्यांनी रस्त्याचं काम पूर्ण होत नाही तोवर टोलवसुली करायला देणार नाही असा इशारा दिला होता. 

दरम्यान, मंगळवारपासून सुरू झालेल्या टोल वसुलीमुळे स्थानिकांमध्ये संताप व्यक्त केला जात होता. अखेर स्थानिकांचे टोल वसुलीच्या मुद्यावरून समाधान होईपर्यंत टोल वसुली होणार नसल्याची माहिती राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. आजपासून हातिवले टोलनाक्यावरील वसुली बंद करण्यात आली आहे. 

हातीवले टोल नाका दर किती होता?


वाहनाचा प्रकार            वनवे जर्नी   रिटर्न जर्नी      
 
कार                               90                 130
एलसीवी / एलजिवी        140               210
ट्रक, बस                        295               445
3 एक्सल                        325               485
HCM, EME                   465               695
ओव्हर साईझ एक्सल      565               850
 
 
वाहनाचा प्रकार          स्थानिक वाहन  महिना  दर    
 
कार                                45                2920
एलसीवी / एलजिवी          70                4715
ट्रक, बस                        150                9880       
3 एक्सल                        160               10775
HCM, EME                    230              15490
ओव्हर साईझ एक्सल       285              18860

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...
Maharashtra Result 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...
Maharashtra vidhansabha Election Results 2024: कोकणात राणे बंधुचा विजय, वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव; निलेश राणेंचा तब्बल 53,000 मताधिक्य
कोकणात राणे बंधुचा विजय, वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव; निलेश राणेंचा तब्बल 53,000 मताधिक्य
Maharashtra vidhansabha election results देवेंद्र फडणवीसांची हॅटट्रिक, सलग तिसऱ्यांदा शतकेपार झेंडा; भाजप विजयाचा नवा रेकॉर्ड
देवेंद्र फडणवीसांची हॅटट्रिक, सलग तिसऱ्यांदा शतकेपार झेंडा; भाजप विजयाचा नवा रेकॉर्ड
Eknath Shinde on CM: एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024Maharashtra Election Result 2024 :निवडणुकीत कोणते मुद्दे चर्चेत राहिले?Uday Tanpathakयांचं विश्लेषणMaharashtra Election Result 2024:सत्तेचा मार्ग विदर्भातून?जनता ठरवणार खरी शिवसेना, राष्ट्रवादी कोणतीMaharashtra Election Result 2024 : पहिला कल भाजपच्या बाजूने, टपाली मतमोजणी सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...
Maharashtra Result 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...
Maharashtra vidhansabha Election Results 2024: कोकणात राणे बंधुचा विजय, वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव; निलेश राणेंचा तब्बल 53,000 मताधिक्य
कोकणात राणे बंधुचा विजय, वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव; निलेश राणेंचा तब्बल 53,000 मताधिक्य
Maharashtra vidhansabha election results देवेंद्र फडणवीसांची हॅटट्रिक, सलग तिसऱ्यांदा शतकेपार झेंडा; भाजप विजयाचा नवा रेकॉर्ड
देवेंद्र फडणवीसांची हॅटट्रिक, सलग तिसऱ्यांदा शतकेपार झेंडा; भाजप विजयाचा नवा रेकॉर्ड
Eknath Shinde on CM: एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
Maharashtra vidhansabha results 2024 : परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
Sharad Pawar: राज्यात पवार पॅटर्न फेल, थोरल्या पवारांनी राज्य पिंजून काढलं पण तुतारी वाजलीच नाही
राज्यात पवार पॅटर्न फेल, थोरल्या पवारांनी राज्य पिंजून काढलं पण तुतारी वाजलीच नाही
Maharashtra Assembly Election Result : मुहायुतीची बुलेट ट्रेन सुस्साट, महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड, नियम काय सांगतो?
मुहायुतीची बुलेट ट्रेन सुस्साट, महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड, नियम काय सांगतो?
Eknath Shinde : हा विजय लाडक्या बहिणींचे प्रेम, आमच्या कामाची पोचपावती; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
हा विजय लाडक्या बहिणींचे प्रेम, आमच्या कामाची पोचपावती; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
Embed widget