(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra News : बारसू तेलशुद्धीकरण प्रकल्पाला वेग येणार, प्रकल्पावर लक्ष ठेवण्यासाठी समिती स्थापन
Maharashtra News : बारसू तेलशुद्धीकरण प्रकल्पाला वेग येणार असून प्रकल्पावर लक्ष ठेवण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि सौदी अरेबियाचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांच्यात सोमवारी यासंदर्भात सहमती झाली.
Maharashtra News : महाराष्ट्रातील राजकारण (Maharashtra Politics) ढवळून काढणाऱ्या कोकणातील बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्पाच्या (Ratnagiri Barsu Refinery Protest) कामास वेग येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि सौदी अरेबियाचे (Saudi Arabia) राजकुमार मोहम्मद बिन सलमान (Mohammed bin Salman Al Saud) यांच्यात सोमवारी यासंदर्भात सहमती झाली. सुमारे 4 लाख कोटींच्या या प्रकल्पाच्या (Barsu Refinery) कामावर देखरेख ठेवण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे भारत (India) आणि सौदीची मैत्री आणखी दृढ झाली आहे आहे, असं पंतप्रधान मोदी (PM Modi) या वेळी म्हणाले. हा प्रकल्प सौदी अरेबियाची अरमाको कंपनी, संयुक्त अरब अमिराती (United Arab Emirates) आणि भारतीय कंपन्यांच्या सहकार्याने उभारला जाणार आहे.
रत्नागिरी प्रकल्पामुळे भारत आणि सौदीची मैत्री आणखी दृढ झाली आहे आहे, असं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. हा प्रकल्प सौदी अरेबियाची अरमाको कंपनी, संयुक्त अरब अमिराती आणि भारतीय कंपन्यांच्या सहकार्याने उभारला जाणार आहे. बैठकीत हायड्रोकार्बन, संरक्षण, सेमी कंडक्टर आणि अंतराळ क्षेत्रातील सहकार्य वाढवण्याबाबतही चर्चा झाली. आगामी वर्षात सौदीर अरेबिया भारतात 8.20 लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे. एक दिवसाच्या दौऱ्यावर आलेल्या राजकुमार सलमान यांचे राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत करण्यात आले.