Uddhav Thackeray : रत्नागिरीतील तीन विधानसभा मतदारसंघात ठाकरेंची मोठी खेळी, 'या' मातब्बर नेत्यांचं तिकीट फिक्स?
Maharashtra Assembly Election 2024 : रत्नागिरी जिल्ह्यातील विधानसभेच्या जागांबाबत आता उद्धव ठाकरेंची शिवसेना अंतिम निर्णयापर्यंत आली आहे. तीन बड्या नेत्यांना उमेदवारी मिळण्याचे संकेत आहेत.
रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) आता सर्वच राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरु आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीत (Mahayuti) सध्या जागावाटपावरून चर्चा सुरु आहे. त्यातच कोकणात (Konkan) विधानसभेच्या जागा हा प्रतिष्ठेच्या होताना दिसत आहेत. रत्नागिरी (Ratnagiri News) जिल्ह्यातील विधानसभेच्या जागांबाबत आता उद्धव ठाकरेंची शिवसेना (Shiv sena UBT) अंतिम निर्णयापर्यंत आली आहे. कारण, जिल्ह्यातील पाच पैकी तीन जागांवर उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आपले उमेदवार निश्चित केल्याची माहिती मिळत आहे. त्यामध्ये गुहागर (Guhagar), राजापूर (Rajapur) आणि दापोलीच्या (Dapoli) जागेचा समावेश आहे.
यामध्ये दापोलीमधून संजय कदम (Sanjay Kadam), गुहागरमधून भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) तर राजापूरमधून राजन साळवींच्या (Rajan Salvi) नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे यांनी दोनच दिवसांपूर्वी जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. काही प्रमुख पदाधिकारी यांच्याशी देखील चर्चा करून आढावा घेतला. पण, अद्याप तरी उदय सामंत (Uday Samant) यांच्याविरोधात उमेदवार कोण? याबाबत निश्चित निर्णय झालेला नाही. मुख्यबाब म्हणजे चिपळूण विधानसभा जागेबाबत मात्र कोणतीही चर्चा या बैठकीत झालेली नाही. या चर्चेवेळी गुहागरमधून भास्कर जाधव यांच्यासोबत विक्रांत जाधव (Vikrant Jadhav) यांच्या नावाची देखील चर्चा झाल्याची माहिती देखील समोर येत आहे.
काँग्रेसला जागा ते साळवींचं कौतूक
राजापूरच्या जागेबाबत काँग्रेस (Congress) प्रचंड आग्रही आहे. सध्या या ठिकाणी राजन साळवी हे आमदार आहेत. या जागेवर काँग्रेसनं मागणी केली होती. काँग्रेसला जागा देण्याबाबत देखील या बैठकीत चर्चा झाली. पण, राजन साळवींनी कठीण काळात देखील साथ दिली. शिवाय, एसीबीसारखी चौकशी मागे लागल्यानंतर देखील राजन साळवी ठाम राहिले ते डगमगले नाहीत. त्यामुळे त्यांना डावलणे योग्य नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादीला कोणती जागा?
विधानसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी जिल्ह्यात किमान एक तरी जागा मिळावी यासाठी काँग्रेस आग्रही आहे, पूर्वीची गणितं सांगत सध्या काँग्रेस राजापूरच्या जागेवर दावा करत आहे. शिवाय, महाविकास आघाडीतील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं चिपळूणच्या जागेवर जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे आता काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला नेमक्या कोणत्या जागा मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा