एक्स्प्लोर

समुद्रातील मासे 2049 नंतर संपणार? कॅनडातील अभ्यासकाचा संशोधनाअंती धक्कादायक अहवाल

वातावरणातील बदल, प्रदूषण, लोकसंख्या वाढ आणि त्यानुसार माशांची मागणी  मासेमारीसाठी वापरल्या जात असलेल्या विविध पद्धती  यासारखे विविध कारणे मासेमारीवर परिणाम करत आहेत. 

रत्नागिरी : सध्या मासेमारीच्या (Fishing)  व्यवसायामध्ये देखील अनेक चढ-उतार पाहायला मिळत आहेत. वातावरण बदलाच्या कारणास्तव किंवा मुबलक प्रमाणात मासे मिळत नसल्याने मच्छीमार समुद्रात बोटी पाठवत नाहीत. दरम्यान काही अभ्यासकांनी 2049 नंतर मत्स्यसाठे संपण्याची शक्यता व्यक्त केली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाचा (Oxford University)  संशोधनाअंती हा निष्कर्ष आला आहे.  वातावरणातील बदल, आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने होणारी मासेमारी आणि समुद्रातील वाढतं प्रदूषण यासाठी (Pollution In Sea)  कारणीभूत असल्याचं अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.  

 मासे अनेकांच्या आवडीचे आहे.  बाजारात केल्यानंतर ताजे फडफडीत मासे घेण्यासाठी अनेकांची झुंबड उडते. काही वेळेला ताजे मासे नसल्यामुळे अनेकांची निराशा होते. काही वेळेला विविध कारणास्तव त्याचे मासे मिळण्यासाठी अडचणी येतात. बाजारामध्ये माशांची आवक देखील कमी दिसून येते.  त्यामागे विविध कारणं आहेत पण, सध्याची मासेमारीची पद्धत पाहता आणि विविध कारणांचा विचार करता 2049 पर्यंत समुद्रातील मासे संपुष्टात येतील असे गणित काही अभ्यासकांनी मांडलं.

मासेमारीच्या काही पद्धतीवर तीव्र आक्षेप

सध्याचे चित्र पाहता मासे कमी अधिक प्रमाणात मिळत असल्यास मासेमारी सांगतात. शिवाय मासेमारीच्या काही पद्धतीवरती देखील काही तीव्र आक्षेप घेतले जात आहेत. दरम्यान, वातावरणातील बदल, प्रदूषण, लोकसंख्या वाढ आणि त्यानुसार माशांची मागणी  मासेमारीसाठी वापरल्या जात असलेल्या विविध पद्धती  यासारखे विविध कारणे मासेमारीवर परिणाम करत आहेत. 

सेंट्रल मरिन फिशरी रिसर्च इन्स्टिट्यूटची आकडेवारी

सीएमएफआरआय म्हणजे सेंट्रल मरीन फिशरी रिसर्च इन्स्टिट्यूटनं दिलेल्या आकडेवारींनुसार भारतात 2018 मध्ये  3.49 मिलियन मीटर टन, 2019 मध्ये 3.56 मिलियन मेट्रिक टन, 2020 मध्ये 2.73 मिलियन मेट्रिक टन, 2021 मध्ये 3.5 मिलियन मेट्रिक टन आणि 2022 मध्ये 3.49 मिलियन मेट्रिक टन इतकी मासेमारी करण्यात आली. एकंदरीत सध्या बदलत असलेल्या वातावरणाचा समुद्राच्या पोटात घडत असलेल्या घडामोडींवर परिणाम होतो. शिवाय मासेमारीच्या काही पद्धतींवर देखील लक्षात घेतला जातो. या सर्व पार्श्वभूमीवरती साऱ्या गोष्टींचा अभ्यास करून काही बंधन देखील सरकारकडून घातली जात आहेत. त्यामुळे 2048 पर्यंत मत्स्य साठे संपुष्टात येणार का? या प्रश्नाचे उत्तर सध्या नकारात्मक असलं तरी वातावरणातले होणारे बदल आणि त्याचे परिणाम मात्र चिंताजनक आहेत.

अभ्यासकांना काय वाटते?

याबाबत आम्ही रत्नागिरी जवळील शिरगाव येथे मत्स्य विद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून असलेल्या डॉक्टर स्वप्नाच्या मोहिते यांना विचारले.'' दरम्यान बोरीस वॉम यांनी 2006 पर्यंतच्या मासेमारीच्या आकडेवारीचा विचार करून एक गणित मांडलं. त्या गणिताच्या आधारे त्यांनी ही भीती व्यक्त केली होती. पण प्रत्यक्षात बोरीस यांनी 2021 मध्ये पुन्हा एकदा अभ्यास केला. त्यावेळी त्यांनी आपल्या पहिल्या विधानापासून फारकत घेतल्याचं दिसून येतं. वास्तवामध्ये अशा प्रकारे मासे संपणं शक्य नाही. अर्थात काही पद्धती किंवा काही कारणांवरती आक्षेप घेतला जाऊ शकतो. पण सध्या काही ठोस उपाययोजना देखील केल्या जात आहेत. काही कठोर निर्बंध आणले गेले आहेत. किमान एका माशाचं एकदा प्रजनन व्हावं यासाठी खबरदारी घेतली जात आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगात देखील काही नियम हे कडक केले गेले आहेत. त्यामुळे 2048 पर्यंत समुद्रातील मासे संपतील असं म्हणता येणार नाही. सध्या विविध गोष्टींचा परिणाम मासेमारीवरती होत आहे. मासे कमी जास्त प्रमाणात मिळत आहेत. पण याचा अर्थ मासे संपतील असा होत नाही.'' अशी प्रतिक्रिया 'एबीपी माझा'कडे बोलताना दिली.

मच्छिमारांना काय वाटते?

सध्याच्या एकंदरीत मासेमारी बद्दल आम्ही काही मच्छीमारांशी देखील बोललो. त्यामध्ये काही जुने जाणते आणि नवीन मच्छीमार यांचा देखील समावेश आहे. '' सध्या मासेमारी मध्ये काही संकट नक्कीच आहेत. निसर्गनिर्मित संकट तर आहेतच. पण प्रदूषणासारखी गंभीर समस्या सध्या उभी राहत आहे. समुद्रकिनारी कंपन्या उभ्या राहिल्या. त्यामुळे समुद्राचा प्रदूषण होत आहे. वातावरणात होत असलेला बदल याचा फटका देखील आम्हाला बसतो. आता तुम्ही तंत्रज्ञानाच्या बोटी आल्या. त्यामुळे अनेक वेळेला नियमबाह्य मासेमारी होते. अगदी छोट्या माशांना देखील पकडलं जातं. त्याचा परिणाम मत्स्य प्रजनन आणि उत्पादनावरती होतो. मासे मिळत नसल्याने आम्ही काही वेळेला बोटी समुद्रकिनारीच उभ्या करणे पसंत करतो. कारण बोट समुद्रात गेल्यानंतर ती परत येईपर्यंतचा खर्च आणि उत्पादन याचा ताळमेळ बसवणं देखील अवघड होऊन बसते. अर्थात मासे संपतील की नाही माहित नाही. पण समस्या मात्र खूप आहेत. लोकसंख्या वाढली त्यामुळे माशांची मागणी देखील वाढली. अशा वेळेला मागणी आणि पुरवठा हे गणित साधण्यासाठी नियमबाह्य पद्धतीने मासेमारी होते. त्यावरती देखील वचक ठेवणे गरजेचे आहे. समुद्रातली मासे संपतील का? हे आम्ही सांगू शकत नाही. पण मासेमारी मध्ये सध्या अनेक समस्या आहेत हे नक्की.'' अशी प्रतिक्रिया 'एबीपी माझा'कडे बोलताना दिली.

हे ही वाचा :

'पापलेट'ला जीआय मानांकन मिळणार, तर अवैध मासेमारी रोखण्यासाठी दंडात्मक कारवाईचा बडगा, मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवारांची माहिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

इंद्रायणी पुन्हा फेसाळली, मूठभर लोकांसाठी लाखो वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ! नक्की कारण काय?
इंद्रायणी पुन्हा फेसाळली, मूठभर लोकांसाठी लाखो वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ! नक्की कारण काय?
Chandrakant Patil : राजकीय वादात अभिनेत्रीचं नाव जोडणं सुरेश धसांना शोभत नाहीत; चंद्रकांत पाटलांनी सुनावले खडेबोल
राजकीय वादात अभिनेत्रीचं नाव जोडणं सुरेश धसांना शोभत नाहीत; चंद्रकांत पाटलांनी सुनावले खडेबोल
Ind vs Aus 4th Test : नाकात दम केलेल्या 19 वर्षाच्या पोराला बुमराहने केलं क्लीन बोल्ड, भन्नाट सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल
नाकात दम केलेल्या 19 वर्षाच्या पोराला बुमराहने केलं क्लीन बोल्ड, भन्नाट सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल
Weather: पावसाचा इफेक्ट ओसरला, येत्या दोन दिवसात राज्यात हवामान बदलणार, IMD चा काय इशारा? वाचा
पावसाचा इफेक्ट ओसरला, येत्या दोन दिवसात राज्यात हवामान बदलणार, IMD चा काय इशारा? वाचा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 AM : 29 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 29 डिसेंबर 2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 7.00 AM : 29 डिसेंबर 2024 : ABP MajhaKonkan Tourism Christmas New Year : पर्यावरण, पर्यटन, कोकण... कमावले 1 अब्ज 25 कोटी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इंद्रायणी पुन्हा फेसाळली, मूठभर लोकांसाठी लाखो वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ! नक्की कारण काय?
इंद्रायणी पुन्हा फेसाळली, मूठभर लोकांसाठी लाखो वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ! नक्की कारण काय?
Chandrakant Patil : राजकीय वादात अभिनेत्रीचं नाव जोडणं सुरेश धसांना शोभत नाहीत; चंद्रकांत पाटलांनी सुनावले खडेबोल
राजकीय वादात अभिनेत्रीचं नाव जोडणं सुरेश धसांना शोभत नाहीत; चंद्रकांत पाटलांनी सुनावले खडेबोल
Ind vs Aus 4th Test : नाकात दम केलेल्या 19 वर्षाच्या पोराला बुमराहने केलं क्लीन बोल्ड, भन्नाट सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल
नाकात दम केलेल्या 19 वर्षाच्या पोराला बुमराहने केलं क्लीन बोल्ड, भन्नाट सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल
Weather: पावसाचा इफेक्ट ओसरला, येत्या दोन दिवसात राज्यात हवामान बदलणार, IMD चा काय इशारा? वाचा
पावसाचा इफेक्ट ओसरला, येत्या दोन दिवसात राज्यात हवामान बदलणार, IMD चा काय इशारा? वाचा
Prajakta Mali: प्राजक्ता माळी पत्रकार परिषदेत भावूक; कंठ दाटला, रुमाल काढला, पाणीही प्यायल्या
Prajakta Mali: प्राजक्ता माळी पत्रकार परिषदेत भावूक; कंठ दाटला, रुमाल काढला, पाणीही प्यायल्या
महाराष्ट्रात हवाई दळणवळणाचे बळकटीकरण; मुख्यमंत्र्यांकडून नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आढावा
महाराष्ट्रात हवाई दळणवळणाचे बळकटीकरण; मुख्यमंत्र्यांकडून नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आढावा
16 तास वेटींग... मुंबई विमातळावर प्रवाशी दिवसभर ताटकळले; सकाळी 6.30 च्या विमानाचे रात्री 11 वाजता उड्डाण
16 तास वेटींग... मुंबई विमातळावर प्रवाशी दिवसभर ताटकळले; सकाळी 6.30 च्या विमानाचे रात्री 11 वाजता उड्डाण
Video: मी माफी-बिफी मागत नसतो, प्राजक्ता माळीच्या पत्रकार परिषदेनंतर लगेचच सुरेश धस बोलले, नेमकं काय म्हणाले
Video: मी माफी-बिफी मागत नसतो, प्राजक्ता माळीच्या पत्रकार परिषदेनंतर लगेचच सुरेश धस बोलले, नेमकं काय म्हणाले
Embed widget