Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 7.00 AM : 29 डिसेंबर 2024 : ABP Majha
Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 7.00 AM : 29 डिसेंबर 2024 : ABP Majha
मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये, भाजप कार्यकर्त्यांकडून चंद्रकांत पाटलांचं जंगी स्वागत
बीडमधली घटना गंभीर, मुख्यमंत्री दोषींना सोडणार नाहीत, मुख्यमंत्र्यांसमोर कोणीही डावं उजवं नसतं, मंत्री चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मातृशोक, पटोलेंच्या मातोश्री मीराबाई फाल्गुनराव पटोले यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने दु:खद निधन.
राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कामांना गती देताना गुणवत्ता राखा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश.
मत्स्योद्योग आणि बंदर विकासमंत्री नितेश राणेंकडून करूळ घाटाची पाहणी, घाटाचं ६० टक्के काम पूर्ण, १० जानेवारीला पुन्हा पाहणी करणार, त्यानंतर १५ जानेवारीपासून एकेरी वाहतूक सुरु होईल, राणेंची माहिती.
जळगावच्या झुरखेडामध्ये सुरु असलेल्या बागेश्वर धाम यांच्या हनुमंत कथेला मंत्री गुलाबराव पाटलांनी लावली होती उपस्थिती, गुलाबराव पाटलांनी हनुमंत कथेसह आरतीतही घेतला सहभाग.
राज्यातील बस आगारांना 'कलर कोड', आगारांची वेगळी ओळख तयार करण्यासाठी त्यांना विशिष्ट रंग दिला जाणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा.
जळगावमध्ये धावत्या रेल्वेचं इंजिन डब्यांपासून वेगळे होऊन पुढे गेल्याचा धक्कादायक प्रकार, चालकाच्या लक्षात येता डब्यांची पुन्हा केली जोडणी, दोन डब्यांना जोडणारी कपलिंग तुटल्याने घटना.