Konkan Tourism Christmas New Year : पर्यावरण, पर्यटन, कोकण... कमावले 1 अब्ज 25 कोटी Special Report
१ अब्ज २५ कोटी...
३ ते ४ दिवसांत कोकणाने केलेली कमाई..
होय.. कोणताही पर्यावरणाचा ऱ्हास न करता नाताळच्या सुट्टीत कोकणात अब्जावधी रुपयांची उलाढाल झालीय.. तीही फक्त आणि फक्त पर्यटनाच्या जोरावर... जर सरकारनं मनावर घेतलं आणि कोकणातल्या पर्यटनाला चालना दिली तर काय चमत्कार घडू शकतो... कोकणाच्या तिजोरीत किती गंगाजळी जमा होऊ शकते याचा ट्रेलर दाखवणारा हा रिपोर्ट पाहुयात
फक्त नाताळ आणि नववर्षच नाही
तर वर्षापर्यटनालाही कोकणाला पसंती मिळतेय
त्यामुळे ऑफ सिझनलासुद्धा इथं मोठी गर्दी होते..
एकीकडे कोकणातील प्रस्तावित रिफायनरीवरून जोरदार राजकारण सुरू आहे
आणि या राजकारणाला किनार आहे ती रिफायनरीमुळे होणाऱ्या पर्यावरणाच्या हानीची..
दरम्यान कोकणातल्या पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी
योग्य धोरण आखून त्याची अंमलबजावणी करण्यात आली..
तर पर्यावरणाला धक्का न लावता कोकणात आर्थिक विकासगंगा आणता येईल