16 तास वेटींग... मुंबई विमातळावर प्रवाशी दिवसभर ताटकळले; सकाळी 6.30 च्या विमानाचे रात्री 11 वाजता उड्डाण
दुपारी साडे बारा वाजता आम्ही पुन्हा विमानात बोर्ड केले. प्रवाशांनी थंडीचे कपडे घालून विमानात बोर्ड केले होते, विमानात प्रवाशांना दीड तास बिना एयर कंडीशन बसविण्यात आले.
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई विमानतळावर (airport) आज सकाळपासून प्रवाशांची मोठी तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं. सकाळी 6.30 चे विमान अद्याप टेक ऑफ झाले नसल्यानें प्रवाशांचे मोठे हाल झाले. मुंबईतून इस्तांबूलला जाणारे सकाळी 6.30 वाजताचे विमान 8 तासानंतर थेट रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे, प्रवाशांनी संताप व्यक्त करत एअरलाईनच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. या अचानक आलेल्या संकटामुळे कित्येक प्रवाशांची पुढील कामे खोळंबल्याचंही पाहायला मिळालं. प्रवाशांच्या मते मुंबईतून (Mumbai) इस्तांबुलसाठी हे विमान रवाना होणार होते, सकाळी 6.55 ला विमान टेक ऑफ होणार होते. मात्र, अचानक विमानाची वेळ बदण्यात आली व तेच विमान सकाळी 8.20 पर्यंत टेक ऑफ होईल असे सांगण्यात आले. त्यानंतर साडे नऊ वाजता बोर्ड केले आणि सर्वच प्रवाशांना तिथेच बसवून ठेवले. तब्बल तास दीड तास बसलविल्यानंतर देखील पुन्हा एग्जिट घ्या, असे सांगण्यात आल्याने प्रवाशांचा संयम सुटला होता. आता, अखेर साडे सोळा तासांनी रात्री 11.00 वाजता विमानाचे उड्डाण होणार असल्याचे एअरलाईन्सकडून सांगण्यात आले आहे.
दुपारी साडे बारा वाजता आम्ही पुन्हा विमानात बोर्ड केले. इस्तांबुलचे वातावरण थंड असल्याने प्रवाशांनी थंडीचे कपडे घालून विमानात बोर्ड केले होते, विमानात प्रवाशांना दीड तास बिना एयर कंडीशन बसविण्यात आले. मात्र, अखेर हे विमान रद्द केल्याचे प्रवाशांना सांगण्यात आले आहे. हे प्रवास रद्द का याचा जाब विचारण्यासाठी प्रवाशांची एयरपोर्ट मॅनेजर आणि इंडिगोच्या मॅनेजरला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. प्रवाशांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही, अखेर इंडिगो एअरलाईन्सने रात्री उशिरा याबाबत खंत व्यक्त केली आहे. दरम्यान, अचानक विमानसेवा रद्द केल्यामुळे इंडिगोचा मुंबई टू इस्तांबुल प्रवास रखडला असून या प्रवासात 100 प्रवासी असल्याची माहिती असून विद्यार्थांची संख्या ही मोठी असल्याचे समजते.
कंपनीकडून खेद व्यक्त, परतावा देणार
आम्हाला खेद आहे की आमची फ्लाइट 6E17, मूळत: मुंबई ते इस्तंबूलला चालवायची होती. मात्र, तांत्रिक समस्यांमुळे विमानसेवेला उशीर झाला. दुर्दैवाने, ही समस्या दुरुस्त करून ती गंतव्यस्थानी पाठवण्याचे आमचे सर्वतोपरी प्रयत्न असूनही, अखेरीस आम्हाला फ्लाइट रद्द करावी लागली, असे एअरलाईन्सने म्हटले आहे. कंपनीकडून आमच्या प्रवाशांना मदत व सहाय्य प्रदान करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार, निवास, जेवण आणि संपूर्ण परतावा यासारख्या उपायांची व्यवस्था करू. आमच्याकडून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात आला. मात्र, तांत्रिक अडचण सोडवणे शक्य न झाल्याने विमानसेवा पूर्णपणे पूर्ववत होऊ शकली नाही. दरम्यान, कंपनीकडून पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे आणि आता ते रात्री 11 :00 वाजता मुंबईतून रवाना होईल. आमच्या ग्राहकांना खात्री देऊ इच्छितो की त्यांची सुरक्षितता हे आमच्यासाठी प्राधान्यवत आहे.
हेही वाचा
Prajakta Mali: प्राजक्ता माळी पत्रकार परिषदेत भावूक; कंठ दाटला, रुमाल काढला, पाणीही प्यायल्या