एक्स्प्लोर

राष्ट्रपती भवन, मंत्रालय, सीएसटी स्टेशनवर नेत्रदीपक रोषणाई

मुंबई: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातल्या महत्त्वाच्या इमारतींवर रोषणाई करण्यात आली आहे. दिल्लीतील राष्ट्रपती भवनावर नेत्रदीपक अशी रोषणाई करण्यात आली आहे. रोषणाईनं संपूर्ण परिसर झगमगून गेला आहे. ही रोषणाई पाहण्यासाठी दिल्लीकर मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव दूरूनच ही रोषणाई पाहता येते आहे. फोटो सौजन्य: एएनआय (ANI) फोटो सौजन्य: एएनआय (ANI) दुसरीकडे, मुंबईचं सीएसटी स्टेशन, मुंबई महापालिका, मंत्रालय आणि बीएसई अर्थात बॉम्बे स्टॉक एक्सजेंची इमारतही तिरंग्याच्या रोषणाईनं उजळून निघाली आहे.  वेगवेगळं औचित्या साधून सीएसटी स्थानकावर रोषणाई केली जाते. आज प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ही रोषणाई करण्यात आली आहे. ही रोषणाई पाहण्यासाठी अनेकांनी इथं गर्दी केली होती. cst फोटो सौजन्य: एएनआय (ANI) दुबईच्या बुर्ज खलिफाला तिरंग्याची सजावट बुर्ज खलिफा                                          बुर्ज खलिफा फक्त भारतातच नव्हे तर दुबईतही तिरंग्याची सजावट पाहायला मिळत आहे. भारताच्या 68 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दुबईच्या बुर्ज खलिफाला तिरंग्याची सजावट करण्यात आली आहे. उद्या नवी दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात अबु धाबीचे युवराज शेख महम्मद बिन जाएद अल नहयान हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यानिमित्त दुबईमधील बुर्ज खलिफाला तिरंग्याची सजावट करण्यात आली आहे. दुबईमधील 2722 फुटी बुर्ज खलिफाला तिरंग्याने सजवण्यात आलं आहे. तिरंग्याने नटलेल्या बुर्ज खलिफाला पाहण्यासाठी पर्यटक आणि नागरिकांनीही मोठी गर्दी केली आहे. दरम्यान, मंगळवारी युवराज शेख भारतात पोहचले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेख यांचे थेट विमानतळावर जाऊन त्यांचे स्वागत केले. भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यात डझनहुन अधिक परस्पर सहकार्य करारावर उभयंतांमध्ये स्वाक्षऱ्या होणार असून, यामध्ये 75 अरब डॉलरच्या गुंतवणूकीचाही समावेश आहे. याशिवाय युवराज शेख उद्या राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासोबत स्नेह भोजनही करणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
Embed widget