एक्स्प्लोर

राज्यात अवकाळीचं संकट, वीज पडून तिघांचा मृत्यू

मुंबई : हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवत अवकाळी पावसाने राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात धडक दिली. मनमाडमध्ये वीजेच्या कडकडाटासह पाऊस झाला.  तर शिरूर आणि बारामतीमध्ये देखील गारपीट झाली. सातारा, राहुरी, पारनेरमध्येही वादळीवाऱ्यासह पाऊस कोसळला. संध्याकाळनंतर जळगावमध्येही पावसाने हजेरी लावली. काल झालेल्या अवकाळी पावसामुळं संगमनेर तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. राज्यातील अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील इनामगाव येथे वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला. इतर दोन गावातील दोन जण वीज पडून जखमी झाले आहेत. मनमाड जवळच्या पांझनदेव येथील शेतकरी श्रावण डघळे या शेतकऱ्याने शेतात साठवून ठेवलेला हजारो रूपये किमतीच्या चाऱ्यावर वीज पडली. त्यामुळे चारा आगीत भस्मात झाला. जळगाव- यावल, पाचोरा, चाळीसगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली. चाळीसगाव तालुक्यात वीज कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला. अहमदनगर जिल्ह्यात पावसाने मोठं नुकसान अहमदनगर जिल्ह्यात रविवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. नगर, पारनेर, राहुरी, शेवगाव आणि श्रीगोंद्यात काही ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पाऊस पडला. सोसाट्याचा वारा, विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने घराबाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. पारनेर तालुक्यात कान्हुरपठार निघोज, काळेवाडीत गारपीट झाली तर अनेक ठिकाणी पाऊस पडला. निघोजला गारपीटीने डाळींबाच्या फळबागांना मोठा फटका बसला.  मोठ्या प्रमाणात फळगळ झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. जवळेत रस्त्यावर झाडं पडल्याने वाहतूकही विस्कळीत झाली. तर शेवगाव तालुक्यात पत्र्याचं शेड पडून दोन म्हशी दगावल्या. मात्र अवकाळी पावसानं असहाय्य उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. बेळगावात वीज पडून महिलेचा मृत्यू रविवारी सायंकाळी झालेल्या पावसात वीज कोसळून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बेळगाव तालुक्यातील के के कोप्प येथे घडली आहे. रुद्रवा चंद्रापा गुडयानट्टी, वय 36 असं मृत महिलेचं नाव आहे. शेतात काम करायला गेली असता वीज पडून या महिलेचा मृत्यू झाला. या महिन्यात वीज पडून मृत्यू झाल्याची सहावी घटना आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
Embed widget