एक्स्प्लोर

दुर्गराज रायगडवर 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी सुरू, शिवभक्त रायगडवर जमण्यास सुरुवात

Shivrajyabhishek : शिवराज्याभिषेक सोहळ्याची जोरदार तयारी सुरू असून त्यासाठी हजारो शिवभक्त रायगडावर दाखल होत आहेत. 

Shivrajyabhishek 2023 : दुर्गराज रायगडवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. येत्या 2 जून रोजी तिथीप्रमाणे तर 6 जून रोजी तारखेप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा होणार आहे. तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली असून आज गणेश पूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. 

राज दरबारमध्ये 350 वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. त्यावेळी असलेल्या दरबाराचं चित्र उभं करण्याचा प्रयत्न केला जातोय. शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी हजारो शिवभक्त सध्या रायगडावर दाखल झालेत. यंदा शिवरायांच्या  राज्याभिषेक सोहळ्यासाठी चांदीची पालखी वापरली जाणार आहे. दरम्यान आज या पालखीचं पूजन करण्यात आलंय. 

तिथीप्रमाणे होणाऱ्या रायगडवरील शिवराज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन असं असेल, 

1 जून- गडदेवता शिर्काई पूजन, छत्रपती शंभू महाराज जयंती उत्सव, गंगासागर पूजन, संध्याकाळी पारंपरिक गोंधळ, रात्री सांस्कृतिक कार्यक्रम

2 जून -
सकाळी 7 वाजता ध्वजारोहन सोहळा
सकाळी 9 वाजता शिवराज्याभिषेक सोहळा
सकाळी 10.30 वाजता श्री शिवसन्मान सोहळा
सकाळी 11 वाजता शिवपालखी सोहळा

या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तरेस राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे तसेच श्रीमंत शाहूराजे छत्रपती, छत्रपती उदयनराजे भोसले हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. 

तिथीप्रमाणे 2 जूनला पहाटेपासूनच या सोहळ्याला सुरुवात होणार आहे. मुख्य गोष्ट म्हणजे चांदीच्या पालखीचे आज पूजन करण्यात आले. तसेच शिवाजी महाराजांच्या काळातील होन देखील यावेळी राज्याभिषेक सोहळ्याच्या दरम्यान वापरले जाणार आहेत. गागाभट्ट यांचे सतरावे वंशज महंत सुधीर दास महाराज हा विधी करणार आहेत.

दुर्गराज रायगडवर 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी सुरू, शिवभक्त रायगडवर जमण्यास सुरुवात

तारखेप्रमाणे 6 जून रोजी सोहळा 

तर 6 जून रोजी तारखेप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार असून संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडणार आहे. 2007 पासून सुरू झालेल्या या सोहळ्याला आता व्यापक स्वरुप प्राप्त झालं असून 6 जून रोजी रायगडवर दोन ते अडीच लाख शिवभक्त जमा होतात. 

मुंबई गोवा महामार्गासह इतर राज्य मार्गांवर अवजड वाहनांना बंदी

मुंबई गोवा महामार्गासह इतर राज्य मार्गांवर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागानं हे आदेश काढलेत. बुधवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून या आदेशाची अमलबजावणी करण्यात येणार आहे. 1,2 जून आणि 5, 6 जून या दिवशी अवजड वाहनांना बंदी असेल. 16 टन आणि त्यापेक्षा जास्त वजन क्षमतेच्या जड, अवजड वाहनं, ट्रक, मल्टी एक्सल ट्रेलर यांना वाहतूकीसाठी बंदी घातली आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. तर राज्यभरातून येणाऱ्या शिवभक्तांची वाहतूक कोंडीने गैरसोय होऊ नये म्हणून अवजड वाहतूक बंदीचा निर्णय घेतलाय.

ही बातमी वाचा : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jayant Patil : शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार, महेश बालदींच्या अटकेची मागणी
शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
Vinod Tawde : ‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  6:00 AM : 20 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat Attacked : 4 दुचाकी, 2 कार; संजय शिरसाटांच्या लेकानं सांगितला हल्ल्याच घटनाक्रमZero Hour Vidhan Sabha Election | मतदानाआधीच राजकीय महाभारत, निवडणूक आयोगाकडून किती कोटी जप्त?Devendra Fadnavis on Deshmukh | सलीम जावेदची स्क्रिप्ट, रजनिकांतची फिल्म, फडणवीसांचा देशमुखांवर नेम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jayant Patil : शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार, महेश बालदींच्या अटकेची मागणी
शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
Vinod Tawde : ‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
Ind vs Aus 1st Test Playing-11 : पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
Vinod Tawde  : विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण... दोन्ही नेते एकाच गाडीतून हॉटेलबाहेर पडले
विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण...
Vinod Tawde : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Video : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Embed widget