एक्स्प्लोर

मनसेचा दणका, जोशी वडेवाल्याचं शटर डाऊन; व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांनाही दिले निवेदन

हॉटेलमधील कामगारांनी मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून मारहाण होत असेलली एक महिला गर्भवती असल्याचे देखील समोर आले.

रायगड : मुंबईहून गावाकडे जाऊन चाकरमान्यांनी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. आता, हेच कोकणातील गावी गेलेले चाकरमानी आता मुंबईत परत येत आहेत. मात्र, मुंबईवरून (Mumbai) आपल्या गावी गणेशोत्सवासाठी जात असलेल्या चाकरमान्यांना  माणगावमधील मुंबई-गोवा हायवेवर असलेल्या जोशी वडेवाले हॉटेलमध्ये (Hotel) मारहाण झाल्याची घटना समोर आली होती. नाश्ता करण्यासाठी मागवलेल्या वड्यांमध्ये मीठ जास्त असल्याची तक्रार या व्यक्तींनी सबंधित हॉटेल चालकाला विचारली. मात्र, तक्रार समजून घेण्याच्या अगोदरच तक्रारदाराला दम देऊन शिव्या देण्यास सुरूवात केली. या हॉटेलमध्ये काम करत असलेल्या उत्तर भारतीयांनी 2 छोट्या मुलांसह महिलांना मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता मनसेनं (MNS) हॉटेलविरुद्ध दंड थोपटल्याचं पाहायला मिळालं. 

हॉटेलमधील कामगारांनी मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून मारहाण होत असेलली एक महिला गर्भवती असल्याचे देखील समोर आले. या महिलांवर चक्क खुर्ची उचलून मारहाण करुन त्यांचे मंगळसूत्र सुध्दा खेचण्याचा प्रयत्न या घटनेत झाल्याचे समोर आले आहे. तसेच, 2 मुलांना नखाने ओरबाडे काढून त्यांना देखील हॉटेलचालकासह कर्मचाऱ्यांनी मारहाण केली होती. या घटनेसंदर्भात माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाश्ता करायला गेलेल्या मुंबईकर चाकरमान्यांना नामांकित हॉटेलमध्ये मारहाण झाल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्यानंतर, आता मनसेनं याप्रकरणी पोलिसांत धाव घेतल्यानंतर हॉटेल बंद करण्यात आल्याची माहिती आहे. मसनेच्यावतीने संबंधित वडेवाल्या हॉटेलचालकाविरुद्ध आवाज उठवण्यात आल्यानंतर अखेर जोशी वडेवाल्याकडून काल हॉटेल बंद करण्यात आले होते. 

माणगांव मधील जोशी वडेवाले हॉटेलमधील मालकाने व कर्मचाऱ्यांनी मराठी माणसावर झालेल्या मारहाणी प्रकरणी परप्रांतीय हॉटेलचालक शुभम जैस्वाल यांचावर कारवाई होऊन हॉटेल बंद करावे या करिता श्रीवर्धन तालुका मनसेनेचे अध्यक्ष चिमण सुकधरे यांच्यासह मनसैनिकांनी माणगांव पोलीस निरीक्षक बोराडे यांना निवेदन दिले. या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन जोशी वडेवाले हॉटेल बंद करण्यात आल्याची माहिती आहे. तसेच, संबंधित हॉटेलचालक व कर्मचाऱ्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही मनसेनं केली आहे. दरम्यान, मनसेनेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी यापुढे कोकणातीत मराठी माणसाला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरीत कोणत्याही उपहारगृहात मारहाण झाली, अथवा दमदाटी करण्याचा प्रयत्न केला तर मनसे स्टाईलने धडा शिकवला जाईल, असा इशाराही दिला आहे. 

हेही वाचा

धक्कादायक ! जिल्हा रुग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या महिलेचा मृत्यू; नातेवाईकांचा स्मशानतच ठिय्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 18 January  2024HSC SSC Marksheet Update : दहावी-बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर विद्यार्थ्यांचा जात प्रवर्ग, शिक्षण मंडळाकडून स्पष्टीकरणKolkata Sanjay Roy Found Guilty : कोलकाता डॉक्टर अत्याचार प्रकरण, संजय रॉय दोषीABP Majha Headlines : 3 PM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra Politics

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
Embed widget