Sunil Tatkare : 'सुनील तटकरेंचा राजकीय कडेलोट करणार'; शिंदेसेनेचे नेते आक्रमक, आता रायगडात नाराजीनाट्य
Lok Sabha Election 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदाराने थेट अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरेंच्या विरोधात दंड थोपटले आहेत.
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर महायुतीत एकामागून एक मतदारसंघातील नेत्यांची नाराजीनाट्य चर्चेचा विषय ठरत आहे. आता असाच वाद रायगड लोकसभा मतदारसंघात (Raigad Lok Sabha Constituency) पाहायला मिळत आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेच्या आमदाराने (Shiv Sena MLA) थेट अजित पवार गटाचे (Ajit Pawar Group) नेते सुनील तटकरेंच्या (Sunil Tatkare) विरोधात दंड थोपटले आहेत. तसेच, तुमचा राजकीय कडेलोट केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा देखील दिला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड मतदारसंघात शिवसेना- राष्ट्रवादीत जुंपली आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार महेंद्र थोरवे यांनी यांनी अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांच्या विरोधात थेटच भूमिका घेतली आहे. तर, "रायगड लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेऊन जर तुमच्यात बदल घडला नाही, तर तुमचा राजकीय कडेलोट केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा देखील आमदार महेंद्र थोरवे यांनी यांनी सुनील तटकरे यांना दिला आहे.
तटकरे मित्रपक्षांना दुय्यम वागणूक देतात...
"निवडून आल्यानंतर सुनील तटकरे सहकारी मित्रपक्षांना दुय्यम वागणूक देतात. मित्रपक्षांना संपविण्यासाठी राजकीय कारनामे करतात”, असा आरोप शिंदे गटाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर महेंद्र थोरवे यांनी तटकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
सुनील तटकरेंना उमेदवारी नकोच....
सुनील तटकरे यांना लोकसभा निवडणुकीत रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्या नावाची जोरदार चर्चा देखील सुरु आहे. मात्र, त्यांच्या उमेदवारीला शिंदे गटाकडून विरोध होतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान, पेण येथे झालेल्या शिंदे गटाच्या आढावा बैठकीत तटकरे यांच्याविषयी अविश्वास दाखवण्यात आला. तसेच, सुनील तटकरे उमेदवार म्हणून नकोच अशी भूमिका घेण्यात आली. त्यामुळे रायगड लोकसभा मतदारसंघात महायुतीतील वादावादी समोर आली आहे.
जागावाटपाचा तिढा सुटेना...
महायुतीमधील जागावाटपाचा तिढा सुटत नसल्याने राष्ट्रवादी आणि शिंदे गटाकडून अजूनही उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, भाजपकडून आपल्या वाट्याला आलेल्या 23 जागांवरील उमेदवार घोषित करण्यात आले आहे. मात्र, राष्ट्रवादी आणि शिंदे गटाकडून अजून एकही उमेदवार अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. अशात रायगड लोकसभा मतदारसंघातून महायुतीची उमेदवारी कुणाला मिळणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :