एक्स्प्लोर

Alibaug : धरमतर पुलावर गावकऱ्यांची गर्दी, नारळ मिळविण्यासाठी सुमारे 50 फूट उंचीवरून खाडीत उडी

Alibaug : 'नारळी पौर्णिमे'चा उत्सव राज्यभरात साजरा केला जात असताना रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील हा उत्सव काहीसा थरारक पद्धतीने साजरा केला जातो.

Alibaug : 'नारळी पौर्णिमे'चा उत्सव राज्यभरात साजरा केला जात असताना रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील हा उत्सव काहीसा थरारक पद्धतीने साजरा केला जातो. अलिबाग तालुक्यातील धरमतर पुलावर हजारो गावकरी एकत्र येतात आणि सागराला नारळ अर्पण करत असतात. याचवेळी गावातील काही तरुण हे सागराला अर्पण केलेला नारळ मिळविण्यासाठी तब्बल 40 ते 50 फूट उंचीवरील पुलावरून खाडीत उड्या मारून हा नारळ मिळविण्याचा थरारक प्रयत्न करताना दिसून येतात. 

नारळी पौर्णिमेचा उत्सव हा आगरी - कोळी समाजाचा आनंदाचा उत्सव मानला जातो. रायगड जिल्ह्यातील पूर्व भागात आगरी कोळी समाज हा मोठ्या प्रमाणात दिसून येतो. खाडी आणि समुद्रालगत राहणार हा समाज शेती, मिठागर आणि मासेमारी करीत उपजीविका करत असतो. दरम्यान, पावसाळ्याच्या हंगामात समुद्राला खवळलेला असून नारळी पौर्णिमेनंतर समुद्र काहीसा शांत होतो, असे मानले जाते. यावेळी नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने समुद्राला नारळ अर्पण करून कुटुंबियांच्या सुरक्षेची प्रार्थना करण्यात येते. दरम्यान, या निमित्ताने अलिबाग तालुक्यातील धरमतर पुलाजवळील शहाबाज, पेझारी, पोयनाड, वडखळ आणि पंचक्रोषीतील हजारो गावकरी हे समुद्राला नारळ अर्पण करण्यासाठी जमा झाले होते. 

यावेळी सायंकाळच्या सुमारास हे गावकरी धरमतर पुलावर जमा होऊन नारळ अर्पण करण्यात आला. गावातील तरुण हे समुद्राला अर्पण केलेला नारळ मिळविण्यासाठी तब्बल 40 ते 50 फूट उंचीवरील पुलावरून पाण्यात उडी मारून नारळ मिळविण्याचा प्रयत्न करताना दिसून आले. तरुणांचा हा थरार पाहण्यासाठी अनेक गावकरी हे पुलाच्या दुतर्फा गर्दी केली होती. तर पुलाच्या दुसऱ्या बाजूला देखील अशीच चढाओढ दिसून आली. गावकरी हे आपल्या छोट्या मासेमारी होड्या घेऊन नारळ मिळविण्याचा प्रयत्न करीत होते. यामुळे नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने धरमतर पुलावर जत्राच भरल्याचे चित्र दिसून आले होते. 

अशातच काही गावकरी आणि चिमुरड्यांनी आगरी - कोळी वेशातील साड्या नेसून वाजतगाजत आणि नाचत येऊन समुद्राला नारळ अर्पण केला. दरम्यान, कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता. तर धरमतर जवळच्या जुन्या पुलावर गावकऱ्यांना जाण्यास बंदी करण्यात आल्याने गावकऱ्यांनी पुलाच्या खाली जाऊन समुद्राला नारळ अर्पण केले.

इतर महत्वाच्या बातम्या:

Pune Bhide Bridge News: मुसळधार पावसामुळे अखेर पुणेकरांचा लाडका 'बाबा भीडे' पूल पाण्याखाली; नदीपात्रातील रस्ते बंद
Jalgaon : राजकीय मतभेद बाजूला! शिंदे गटात भाऊ तर शिवसेनेत बहीण, रक्षाबंधनाला आले एकत्र

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget