एक्स्प्लोर

Rahul Narwekar : उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळू नये म्हणून आमदार पात्र ठरवले का? राहुल नार्वेकरांचं बेधडक उत्तर

Rahul Narwekar : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल जाहिर केला. यामध्ये त्यांनी शिंदे आणि ठाकरे गटाच्या आमदारांना पात्र ठरवले तर शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच आहे, असाही त्यांनी निकाल दिला.

Rahul Narwekar : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल जाहिर केला. निकालामध्ये त्यांनी शिंदे आणि ठाकरे गटाच्या आमदारांना पात्र ठरवले तर शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच आहे, असाही त्यांनी निकाल दिला. दरम्यान ठाकरे गटाच्या आमदारांना पात्र ठरवून, जनतेतून मिळणारी सहानभूती टाळली असल्याचे राजकीय जाणकारांकडून बोलले जात होते. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना याबाबत भाष्य केले आहे. 

काय म्हणाले राहुल नार्वेकर? 

राहुल नार्वेकर म्हणाले, विधानसभा अध्यक्ष म्हणून अपात्रेच्या प्रकरणावर निर्णय घेत असताना त्याचे राजकीय परिणाम काय होतील? हे पाहाणे माझ्यासाठी क्रमप्राप्त नव्हते. माझ्यासाठी संविधान, विधानसभा नियम आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश क्रमप्राप्त होते. या सर्वांचा विचार करुन मी हा निर्णय घेतला. या निर्णयातून कोणाचे राजकीय नुकसान झालं असेल तर त्याला विधानसभा अध्यक्षांना जबाबदार धरु शकत नाहीत. ज्या लोकांना याचे राजकीय भांडवल करायचे होते. ते दुर्दैवाने होत नसेल, त्यासाठी मी निश्चितपणे जबाबदार नाही. विधानसभा अध्यक्षांची भूमिका राजकारण सोडून असते. त्याकडे पॉलिटिकल स्कोप म्हणून पाहाणे अन्यायकारक आहे.  माझ्या निर्णयाचे सर्वांकडून स्वागत होईल, असे वाटले होते. परंतु तसे होताना दिसले नाही. मात्र, बहुतांश लोकांकडून माझ्या निर्णयाचे स्वागत झाले. 

व्हीप कसा लागू केला?

मी व्हीप ज्यांनी लागू केला त्यांना राजकीय पक्षाचे पाठबळ होते का? तो लागू केल्यानंतर तो सर्व आमदारांपर्यंत पोहोचला आहे का? या बाबींचे निरीक्षण केले. व्हीप लागू करण्याचा अधिकार भरत गोगावले यांना होता. त्यानुसार मी निर्णय घेतला. एखाद्या व्हीपची अंमलबजावणी किंवा त्या व्हीपच्या विरोधात मतदान झालय? हे त्यातून दिसून येऊ शकते. व्हीप बजावल्याची माहिती पक्षातील आमदारांपर्यंत योग्यरित्या पोहोचवली गेली पाहिजे, असे नार्वेकर यांनी स्पष्ट केले. 

निवडणुक आयोगाला शिवसेनेची 1999 ची घटना मान्य 

निवडणुक आयोगाकडून शिवसेनेच्या घटनेची प्रत मागवली. ती 1999 मध्ये निवडणुक आयोगाकडे देण्यात आली. 1999 ची घटना ग्राह धरणे माझ्यासाठी क्रमप्राप्त होते. विधानसभेच्या क्रमांक 3 मध्ये असे आहे की, पक्षाला विधीमंडळ पक्ष म्हणून ओळख मिळाल्यानंतर विधानसभा अध्यक्षांकडे आपल्या पक्षीय घटनेची माहिती द्यायची असते. निवडणुक आयोगाने दिलेल्या घटनेनुसार आम्हाला निर्णय घ्यावा लागला होता. मात्र, माझ्याकडे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही पक्षीय घटना दिली नव्हती, असेही नार्वेकर यांनी नमूद केले. 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन केले नाही 

सर्वोच्च न्यायालयाने सुनील प्रभूंची नियुक्ती कायमस्वरुपी योग्य ठरवली तर भरत गोगावलेंची नियुक्ती अयोग्य ठरवली, असा गैरसमज पसरवला जात आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने असे आदेश कायम स्वरुपी दिले नव्हते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश क्रमपाप्त मानून मी निर्णय घेतला, असे नार्वेकर म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

मोठी बातमी! भरत गोगावलेंचाच व्हीप ठाकरे गटाला लागू होणार, विधानसभा अध्यक्षांची माहिती

महत्त्वाच्या बातम्या

चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
ABP Majha Top 10, 13 July 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening
ABP Majha Top 10, 13 July 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening
युद्धपिपासू ट्रम्प यांची नाचक्की! अमेरिकेच्या एअरबेसवर इराणचा सर्वात मोठा हल्ला, रडार सिस्टम पूर्णपणे उद्ध्वस्त केल्याचा दावा
युद्धपिपासू ट्रम्प यांची नाचक्की! अमेरिकेच्या एअरबेसवर इराणचा सर्वात मोठा हल्ला, रडार सिस्टम पूर्णपणे उद्ध्वस्त केल्याचा दावा

व्हिडीओ

Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
INDW vs ENGW: भारताच्या लेकींनी लॉर्डसवर इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी
भारताच्या लेकींनी इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, लॉर्डसवरील पहिल्याच कसोटीत विजयाचा झेंडा रोवला
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मुंबईतील सिमेंट रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाची SIT चौकशी करा; अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका, काँग्रेसचा इशारा
मुंबईतील सिमेंट रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाची SIT चौकशी करा; अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका, काँग्रेसचा इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार
सर्वोच्च न्यायालयाने गोहत्या बंदी आदेशाला स्थगिती दिली; हायकोर्टाच्या आदेशात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे सुतोवाच
सर्वोच्च न्यायालयाने गोहत्या बंदी आदेशाला स्थगिती दिली; हायकोर्टाच्या आदेशात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे सुतोवाच
Embed widget