Pune ZIka Virus : पुणेकरांनो काळजी घ्या! शहरात झिका व्हायरसचा शिरकाव; वयस्कर महिलेला झिकाची लागण; 'या' लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करु नका!
पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. पुण्यात झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे (Pune Health) आरोग्य विभागाने बाधित भागात प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यास सांगितले आहे.
पुणे : पुणेकरांसाठी महत्वाची (Zika Virus) बातमी आहे. पुण्यात झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे (Pune Health) आरोग्य विभागाने बाधित भागात प्रतिबंधात्मक (Health Depaetment)उपाययोजना सुरू करण्यास सांगितले आहे. येरवडा येथील प्रतीक नगर येथे राहणाऱ्या 64 वर्षीय महिलेला झिका विषाणूची चाचणी (Zika Virus Test Positive) पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे पुणेकरांना आता ताप, सर्दी, खोकल्यावर दुर्लक्ष करुन चालणार नाही आहे.
झिका व्हायरस पॉसिटीव्ह झालेली महिला नुकतीच पिंपरी-चिंचवडमधील (Pimpri Chinchwad) एका सांस्कृतिक कार्यक्रमात गेली होती. त्यावेळी ती संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आली असावी, असा अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे. यानंतर महिलेला ताप आणि अंगदुखी यांसारखी लक्षणे जाणवली. त्यामुळे महिलेला पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतरच्या चाचण्यांनी झिका विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं.
पुणे महानगरपालिकेच्या कर्मचार्यांना झिका रुग्ण आढळलेल्या भागात योग्य त्या उपाययोजना राबविण्याचे आदेश जारी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून, बाधित रुग्णाच्या कुटुंबातील पाच सदस्यांचे नमुने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. आरोग्य विभाग सक्रियपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि झिका विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना राबवत आहे.
झिका व्हायरसची लागण कशी होते?
झिका व्हायरस हा डासांमुळे पसरणारा आजार आहे. हा रोग एडिस डासाच्या चावण्यानं पसरतो. हे डास दिवसा जास्त सक्रिय असतात. या व्हायरसमुळे होणारा संसर्ग अनेकदा रुग्णाच्या जीवाला धोका पसरवू शकतो. त्यामुळे झिका व्हायरसची लक्षणं दिसत असतील तर तात्काळ खबरदारी म्हणून डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि रुग्णाला रुग्णालयात दाखल करा.
झिका व्हायरसची लक्षणं कोणती?
झिका विषाणू आजार हा एडिस इजिप्ती डासांमुळे होणारा सौम्य स्वरुपाचा आजार असून या आजारात 80 टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत. इतर रुग्णांमध्ये ताप, सांधेदुखी, अंगदुखी, डोकेदुखी, डोळे लाल होणे, उलटी होणे, अस्वस्थता जाणवणे ताप, अंगावर पुरळ उठणे अशी लक्षणे आढळतात. झिका आणि इतर कीटकजन्य आजारांसाठी सर्वेक्षण सक्षम करत असतानाच कोरोना सर्वेक्षण आणि लसीकरण याकडे दुर्लक्ष होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याबाबत सर्व संबंधितांना आरोग्य विभागाने निर्देश दिले आहेत.
इतर महत्वाची बातमी-
गणपतीपुळेच्या समुद्रकिनाऱ्यावर आलेल्या बेबी व्हेलचा दुर्दैवी अंत; 40 तासांची झुंज ठरली अपयशी