एक्स्प्लोर

गणपतीपुळेच्या समुद्रकिनाऱ्यावर आलेल्या बेबी व्हेलचा दुर्दैवी अंत; 40 तासांची झुंज ठरली अपयशी

खोल समुद्रातील बेबी व्हेल भरकटला आणि रत्नागिरीतील गणपतीपुळेच्या समुद्रकिनाऱ्यावर आला. ज्या पाण्यासोबत तो आला ते पाणी ओहोटीमुळे माघारी फिरलं, मात्र व्हेल माशाचं हे पिल्लू तिथेच अडकून पडलं आणि आज अखेर त्यानं आपले प्राण सोडलेत.

Ratnagiri News: रत्नागिरीतील (Ratnagiri) गणपतीपुळे (Ganpatipule) समुद्रकिनारी आलेल्या बेबी व्हेल (Blue Whale) माशाचा अखेर मृत्यू झाला आहे. व्हेल माशाच्या पिल्लाला दोन दिवसांत जवळपास पाच वेळा वाचवण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. दूर समुद्रात सोडलेला बेबी व्हेल 15 नोव्हेंबरला संध्याकाळी पुन्हा समुद्रकिनारी आला. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, हा बेबी व्हेल 13 नोव्हेंबर रोजी सकाळी पहिल्यांदा निदर्शनास आला होता. 

खोल समुद्रातील बेबी व्हेल भरकटला आणि रत्नागिरीतील गणपतीपुळेच्या समुद्रकिनाऱ्यावर आला. ज्या पाण्यासोबत तो आला ते पाणी ओहोटीमुळे माघारी फिरलं, मात्र व्हेल माशाचं हे पिल्लू तिथेच अडकून पडलं. अवाढव्य वेबी व्हेलला पुन्हा समुद्रात लोटण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. पण फक्त प्रयत्न नाहीतर प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागत होती. बेबी व्हेलला अथांग समुद्रातील त्याच्या घरच्या वाटेपर्यंत सोडण्यासाठी अनेक अडथळे येत होते. माशाला समुद्रात सोडण्यासाठीचे स्थानिकांसह प्रशासनाचे प्रयत्न आणि जगण्यासाठीची माशाची धडपड तब्बल 40 तास सुरू होती. अखेर 40 तासांनंतर अखेर या प्रयत्नांना यशही आलं होतं. पण काय झालं, कुणालाच नाही कळलं आणि पुन्हा एकदा बेबी व्हेल किनाऱ्यावर आला. किनाऱ्यावर आला आणि अखेर त्यानं मृत्यूसमोर हात टेकत आपला जीव सोडला. 

गणपतीपुळेच्या समुद्रकिनाऱ्यावर आलेल्या बेबी व्हेलचा दुर्दैवी अंत; 40 तासांची झुंज ठरली अपयशी

प्रशासनाकडून बेबी व्हेलला वाचवण्याचे अथक प्रयत्न अयशस्वी 

व्हेल मासा जेव्हा बांगडा किंवा तारली, माकूळ  यांचा पाठलाग करत असतील तर ते किनाऱ्याकडे येऊ शकतात. असा पाठलाग करत असताना ओहोटी सुरु झाली तर ते किनाऱ्यावरील वाळूत अडकून पडू  शकतात.  त्यांच्या महाकाय शरीराचा भार ते पाण्यात असताना सहज पेलू शकतात. पण पाण्याबाहेर त्यांच्या वजनामुळेच त्यांची इंद्रिये दबली जातात.  त्यांची त्वचा सुकू लागली की त्याखालील चरबीच्या  थरामुळे  शरीरात खूप उष्णता निर्माण होते आणि अतिउष्णतेमुळे डिहायड्रेशन होऊन ते मृत होतात. अशावेळी गणपतीपुळेच्या समुद्रकिनाऱ्यावर अडकून पडलेल्या व्हेलच्या पिल्लाला महत्वाचा धोका होता. त्याच्या त्वचेखालील चरबीच्या थराचं तापमान पाण्याबाहेर प्रचंड वाढून, त्वचा सुकून जाण्याचा. यामुळे शरीराचे अंतर्गत तापमानही खूप वाढतं आणि डिहायड्रेशन होऊन माशाचा मृत होण्याचा धोका अधिक होता. पण त्याची त्वचा सतत पाणी टाकून ओली ठेवल्यानं हा धोका कमी करता आला. तसेच, पशुवैद्यकीय डॉक्टरांनी दिलेल्या प्राथमिक उपचारांचाही बेबी व्हेलला उपयोग झाला. त्यामुळेच तो एवढे दिवस किनाऱ्यावर तग धरू शकला. 

बेबी व्हेल जन्मापासून तीन महिने आईच्या दुधावर जगतो

साधारणपणे तीन वर्ष व्हेल माशाचं पिल्लू आईच्या दुधावर वाढतं. समुद्रात परत सोडल्यावरही त्याला त्याची आई भेटणं महत्वाचं होतं. बेबी व्हेल जन्माला आल्यानंतर लगेच दूध पिण्यास सुरुवात करतं. बेबी व्हेलमधील natural instinct आणि गंध ज्ञान यामुळे, आपल्या आईला दुधाची भूक लागल्यावर कुठे स्पर्श करायचा याचं त्यांना उपजतच ज्ञान असतं. आईमध्ये असणाऱ्या मॅमरी स्लिट्स खाली असणाऱ्या स्तनाग्रांमधून दूध स्त्रवतं आणि पिल्लाच्या तोंडाजवळ दूध फवारलं जातं. हे पाण्यामध्ये फवारलं गेलेलं दूध पिल्लू पितं, अशी माहिती तज्ज्ञांनी ABP माझाला दिली आहे. 

पाहा व्हिडीओ : Whale Fish Ganpatipule : गणपतीपुळे समुद्र किनारी आलेल्या व्हेल माशाचा अखेर मृत्यू : ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

BIg Fight West Maharashtra : पश्चिम महाराष्ट्रातील प्रचारानंतरचा विचार, प्रचारानंतर कोणता मु्द्दा गजला?ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 18 November 2024Maharashtra Assembly Update :विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्याBig Fight Vidarbh : प्रचारानंतरचा विचार काय? पश्चिम विदर्भात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
Embed widget