एक्स्प्लोर

शॉकींग! व्हॉट्सअप ग्रुपवर आईने मेसेज पाहिला, तो तिचाच मुलगा निघाला; मोबाईल गेमच्या नादात संपवलं जीवन

26 जुलै रोजी रात्री मुलाने घराच्या इमारतीवरुन उडी घेत आपलं जीवन संपवलं. या घटनेनं परिसर हादरुन गेला आहे.

पुणे: माणसं सोशल मीडियाच्या अधीन झाली आहेत, तर लहान मुलं मोबाईलच्या (Mobile) नादी लागली आहेत, अशीच सध्याची परस्थिती आहे. त्यामुळे, लहान मुलांचं मोबाईल वेड कसं कमी करावा हा पालकांसमोर यक्षप्रश्न आहे. कारण, मुलांना लागलेलं हे मोबाइलचं वेड कधी व्यसन बनतं, त्यातूनच ते टोकाचं पाऊल उचलतात. यापूर्वी मोबाईल व्यसनाधिनता आणि मोबाईल गेमिंगच्या (Gamming) नादातून अशा घटना घडल्या आहेत. आता, पिंपरी चिंचवडमधील (Pimpari chinchwad) अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दहावीत शिकणाऱ्या मुलाला गेमचं व्यसन जडलं. या व्यसनाच्या आहारी तो इतका गेला की, याचा शेवट आत्महत्येनं झाला. या 15 वर्षीय मुलाने थेट चौदाव्या मजल्यावरून उडी घेतल्याचं समोर आलं आहे. ही धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडच्या किवळे भागात घडली आहे. 

26 जुलै रोजी रात्री मुलाने घराच्या इमारतीवरुन उडी घेत आपलं जीवन संपवलं. या घटनेनं परिसर हादरुन गेला आहे.  गेल्या सहा महिन्यांपासून हा मुलगा गेमच्या आहारी गेला होता. त्यानंतर तो स्वतःला बेडरूममध्ये तीन-तीन तास कोंडून घेत असे. खोलीत एकटाच बडबड करत असायचा. घरात आजवर वडिलधाऱ्यांना घाबरणारा मुलगा थेट किचनमधील चाकूची मागणी करायला लागला होता. हा बदल पाहून आई-वडीलही चिंतेत होते. अतिवृष्टीमुळं 25 जुलैला शाळांना सुट्टी होती, तो ही दिवस त्याने गेम खेळण्यातचं घालवला. मग रात्री अनेक विनवण्या केल्यानंतर तो जेवणासाठी बाहेर पडला. मात्र, जेवण केल्यावर पुन्हा तो खोलीतचं जाऊन बसला. आई-वडील दुसऱ्या मुलाला ताप आल्यानं त्या चिंतेत होते. रात्रीचा एक वाजला तरी देखील मुलाचा ताप उतरेना, त्यामुळं आई जागीचं होती. त्याचवेळी सोसायटीच्या व्हाट्सएपवर एक मुल जखमी अवस्थेत खाली पडल्याचा मेसेज आला. तो मेसेज मुलाच्या आईने वाचला अन तिला थोडी कुणकुण लागली. मग ती खोलीच्या दिशेने गेली, पण मुलगा घरात नव्हता, त्यानंतर धावाधाव करत ती जखमी अवस्थेत पडलेल्या मुलाजवळ पोहचली, बघते तर काय? तो तीचाचं मुलगा होता. 

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पोटच्या लेकाला पाहून, आईची पायाखालची जमीनचं सरकली. मुलाला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. घरात एका कागदावर गेममधील कोडिंगच्या भाषेत लिहिलेलं काहीतरी आढळलं. मात्र यातून त्याला काय नमूद करायचं होतं, याचा शोध आता पिंपरी चिंचवड पोलीस लावत आहेत. मात्र, असंख्य गेमच्या आहारी गेलेल्या मुलांसाठी आणि त्याकडे कानाडोळा करणाऱ्या पालकांसाठी ही अतिशय चिंतेची बाब आहे. या घटनेतून ते धडा घेतील आणि अशा धक्कादायक घटनेची पुनरावृत्ती होणार नाही. याची ते आत्ताच तातडीनं खबरदारी घेतील, अशी अपेक्षा सुजाण व पोलिसांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, या पुण्यातील घटनेनं लहान मुलांमधील मोबाईल व गेमिंगचं व्यसन ही चिंतेची बाब बनली असून पालक व शिक्षकांनीच यातून मार्ग काढला पाहिजे, असेही मत व्यक्त होत आहे. 

हेही वाचा

Video : ''ते नसतानाही पुण्यात धरण वाहिलंय''; राज ठाकरेंचा अजित पवारांना टोला, पूरस्थितीवरुन निशाणा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे-धनंजय मुंडेंची गुप्त भेट, लोकसभेतील फटका विधानसभेमध्ये बसू नये यासाठी मुंडेंची हालचाल?
मनोज जरांगे-धनंजय मुंडेंची गुप्त भेट, लोकसभेतील फटका विधानसभेमध्ये बसू नये यासाठी मुंडेंची हालचाल?
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 सप्टेंबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 सप्टेंबर 2024 | रविवार
Titvala Crime: विवाहितेवर सासरा, दिर अन् अल्पवयीन मामेभावाने केला आळीपाळीने अत्याचार, टिटवाळ्यात थरकाप उडवणारी घटना
विवाहितेवर सासरा, दिर अन् अल्पवयीन मामेभावाने केला आळीपाळीने अत्याचार, टिटवाळ्यात थरकाप उडवणारी घटना
Jitendra Awhad on Ajit Pawar : अजितदादा बारामती लढणार, सहानभूती निर्माण होण्यासाठी प्रयत्न; आता दादांच्या 'जिथं पिकतं तिथं विकत नसतं'वरून जोरदार पलटवार!
अजितदादा बारामती लढणार, सहानभूती निर्माण होण्यासाठी प्रयत्न; आता दादांच्या 'जिथं पिकतं तिथं विकत नसतं'वरून जोरदार पलटवार!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule VS Ajit Pawar : माझ्या सकाळ उठण्याची चेष्ठा, सुळेंच्या टीकेला अजितदादांचं उत्तरSanjay Raut VS Ajit pawar : खंत वाटणे हे नाटक, संजय राऊतांचा अजित पवारांना टोलाAmol Mitkari On Ajit Pawar :  अजितदादांच्या वक्तव्यावर अमोल मिटकरी म्हणतात, दादांनी खंत व्यक्त केलीABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7PM 08 September 2024 Latest News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनोज जरांगे-धनंजय मुंडेंची गुप्त भेट, लोकसभेतील फटका विधानसभेमध्ये बसू नये यासाठी मुंडेंची हालचाल?
मनोज जरांगे-धनंजय मुंडेंची गुप्त भेट, लोकसभेतील फटका विधानसभेमध्ये बसू नये यासाठी मुंडेंची हालचाल?
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 सप्टेंबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 सप्टेंबर 2024 | रविवार
Titvala Crime: विवाहितेवर सासरा, दिर अन् अल्पवयीन मामेभावाने केला आळीपाळीने अत्याचार, टिटवाळ्यात थरकाप उडवणारी घटना
विवाहितेवर सासरा, दिर अन् अल्पवयीन मामेभावाने केला आळीपाळीने अत्याचार, टिटवाळ्यात थरकाप उडवणारी घटना
Jitendra Awhad on Ajit Pawar : अजितदादा बारामती लढणार, सहानभूती निर्माण होण्यासाठी प्रयत्न; आता दादांच्या 'जिथं पिकतं तिथं विकत नसतं'वरून जोरदार पलटवार!
अजितदादा बारामती लढणार, सहानभूती निर्माण होण्यासाठी प्रयत्न; आता दादांच्या 'जिथं पिकतं तिथं विकत नसतं'वरून जोरदार पलटवार!
अजित पवारांचं बारामतीतील 'ते' वक्तव्य नेमकं कशामुळे? सुनेत्रा पवारांच्या पराभवामुळे की..; राष्ट्रवादी प्रवक्ते उमेश पाटील यांनी सांगितले कारण...
अजित पवारांचं बारामतीतील 'ते' वक्तव्य नेमकं कशामुळे? सुनेत्रा पवारांच्या पराभवामुळे की..; राष्ट्रवादी प्रवक्ते उमेश पाटील यांनी सांगितले कारण...
नाशिकमधील तरुणांना रोजगाराची संधी, पाच आकड्यात मानधन; काय आहे 'मुख्यमंत्री योजनादूत' उपक्रम?
नाशिकमधील तरुणांना रोजगाराची संधी, पाच आकड्यात मानधन; काय आहे 'मुख्यमंत्री योजनादूत' उपक्रम?
अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचार करून दगडाने ठेचत संपवलं, पुरोगामी महाराष्ट्रात पुन्हा थरकाप
अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचार करून दगडाने ठेचत संपवलं, पुरोगामी महाराष्ट्रात पुन्हा थरकाप
Manipur CM Biren Singh : दीड वर्ष रक्तरंजित संघर्ष पाहिल्यानंतर मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची चर्चा; 16 तासात दोनदा राज्यपालांना भेटले
दीड वर्ष रक्तरंजित संघर्ष पाहिल्यानंतर मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची चर्चा; 16 तासात दोनदा राज्यपालांना भेटले
Embed widget