एक्स्प्लोर

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारे ठाकरे सरकार पूजा चव्हाणला न्याय देणार का? : चंद्रकांत पाटील

Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे न्याय देणार का, असा प्रश्न भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

पुणे : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापासून अनेक भाजप नेत्यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पूजा चव्हाणला न्याय देणार का? असा प्रश्न विचारला आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे न्याय देणार का? अशा प्रश्नांवर नेहमीच न्याय भूमिका घेणारे बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव तसेच महिलांचा सन्मान करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाटेवर आपण चालतो, असे सांगणारे उद्धव ठाकरे पूजा चव्हाणला न्याय देणार का? असे सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केले आहेत. या प्रकरणात एक मंत्री गुंतले आहेत, हे स्पष्ट झाले आहे. मात्र, पोलीस का चौकशी करत नाही? मुलीचे आई वडील तक्रार देत नसतील तर सुमोटो केस दाखल केली पाहिजे. या सरकारची प्रतिमा डागळत चालली आहे, काही करा काही होत नाही, असे या सरकारच्या काळात झाले आहे, असा घणाघात पाटील यांनी केला.

Sanjay Rathod : मंत्री संजय राठोड नॉट रिचेबल, राठोड नेमके गेले कुठे?

शरद पवार यांनी यात लक्ष घालावे : पाटील एक मंत्री 15 वर्ष एका महिलेसोबत राहतो. महिलेची तक्रार असूनही कारवाई होत नाही तर दुसरा मंत्री कार्यालयात बोलवून मारहाण करतो. या सरकारमध्ये चाललय काय? पूजा चव्हाणच्या निमित्ताने हे सर्व प्रश्न ऐरणीवर आले आहेत. पूर्ण महाराष्ट असुरक्षित झाला आहे. सत्तेसाठी काहीही करणार असे झाले आहे. ज्यांच्या इशाऱ्यावर हे सरकार चालते त्या पवारांनी यात लक्ष घालावे. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पॉवरचा उपयोग करून चौकशी केली पाहिजे. त्यात मंत्री गुंतल्याचे बोलले जाते, त्या मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. त्या मुलीच्या पाळतीवर ठेवलेल्या 2 जणांना अटक का झाली नाही? त्यांना का सोडून दिले. मुलीचा लॅपटॉप जप्त केला पाहिजे. त्याची तपासणी केली पाहिजे. पोलिस गेल्या काही महिन्यात दबावाखाली असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, गेल्या 14 पंधरा महिन्यात अनेकांनी धमक्या दिल्या आम्ही म्हणतो काढा सिड्या कोण आहे दोषी ते कळू द्या आम्ही घाबरत नाही, अशी प्रतिक्रिया खडसे यांच्या सीडी काढतो वक्तव्यावर पाटील यांनी दिली.

डोक्याला आणि मणक्याला दुखापत झाल्याने पूजा चव्हाणचा मृत्यू, शवविच्छेदन अहवाल पोलिसांना सुपूर्द

महत्त्वाच्या बातम्या

Pune Congress VS ABVP Rada : त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
Harshwardhan Sapkal: राहुल गांधींच्या 'छात्रों की गूंज' कार्यक्रमाआधीच पुण्यात मोठा राडा; हर्षवर्धन सपकाळ भडकले, म्हणाले, 'भाडोत्री गुंडांचा हा स्टंट; कार्यक्रम तर होणारच'
राहुल गांधींच्या 'छात्रों की गूंज' कार्यक्रमाआधीच पुण्यात मोठा राडा; हर्षवर्धन सपकाळ भडकले, म्हणाले, 'भाडोत्री गुंडांचा हा स्टंट; कार्यक्रम तर होणारच'
Kho Kho Association : खो-खो असोसिएशनचे कामकाज होणार पेपरलेस, सुनेत्रा पवारांच्या हस्ते 23 जिल्ह्यांच्या सचिवांना लॅपटॉपचे वाटप
खो-खो असोसिएशनचे कामकाज होणार पेपरलेस, सुनेत्रा पवारांच्या हस्ते 23 जिल्ह्यांच्या सचिवांना लॅपटॉपचे वाटप

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NHAI Toll Pass: 'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
Udgir Crime News : तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तीन दिवसाच्या तपासानंतर प्रकार उघड
उदगीरमध्ये तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तपासानंतर प्रकार उघड
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
Jaggery Price Hike : साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
Embed widget