एक्स्प्लोर

बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर चर्चेत आलेला गँगस्टार लॉरेन्स बिष्णोई कोण?; NIA ने काय म्हटलंय, सध्या कुठे, किती गुन्हे

देशाच्या वेगवगेळ्या तुरुंगामध्ये राहून हत्या घडवून आणणारा लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोई आणि साथीदार गोल्डी ब्रार कॅनडात बसून टोळी चालवतात.

पुणे : माजी मंत्री आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील वरिष्ठ नेते बाबा सिद्दिकी (Baba siddique) यांच्या हत्येनंतर गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई हे नाव सध्या चांगलच चर्चेत आहे. आपल्या देशाची राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने केलेल्या तपासात लॉरेन्स बिष्णोई हा फक्त गँगस्टर नसून तो भारतासाठी फुटीरतावादी म्हणून काम करणाऱ्या खलिस्तानवादी संघटनांचा भाग आहे. एनआयएने लॉरेन्स बिश्नोई (Lawrence bishnoi) हा  खलीस्तानवादी दहशतवाद्यांना मदत करत असल्याचा दावा करत त्याच्यावर युएपीए अंतर्गत खटला दाखल केला असून या प्रकरणात तीन चार्जशीट एनआयएने आत्तापर्यंत दाखल केल्या आहेत. या चार्जशीटमध्ये लॉरेन्स बिष्णोई हा कॅनडा आणि पाकिस्तानमधील दशतवाद्यांच्या संपर्कात असल्याचं म्हटलंय. भारत आणि कॅनडामधील संबंध खलिस्तानवादी दशतवाद्यांना कॅनडा शरण देत असल्यानं सध्या तणावाचे बनले आहेत. अशावेळी लॉरेन्सबाबत समोर आलेली माहिती धक्काय्यदक ठरणारी आहे . 

देशाच्या वेगवगेळ्या तुरुंगामध्ये राहून हत्या घडवून आणणारा लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोई आणि साथीदार गोल्डी ब्रार कॅनडात बसून टोळी चालवतात. नुकतीच झालेली बाबा सिद्दिकींची हत्या, पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची हत्या, करणी सेनेचा प्रमुख प्रदीप कुमार यांची हत्या अशा एक ना अनेक हत्या लॉरेन्स आणि त्याच्या टोळीने नजीकच्या काळात घडवून आणल्या आहेत. मात्र, या गुन्हेगारी कृत्यांबरोबरच लॉरेन्स बिष्णोई हा भारतासाठी फुटीरतावादी असलेल्या खलिस्तानवादी चळवळीला देखील मदत करत असल्याचं एनआयए ला तपासात आढळून आलंय.   

सध्या साबरमती कारागृहात

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई हा सध्या गुजरामधील साबरमती कारागृहात आहेत. लॉरेन्स बिश्नोई सध्या साबरमती कारागृहातील सर्वात सुरक्षीत अंडा सेलमध्ये कैद आहे. बिष्णोई यांच्या सेलभोवती सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते. वारंवार प्रयत्न करूनही मुंबई पोलिसांना  लॉरेन्स बिश्नोईची पोलीस कोठडी मिळाली नाही.  कारण सलमानच्या घराबाहेर गोळीबार करण्याच्या प्रकरणात मुख्य आरोपी आहे.

लॉरेन्सवर कुठे व काय-काय गुन्हे

2022 मध्ये एन आय ने लॉरेन्सवर देशविघातक कृत्यांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून UAPA अंतर्गत खटला दाखल केला असून 2023 आणि 2024 मध्ये आणखी दोन चार्जशीट त्याच्यावर दाखल.
 
एनआयएने 6 जानेवारी 2024 ला प्रसिद्ध केलेल्या प्रेसनोटमध्ये लॉरेन्स बिष्णोई आणि खलिस्तानवादी दहशतवाद्यांच्या हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशातील चार मालमत्ता जप्त केल्याचं म्हटलंय. 

पंजाब पोलिसांवर हल्ल्ला करणारा खलिस्तानवादी दहशतवादी आकाश सिंगला लॉरेन्सने मदत केल्याचा आरोप आहे 

लॉरेन्सच्या टोळीतील जोगिंदर सिंगने त्याची फॉर्च्युनर कार दहशतवाद्यांना शस्त्रांची वाहतूक करण्यासाठी वापरू दिल्याचं एन आय एने म्हटलंय 

लॉरेन्सच्या टोळीतील दलिप कुमारने त्याच्या जागेचा उपयोग दहशतवाद्यांना लपवण्यासाठी केल्याचा एनआयएचा दावा आहे. याच प्रेसनोटमध्ये लॉरेन्स हा पाकिस्तान आणि कॅनडातील दशतवाद्यांशी संपर्कात असल्याचं एनआयने म्हटलंय 

गुजरात एटीएसने देखील लॉरेन्सवर देशविघातक कृत्यांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून वेगळा खटला दाखल केलाय 

परदेशात लपलेल्या दहशतवाद्यांना भारतात आणले

भारतासाठी मोस्ट वॉंटेड असलेल्या आणि परदेशात लपून बसलेल्या दहशतवाद्यांना इंटेलिजन्स एजन्सीजच्या  मदतीने एनआयएने परदेशातून भारतात खेचून आणण्यात नजीकच्या काळात यश मिळवलय. ज्यामध्ये तरण- तारण इथल्या बॉंबस्फोटासाठी जबादार विक्रमजितसिंगला ऑस्ट्रियातून भारतात खेचून आणण्यात आलंय . तर लुधियाना कोर्ट कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या स्फोटातील आरोपी कुलविंदरसिंग हरप्रीत सिंग, परमिंदर सिंग आणि अबूबकर हाजी यांना देखील एनआयएने परदेशातून खेचून आणण्यात यश मिळवलं. हे सर्व लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संपर्कात होते असं एनआयएने 26 ऑगस्ट 2023 ला प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय . 

लॉरेन्स नवा दाऊद होण्याच्या मार्गावर

एकीकडे लॉरेन्स बिष्णोई सोशल मीडियाचा उपयोग करून त्याची वेगळी इमेज तयार करत आलाय. त्याच्या या आभासी प्रतिमेला भुलून देशातील वेगवगेळ्या राज्यातील 700 पेक्षा अधिक तरुण त्याच्या टोळीत ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले आहेत, आणि त्याच्या इशाऱ्यावरून हत्या करत आहेत. नुकत्याच झालेल्या बाबा सिद्दीकींच्या हत्येतील आरोपी असोत किंवा सिद्धू मुसेवालाच्या हत्या प्रकरणात पकडण्यात आलेले पुणे जिल्ह्यातील संतोष जाधव, सिद्धेश कांबळे आणि नवनाथ सूर्यवंशी हे तीन तरुण असोत. हे सगळे लॉरेन्स बिश्नोईंच्या या खोट्या प्रतिमेला भुलुनच त्याच्या टोळीत सहभागी झाले आणि त्यांनी हत्या घडवून आणल्या. मात्र, लॉरेन्स बिश्नोईंचे खलिस्तानवादी दहशतवाद्यांना मदत करणं हे अशा तरुणांच्या डोळ्यात अंजन घालणारं ठरणार आहे. लॉरेन्स बिश्नोईंबाबत कळत-नकळत सहानुभूती बाळगणाऱ्या अनेकांना त्याच हे खरं रूप पाहून धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच लॉरेन्स बिष्णोई हा नवीन दाऊद इब्राहिम होण्याच्या मार्गावर आहे, असं एनआयएने म्हटलंय . 

तुरुंगातही मिळतायत सुविधा

ऐंशीच्या दशकात खलिस्तानवादी संघटनेचा म्होरक्या भिंद्रनवालेला तत्कालीन राजकारण्यांनी क्षणिक फायद्यासाठी मोठं केलं . पण पुढे हा भस्मासुर उलटला. त्यातून  देशात हत्या आणि हिंसेचं सत्र अनेकवर्ष सुरु राहिलं . लॉरेन्स बिश्नोईंच्या बाबतीत देखील तीच चूक केली जातेय का ? तुरुंगात राहून देखील त्याला मोबाईल, इंटरनेट आणि इतर सर्व सुविधा मिळत असल्यानं, त्याची टोळी वेगाने वाढत असल्यानं हा प्रश्न उपस्थित होतोय. 

हेही वाचा

चंद्रकांत पाटील कोथरुडमधून रिंगणात, भाजपचे पहिले 10 मतदारसंघ ठरले, 2 मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब: सूत्र

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
Embed widget