Pune Weather Update: पुण्यासह अनेक भागात आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
Pune Weather Update: आज मुंबईसह पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. घाट माथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर, इतर ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुणे: राज्याच्या काही भागात आज मुसळधार पावसाचा (Heavy Rain) अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला असून अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा (Heavy Rain) अंदाज आहे. आज मुंबईसह पुणे (Mumbai) जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. घाट माथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर, इतर ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राज्याच्या अनेक भागात पावसामुळे अनेक भागात नद्या-नाले दुधडी भरून वाहत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.
सोमवारी शहरात 7.1 मीमी पावसाची नोंद
काल(सोमवारी) पुणे (Pune) शहरात 7.1 मीमी पावसाची नोंद झाली आहे. राज्यात काल मुसळधार पावसाने हजेरी लावली. राज्यातील घाटमाथ्यावर 260 मिमी पावसाची नोंद गेल्या 24 तासांमध्ये झाली आहे. काल 22 जुलै अखेर शहरात 1 जून ते 22 जुलै या 52 दिवसांत 374 मिमी पावसाची नोंद झाली आहे. शहरात सरासरी 20 ते 37 मिमी इतकाच मोठा पाऊस शहरात झाला आहे. सोमवारी 22 जुलै रोजी शहरात पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली.
सोमवारी शहरात झालेला पाऊस (मि.मी.मध्ये)
शिवाजीनगर 7.1, एनडीए 11.5, वडगाव शेरी 10, चिंचवड 9, पाषाण 7.2, दापोडी 5, हडपसर 2, कोरेगाव पार्क 1, लवळे 1, मगरपट्टा 1
राज्याच्या कोणत्या भागात आज मुसळधार पावसाची शक्यता
आज राज्यात मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर रायगड, कोल्हापूर आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमध्येही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुढील आणखी 1-2 दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाकडून आज रत्नागिरी, सातारा जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रायगड, पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबईसह उपनगरात संततधार पाऊस कायम राहणार असून मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार आणि विदर्भ या भागांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात काही प्रमाणात पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात देखील हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पावसाचा (Rain) अंदाज आहे. उत्तर आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह (Heavy Rain Alert) पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.