(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Metro News: पुणे मेट्रोचं काम जोमात; वनाज ते शिवाजीनगर लवकरच धावणार
पुणे मेट्रोचं काम वेगाने सुरु आहे. त्यामुळे आता लवकरच पुणे मेट्रो वनाज ते शिवाजीनगर असा प्रवास करणार आहे.
Pune Metro News: पुणे मेट्रोचं काम वेगाने सुरु आहे. त्यामुळे आता लवकरच पुणे मेट्रो वनाज ते शिवाजीनगर असा प्रवास करणार आहे. वनाज ते शिवाजी नगर न्यायालय या मार्गावर जोरात काम सुरु होतं. याच मार्गावरील व्हायाडक्ट म्हणजेत दोन खांबांना जोडण्याचं काम पुर्ण झालं आहे. पुण्यातील मेट्रोचा हा महत्वाचा टप्पा मानल्या जात होता. त्यामुळे लवकरच प्रवासी सेवा सुरु करण्याच्या तयारी मेट्रो प्रशासन आहे.
सुरुवातील वनाज ते गरवारे कॉलेजपर्यंत मेट्रोचं काम पुर्ण झालं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मेट्रोचं उद्घाटनही करण्यात आलं होतं. त्यानंतर पुणे मेट्रोच्या कामाला वेग आला. प्रत्येक परिसरात सतत काम सुरु होतं. त्यामुळे आता लवकरत पुणेकरांना वनाज ते शिवाजीनगर असा मेट्रो प्रवास करता येणार आहे.
पुणे मेट्रोचं काम टप्प्यात विभागल्या गेलं आहे. एक टप्पा पिंपरी-चिंचवड स्थानक ते शिवाजीनगर सत्र न्यायालय, वनाज ते शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय, रामवाडी स्थानक ते शिवाजीनगर स्थानक, तसेच भूमिगत मार्गिकेपैकी स्वारगेट स्थानक ते शिवाजीनगर सत्र न्यायालय, रेंज हिल स्थानक ते शिवाजीनगर असे कामाचे टप्पे करण्यात आले आहेत.
पुणे मेट्रो विस्तरणार; पुलगेट, हडपसर परिसरात धावणार मेट्रो
पीएमआरडीए (PMRDA) आणि ‘महामेट्रो’कडून सुमारे 43 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गाच्या विस्तारीकरणाचे नियोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे हिंजवडी ते शिवाजीनगर हा 23 किलोमीटर लांबीच्या मार्गासह एकूण 66 किलोमीटर लांबीचे मेट्रोचे जाळे शहरात निर्माण होणार आहे. त्यामध्ये खडकवासला ते स्वारगेट, हडसपर ते सासवड आणि स्वारगेट ते रेसकोर्स या मार्गांचा समावेश आहे.
पिंपरी-चिंचवड ते स्वारगेटया मेट्रो प्रकल्पाचे काम महामेट्रोने हाती घेतले आहे तर हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पाचे काम पीएमआरडीएने हाती घेतले आहे. त्यानुसार हिंजवडी ते शिवाजीनगर हा मार्ग लोणीकाळभोरपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय पीएमआरडीएने घेतला तर खडकवासला ते खराडी हा 28 किलोमीटरचा मार्ग होणार आहे. विस्तारित मेट्रो मार्ग हा शिवाजीनगर, पुलगेट, हडपसर आणि लोणीकाळभोर तर एक फाटा सासवड रोडवर असा आहे. महामेट्रोचा खडकवासला हा मार्ग स्वारगेट, पुलगेट-हडपसर फाटा ते खराडी असा आहे.