Vinayak Mete: विनायक मेटेंचा पाठलाग करणारी कार आणि कार मालक रांजणगाव पोलिसांच्या ताब्यात; चौकशी सुरु
3 ऑगस्ट रोजी विनायक मेटे त्यांच्या एका कार्यकर्त्यासमवेत पुण्याच्या दिशेने येत असताना हा प्रकार घडल्याचं त्यांनी सांगितलं आहे. स्थानिक पत्रकाराशी संवाद साधतानाची त्यांची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली होती.
Vinayak Mete: शिवसंग्रामचे कार्यकर्ते यांनी विनायक मेटेंच्या गाडीचा दोन किलोमीटरपर्यंत पाठलाग झाल्याचा दावा केला होता. 3 ऑगस्ट रोजी विनायक मेटे त्यांच्या एका कार्यकर्त्यासमवेत पुण्याच्या दिशेने येत असताना हा प्रकार घडल्याचं त्यांनी सांगितलं होतं. स्थानिक पत्रकाराशी संवाद साधतानाची त्यांची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली होतं. त्यानुसार पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
रांजणगाव पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवंत मांडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 ऑगस्टला एक गाडी विनायक मेटे यांना फॉलो करत असल्याचा आरोप कार्यकत्यांनी केला होता. त्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरु केली होती. या संदर्भातली ऑडियो क्लिपदेखील व्हायरल झाली होती. रांजणगाव पोलिसांनी या प्रकरणावर लगेच कारवाई करत ती गाडी आणि गाडी मालकाला ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याकडून पोलीसांनी विचारपूस केली आहे. फॉलो करत असलेल्या गाडीतील 6 जणांपैकी एकाचा वाढदिवस असल्या कारणाने ते शिरूरला गेले होते तसेच त्यांचे नातेवाईक देखील शिरूर मध्ये असल्या कारणाने होते त्या कारणाने ते गेले, असे चौकशीमधून समोर आले आहे.
भाच्याचा ड्रायव्हरवर संशय
विनायक मेटे यांचे भाचे बाळासाहेब चव्हाण यांनी अपघातावरुन ड्रायव्हरवर आरोप केले आहे. हा घातपात का अपघात हे निष्पन्न झाले नाही. ड्रायव्हर रोज आपलं स्टेटमेंट बदलत आहे. त्यामुळे आम्हाला शंका येत आहे. निधनाच्या दुःखातून सावरलो नाही मात्र 3 दिवसानंतर आम्ही मीडिया समोर यायचं ठरवल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
दोन-अडीच किलोमीटरपर्यंत केला होता पाठलाग...
पुढे आयशर आणि मागे चारचाकी असा खेळ तब्बल दोन-अडीच किलोमीटरपर्यंत सुरु होता. चारचाकीमधील लोकं हात करून गाडी पुढे थांबवा म्हणून सांगत होते. खुद्द मेटे हे सर्व पाहत होते. त्यामुळे चालकाला गाडी दमाने घे, जाऊ दे त्यांना जायचं असेल तर अशा सूचनाही त्यांनी केल्या होत्या. तर नेमकं हे कार्यकर्ते कोण आहेत आपण पाहू तरी गाडी बाजूला थांबवू असेही मेटे यांना सांगितले होते. पण त्यांनी जाऊ दे म्हंटले. रात्रीचा घडलेला प्रकार मी अनेकांना सांगितला होता, असेही मायकर म्हणाले.