एक्स्प्लोर

Raj Thackeray Posters : सोयीनुसार आणि सुपारीनुसार पोकळ हिंदुत्त्व...राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरुन पुण्यात पोस्टर

Raj Thackeray Posters : राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा करताच त्यांना खास पुणेरी शैलीत प्रत्युत्तर मिळालं आहेत. त्यांनीच काही वर्षांपूर्वी रेखाटलेल्या व्यंगचित्राची आठवण करु देणारे हे पोस्टर्स आहेत.

पुणे : पुणेकर आणि पुणेरी पाट्या देशातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहेत. अतिशय खोचक, नेमक्या आणि शब्दात असलेल्या पाट्या सगळ्याचं लक्ष वेधून घेतात. काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे पोस्टर पुण्यात झळकले होते. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पोस्टर पुण्यात ठिकठिकाणी लागले आहेत.

राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा करताच त्यांना खास पुणेरी शैलीत प्रत्युत्तर मिळालं आहेत. पुण्यात जागोजागी त्यांनीच काही वर्षांपूर्वी रेखाटलेल्या व्यंगचित्राची आठवण करु देणारे होर्डिंग्ज लागले आहेत. आज शहरात सकाळी फेरफटका मारताना पुण्यातील अलका टॉकीज चौक, गुडलक चौक तसंच कोथरुडमधील करिष्मा चौक अशा अनेक भागांमध्ये हे होर्डिंग्ज लागलेले पाहायला मिळाले. 

या होर्डिंगवर भाजप रामाचं राजकारण करतंय असल्याचं सांगत लोकांनी रामराज्य मागितले राम मंदिर नव्हे, असा टोला राज ठाकरेंनी लगावला आहे. या पोस्टरवर लिहिलं आहे की, "राज ठाकरेंनी स्वत:च काढलेले एक व्यंगचित्र.... अशी वेळ कोणावरही येऊ नये. उद्धवसाहेब ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला आणि श्री राम मंदिरला विरोध करुन व्यंगचित्र काढणारे राज ठाकरेंना शेवटी अयोध्येत जावे लागणार आहे. सोयीनुसार आणि सुपारीनुसार पोकळ हिंदुत्त्व..."

दरम्यान, या पोस्टरवर मजकुरामध्ये उद्धवसाहेब म्हटलं आहे. त्यामुळे हे पोस्टर शिवसेना किंवा त्याचाच भाग असलेल्या युवासेनेने लावले असल्याची चर्चा आहे.

5 जून रोजी राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात अयोध्येला जाणार असल्याचे जाहीर केले होते. पण त्यावेळी त्यांनी तारीख सांगितली नव्हती. पुणे दौऱ्यावर असताना राज ठाकरे यांनी रविवारी (17 एप्रिल) पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा केली. 5 जून रोजी राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. या अयोध्या दौऱ्यात कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. कार्यकर्त्यांना अयोध्येत जाण्यासाठी मनसेकडून ट्रेन बुक करण्यात येणार आहे. 10 ते 12 ट्रेन बुक करण्यात येणार असल्याचं समजतं.

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्री राज्याचं वाळवंट करतायेत, कर्जतचा प्रकल्प पर्यावरण पूरक कसा? टोरेंट पॉवर कंपनीच्या प्रकल्पावरुन आदित्य ठाकरेंचा थेट हल्लाबोल 
मुख्यमंत्री राज्याचं वाळवंट करतायेत, कर्जतचा प्रकल्प पर्यावरण पूरक कसा? टोरेंट पॉवर कंपनीच्या प्रकल्पावरुन आदित्य ठाकरेंचा थेट हल्लाबोल 
Pune Crime News: चारित्र्यावर संशय; नवऱ्यानं औषधामधून ब्लेडचे तुकडे खायला घातले; बायकोनं जबाब बदलला पण..., कोर्टानं दिली सात वर्षे सक्तमजुरीच्या शिक्षेसह, 70 हजारांचा दंड, नेमकं काय प्रकरण?
चारित्र्यावर संशय; नवऱ्यानं औषधामधून ब्लेडचे तुकडे खायला घातले; बायकोनं जबाब बदलला पण..., कोर्टानं दिली सात वर्षे सक्तमजुरीच्या शिक्षेसह, 70 हजारांचा दंड, नेमकं काय प्रकरण?
Pune Crime News: पोलिसांना टीप मिळाली; रिसॉर्टवर बनावट गिऱ्हाईक पाठवलं अन्....; भोरमध्ये रिसॉर्टमधून 13 मुलींची केली सुटका, हजार रूपयांसाठी नको ते करायला लावलं
पोलिसांना टीप मिळाली; रिसॉर्टवर बनावट गिऱ्हाईक पाठवलं अन्....; भोरमध्ये रिसॉर्टमधून 13 मुलींची केली सुटका, हजार रूपयांसाठी नको ते करायला लावलं
Satej Patil: 'माझी पलीकडील 12 लोकांना विनंती आहे, सहकारात आदर्श ठेवायचा असेल तर..' गोकुळच्या अध्यक्ष निवडीवर सतेज पाटलांचे सूचक भाष्य; हसन मुश्रीफ, विनय कोरेंचं नाव घेत म्हणाले...
'माझी पलीकडील 12 लोकांना विनंती आहे, सहकारात आदर्श ठेवायचा असेल तर..' गोकुळच्या अध्यक्ष निवडीवर सतेज पाटलांचे सूचक भाष्य; हसन मुश्रीफ, विनय कोरेंचं नाव घेत म्हणाले...

व्हिडीओ

NCP Finance Ministry : अर्थखातं राष्ट्रवादी मिळणार? मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा झाली?Special Report
Vivek Padit Majha Katta : आदिवासींच्या हक्कासाठी लढणारे विवेक पंडित माझा कट्ट्यावर
Mann Suddha Tujha Season 3 : गवताची पेंढी | मन सुद्ध तुझं | Episode 4 | ABP Majha
Cordelia Cruise Arrives in Mumbai : पंचतारांकीत जहाज, सफर खास! | Special Report ABP Majha
KBC Farmers Kailas Kuntewad : केबीसीत जिंकले... पण दुष्काळासमोर हरले | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PAK vs ENG :  दहाव्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी, 154 वर 9 विकेट गेल्यानंतरही मैदान सोडलं नाही, पाकिस्तानच्या विजयाचा हिरो शादाब खाननं इतिहास भूगोल बदलून टाकला
154 वर 9 विकेट गेल्या, मॅच संपल्यात जमा, शादाब खाननं 10 व्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी करत क्रिकेटचा इतिहासच बदलला 
Aadhaar Email Update : आधार कार्डमध्ये ई-मेल आयडी ॲपमधून मोफत अपडेट कसा करायचा? 'या' तारखेनंतर शुल्क द्यावं लागणार
आधार कार्डमध्ये ई-मेल आयडी ॲपमधून मोफत अपडेट कसा करायचा? 'या' तारखेनंतर शुल्क द्यावं लागणार
Mumbai Indians : हार्दिक पांड्यानं साथ सोडल्यास मुंबई इंडियन्सचा पुढील कॅप्टन कोण? हिटमॅन रोहित शर्माच्या नावाला थेट RCB च्या कोचचा सपोर्ट  
हार्दिक पांड्यानं साथ सोडल्यास मुंबई इंडियन्सचा पुढील कॅप्टन कोण? हिटमॅन रोहित शर्माच्या नावाला कुणाकडून पसंती?
Gold Price :  ऑगस्ट महिन्यातील उच्चांकावरुन चांदी 56000 रुपयांनी स्वस्त, सोने दरात 23000 रुपयांची घसरण, सोने चांदीचे दर कशामुळं कोसळले?  
सोने चांदीचे दर कशामुळं कोसळले? ऑगस्टमधील उच्चांकाच्या तुलनेत सोनं 23 हजारांनी स्वस्त
Loan : जगातील अनेक देश कर्जात अडकले, अमेरिका, फ्रान्स ते भारतापर्यंत कोणत्या देशांवर किती कर्ज? सर्वाधिक कर्ज 'या' देशावर
जगातील बडे देश कर्जाच्या जाळ्यात अडकले, अमेरिका, फ्रान्स ते भारतापर्यंत कोणावर किती कर्ज?
Gold Silver Rate : चार दिवसांमध्ये चांदीचे दर गडगडले, चांदीचे दर 16000 रुपयांनी घसरले, सोन्याचे दर कोसळले
चार दिवसांमध्ये चांदीचे दर गडगडले, चांदीचे दर 16000 रुपयांनी घसरले, सोन्याचे दर कोसळले
अरुणाचल प्रदेशात NHPC कार्यालय, पोलीस ठाणे पेटवलं; भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदाराच्या घराची सुद्धा तोडफोड, अनेक पोलीस जखमी, सियांग प्रकल्पाला कडाडून विरोध
अरुणाचल प्रदेशात NHPC कार्यालय, पोलीस ठाणे पेटवलं; भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदाराच्या घराची सुद्धा तोडफोड, अनेक पोलीस जखमी, सियांग प्रकल्पाला कडाडून विरोध
Donald Trump: अमेरिका आज इराणवर हल्ला करणार? ट्रम्प म्हणाले, आम्हाला एका मोठ्या कराराची आशा, इराणने अण्वस्त्रे बनवू नयेत अशी आमची इच्छा
अमेरिका आज इराणवर हल्ला करणार? ट्रम्प म्हणाले, आम्हाला एका मोठ्या कराराची आशा, इराणने अण्वस्त्रे बनवू नयेत अशी आमची इच्छा
Embed widget