पुण्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन बिबट्यांचा मृत्यू
कल्याण-नगर मार्गावरील ओतूर आणि उदापूर गावांच्यामध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे लोणावळ्याच्या सहारा अँम्बी व्हॅलीतही एक बिबट्या मृतावस्थेत आढळला.

पिंपरी : कल्याण-नगर मार्गावरील ओतूर आणि उदापूर गावांच्यामध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला आहे. अपघातात बिबट्याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले होते. बिबट्याल उभंही राहता येत नव्हतं. जखमी अवस्थेत बिबट्या रस्त्यावर पडला होता. त्यावेळी एका व्यक्तीने हिंमत करत जखमी बिबट्याला रस्त्याच्या बाजूला केलं.
काही वेळातच जुन्नर बिबट्या निवारा केंद्राची रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली. त्यानंतर बिबट्यावर उपचार करण्यात आले. मात्र काही वेळातच बिबट्याचा मृत्यू झाला.
दुसरीकडे लोणावळ्याच्या सहारा अॅम्बी व्हॅलीतही एक बिबट्या मृतावस्थेत आढळला. एका ठिकाणी शिकारीसाठी जाड वायरचा फास लावून ठेवण्यात आला होता. त्याचा फास लागल्यानं बिबट्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे लोणावळ्यात वन्य प्राण्यांच्या जीवावर कोण उठलंय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
