पुण्यात कठडा तोडून टँकर नदीपात्रात कोसळला, दोघांचा मृत्यू
पुण्यातील शिवाजीनगर भागात पहाटेच्या सुमारास एक टँकर पुलाचा कठडा तोडून नदीत कोसळला. यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
![पुण्यात कठडा तोडून टँकर नदीपात्रात कोसळला, दोघांचा मृत्यू two dead in truck accident in pune पुण्यात कठडा तोडून टँकर नदीपात्रात कोसळला, दोघांचा मृत्यू](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/07/21111138/truck-accidnet.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : पुण्यातील शिवाजीनगर भागात पहाटेच्या सुमारास एक टँकर पुलाचा कठडा तोडून नदीत कोसळला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यापैकी एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. दरम्यान दुसरा मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहे.
टँकर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघाताची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले असून क्रेनच्या सहाय्याने टँकर बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
टँकर नदीतून बाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत घेण्यात येत आहे. पहाटे साडेचारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. टँकर चालक चंद्रकांत शिवअणा यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. विजय गायकवाड यांचा हा टँकर असल्याचं समोर येत आहे.
अपघात झालेला एमएच- 42 टी- 7312 नंबरचा हा टँकर सिमेंट वाहतुकीसाठी वापरण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
शिवाजीनगर कोर्टासमोरून स्टेशनकडे जाणारा हा प्रमुख रस्ता आहे. अपघातानंतर आज दिवसभर हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)