Pimpri chinchwad : गॅस चोरी स्फोट प्रकरणी पोलीस अॅक्शन मोडवर; दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक, 4 बिट मार्शल निलंबित
गॅस चोरी स्फोट प्रकरणी सहा पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे. त्यामध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक परवेझ शिकलकर, सहाय्यक निरीक्षक बालाजी ठाकूर आणि चार बिट मार्शल यांचा समावेश आहे.
![Pimpri chinchwad : गॅस चोरी स्फोट प्रकरणी पोलीस अॅक्शन मोडवर; दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक, 4 बिट मार्शल निलंबित Two assistant police inspectors and 4 bit marshals suspended in gas theft case Pimpri chinchwad Pune Crime News Pimpri chinchwad : गॅस चोरी स्फोट प्रकरणी पोलीस अॅक्शन मोडवर; दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक, 4 बिट मार्शल निलंबित](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/10/36896fc362da03887bfc451cfdae78a41696920162728442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : गॅस चोरीच्या गोरखधंद्यावेळी झालेल्या नऊ स्फोटानंतर आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी पोलिसांची जाहीर खरडपट्टी केल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अँक्शन मोडमध्ये आलं आहे. या प्रकरणात सहा पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे. त्यामध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक परवेझ शिकलकर, सहाय्यक निरीक्षक बालाजी ठाकूर आणि चार बिट मार्शल यांचा समावेश आहे.
पुणे बंगलोर महामार्गावर रविवारी रात्री अवैध रित्या गॅस टँकरमधून गॅस भरत असताना नऊ सिलेंडरचे स्फोट होवून अग्नितांडव झाले होते. त्यानंतर पोलिसांच्या कार्य शैलीवर प्रश्न उपस्थित केला जात होता. आता पोलिसांना निलंबित केले असले, तरी येवढ्या मोठ्या प्रमाणात गॅस चोरी झाल्याचे समोर आल्याने पोलिसांचे अपयश अधोरेखित झालं आहे.
नेमकं काय घडलं?
ताथवडे येथील जेएसपीएम संस्थेला लागून असलेल्या जागेत रविवारच्या रात्री पावणे अकरा वाजता एक ब्लास्ट झाला. त्यानंतर एकामागोमाग एक असे तब्बल नऊ स्फोट झाले होके. या स्फोटांनी शहर अक्षरशः हादरून गेलं होतं. तर स्थानिकांनी भीतीपोटी घरातून बाहेर पडत, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धावपळ केली होती. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं होतं. तासाभरात जवानांनी आग आटोक्यात आणली होती. आगीचं रौद्ररूप हे काही किलोमीटर अंतरावरून ही जाणवत होतं. त्यामुळं साहजिकच या आगीच्या झळा लगत असणाऱ्या जेएसपीएम संस्थेच्या ब्लॉसम शाळेतील तीन बसेसला बसल्या होत्या. पण हा स्फोट टँकरमधून गॅसची चोरीचा गोरखधंदा सुरू असताना झाल्याची धक्कादायक बाब समोर आली. तब्बल सत्तावीस सिलेंडर घटनास्थळी आढळले. त्यातील नऊ स्फोट झाल्यानं परिसर छिन्न-विछिन्न झालं होतं, दहा भरलेले तर आठ भरल्यानंतर लिकेज झालेल्या अवस्थेत होते. सोबतच एकावेळी पाच टाक्यांमध्ये गॅस चोरी करता येईल, असे नोजल, वजनकाटा आणि काळाबाजारासाठी अपेक्षित साहित्य ही हाती लागलं. मध्यरात्री ही कारवाई पार पडली आणि सोमवारी सकाळीच आरोग्य मंत्री तानाजी सावंतांनी थेट घटनास्थळी धाव घेतली होती.
अन् तानाजी सावंत भडकले!
सुदैवाने ही घटना रात्री घडली, दिवसा घडली असती तर माझ्या शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला असता. इथं होणारा गॅस चोरीचा गोरखधंदा हा दोन नंबरने सुरु होता आणि त्याला पोलीसच जबाबदार आहेत, स्फोटक रसायनांची वाहतूक करणारी वाहन नागरी वस्तीत पार्क करण्याची परवानगी कोणी अन का दिली? इथं काय-काय चालतं याची सगळी माहिती माझ्याकडे आहे.' असा गंभीर आरोप सावंतांनी केला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)