एक्स्प्लोर
पिंपरीत तीन वर्षीय चिमुकल्याला कोचिंग क्लासच्या शिक्षिकेची अमानुष मारहाण
पिंपळे गुरवमध्ये तीन दिवसापूर्वी ही घटना घडली असून सांगवी पोलिसांनी तक्रार घेतली नसल्याचा आरोप पालक आणि नातेवाईकांनी केला आहे.
पिंपरी चिंचवड : कोचिंग क्लासच्या शिक्षिकेने तीन वर्षाच्या विद्यार्थ्याला अमानुषपणे मारहाण केल्याचा प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये समोर आला आहे. पिंपळे गुरवमध्ये तीन दिवसापूर्वी ही घटना घडली असून सांगवी पोलिसांनी तक्रार घेतली नसल्याचा आरोप पालक आणि नातेवाईकांनी केला आहे.
लाकडी पट्टीने या मुलाच्या डोक्यात, हातावर आणि पाठीवर मारण्यात आलं. हा मार इतका जोरात होता, ज्यामुळं मुलाचे डोळेही सुजले आहेत. मुलाला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र कुटुंबीय तिथून निघून गेले, असा दावा पोलिसांनी केला आहे.
देव कश्यप असं या तीन वर्षीय मुलाचं नाव आहे. शिक्षिकेकडून मारहाण केल्यामुळे संतप्त नातेवाईकांनी तक्रार देण्यासाठी पोलिस स्टेशन गाठलं. मात्र पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप देवच्या नातेवाईकांनी केला आहे. देवचे सुजलेले डोळे पाहूनच शिक्षिकेने केलेली मारहाण किती अमानुष होती, याची कल्पना येते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण
Advertisement