(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Accident News: मोठा अनर्थ टळला! 80 वर्ष जुन्या वाडाच्या पायऱ्या कोसळल्या; 6 व्यक्तींची सुखरुप सुटका
पुण्यातील शुक्रवार पेठेतील नेहरु चौकातील तीन मजली जुन्या वाड्याच्या भींतीचा काही भाग आणि जीना कोसळल्याची घटना घडली आहे. कारंडे वाडा असं या वाड्याचं नाव असून हा वाडा 80 वर्ष जुना आहे.
Pune Accident News: पुण्यातील (Pune) शुक्रवार पेठेतील नेहरु चौकातील तीन मजली जुन्या वाड्याच्या भींतीचा काही भाग आणि जीना कोसळल्याची घटना घडली आहे. कारंडे वाडा (karande wada) असं या वाड्याचं नाव असून हा वाडा 80 वर्ष जुना आहे. साधारण सकळी साडे-सातच्या सुमारास ही घटना घडली. अडकलेल्या 6 रहिवाशांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरुप सुटका केली आहे.
साधारण साडे-सातच्या सुमारास अग्निशमन दलाच्या कंट्रोलरुम मध्ये जीना कोसळल्याचा फोन आला. त्यानंतर काही वेळातच अग्निशमन दलाचे जवान घटना स्थळी पोहचले. त्यावेळी कारंडे वाड्यात 6 व्यक्ती अडकून पडले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोराच्या साहय्याने 6 व्यक्तींना प्रयत्नांची पराकाष्ठा करत बाहेर काढले. या सगळ्या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. जीना आणि भींतीचा काही भाग कोसळला होता. जीन्यात काही व्यक्ती अडकले होते. त्यांना देखील बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे. या वाड्यात एकून तीन कुटुंब राहतात.
पुण्यतीसल जुने वाडे जीर्ण झाले आहेत. त्यामुळे हे वाडे धोकादायक झाले आहे. त्यामुळे पावसाळ्यापुर्वी हे वाडे सोडा, अशा प्रकारच्या नोटीसा पुणे महानगरपालिकेने नागरिकांना बजावल्या होत्या त्यानंतर पावसाळ्यापूर्वी शहरातील विविध भागातील 38 हून अधिक अतिधोकादायक वाडे पाडण्यात आले आहेत. एक-दोन नाहीतर तब्बल 478 वाडे धोकादायक असल्याचं निदर्शनास आल्यावर पालिकेने त्यांना नोटीसा बजावल्या आहेत.
पुढील चार ते पाच दिवस चांगला पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे. दरवर्षी पावसात काही जुन्या इमारतींच्या भिंती किंवा वाड्याचा काही भाग कोसळतो. पावसाळ्यात होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी पालिकेच्या धोकादायक इमारती पाडण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. पावसाळ्यात सीमाभिंती आणि जुन्या इमारती कोसळून जीवितहानी होत असल्याने दरवर्षी सीमाभिंती आणि जुन्या इमारतींचे सर्वेक्षण केले जाते. या पावसाळ्यात शहरातील एकूण 478 वाड्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.