Baramati Crime News: सोशल मिडियावर आत्तेबहिणीशी बोलणं बेतलं जीवावर! कोयत्याने सपासप वार अन् थरार; घटनेनं बारामती हादरलं
Baramati Crime News: सोशल मिडियावर आपल्या आत्तेबहिणीशी बोलतो म्हणून बारामती शहरात एका 23 वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली होती. त्याचा तपास पोलिसांनी करत तीन जणांना अटक केली आहे.
बारामती: बारामतीमध्ये दोन दिवसांपुर्वी एका 23 वर्षीय तरूणाचा कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आला. बारामतीतील क्रिएटिव्ह अकॅडमी ते तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या रस्त्यावर तरूणाचा कोयत्याने वार करून त्याचा खून करण्यात आला. यामुळे बारामती शहरात मोठी खळबळ उडाली असून शहरात गेल्या सहा महिन्यांमध्ये घडलेली ही तिसरी घटना आहे. क्षुल्लत कारणाचा रागावरून खूवन केल्याची माहिती समोर आली आहे. अनिकेत सदाशिव गजाकस असे मृत तरूणाने नाव आहे. एका मुलीशी बोलला या कारणावरून त्याचा अशा क्रूर प्रकारे जीव घेण्यात आला आहे. मान, हात, डोळे, नाकावर कोयत्याने वार करण्यात आल्याने अनिकेत गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचारही सुरू होते. मात्र, त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
सोशल मिडियावर आपल्या आत्तेबहिणीशी बोलतो म्हणून बारामती शहरात एका 23 वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली होती. त्याचा तपास पोलिसांनी करत तीन जणांना अटक केली आहे. तीन आरोपींना सोलापूर जिल्ह्यातून अटक आहे. सोशल मिडिया इंस्टाग्राम वरती मृत तरूण हा आरोपींच्या आते बहिणीशी बोलत होता. त्या कारणावरून अनिकेत गाजकस याची 19 डिसेंबरच्या रात्री धारदार शस्त्राने वार करत हत्या केली. ज्यावेळेस आरोपींनी अनिकेतची हत्या केली त्यावेळेस आरोपींनी नशा केली होती. नंदकिशोर अंभोरे, महेश खंडाळे आणि संग्राम खंडाळे अशी आरोपींची नावे आहेत. बारामती पोलिसांतील आरोपींना ताब्यात घेतलेल्या पोलिसांना प्रत्येकी पाच हजार रुपये बक्षीस जाहीर केले आहे.
मुलीशी बोलल्यामुळं गेला जीव
या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनिकेत हा एका मुलीशी सोशल मिडियाच्या माध्यमातून बोलत होती, ती आरोपीची आत्तेबहिण होती. मात्र तो कॉलेज परिसरातही तिच्याशी बोलत असल्याचा राग आल्याने आरोपींनी हे कृत्य केलं. आरोपी नंदकिशोर, महेश आणि संग्राम या तिघांनी कॉलेज परिसरातच अनिकेत याच्यावर कोयत्याने सपासप वार करत त्याच्यावर निर्घृण हल्ला केला. रात्री साडे दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास प्रगतीनगर परिसरातील क्रिएटिव्ह अकॅडमी ते तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय रस्त्यावर हा हल्ला झाला. त्यामध्ये अनिकेतची मान, हात, डोळे, नाक याच्यावर सपासप वार करण्यात आले. त्यामुळे
अनिकेत गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. मात्र, उपचारांपुर्वी त्याचा मृत्यू झाला.
आरोपींची नावे
नंदकिशोर पंजाबराव अंभोरे (रा.प्रगतीनगर ता बारामती जि पुणे), महेश नंदकुमार खंडाळे (रा. तांदुळवाडी रोड जिजामातानगर बारामती जि पुणे), संग्राम खंडाळे अशी आरोपींची नावे आहेत.