Swarget Depo Crime News: स्वारगेट बलात्कार प्रकरणातील शिवशाही बसमधून तरूणीच्या ओरडण्याचा आवाज बाहेर गेला की नाही? पडताळणीनंतर आलं समोर, बसच्या दोन्ही बाजूला...
Swarget Depo Crime News: स्वारगेट एसटी बसस्थानकातील बलात्कार प्रकरणातील शिवशाही बसमधून पिडित तरुणीने आरडाओरडा केला नाही का, तिचा आवाज कोणाला ऐकू आला नाही का, असे प्रश्न उपस्थित झाले होते.

पुणे: स्वारगेट एसटी बसस्थानकातील बलात्कार प्रकरणातील (Swarget Depo Crime News Update) शिवशाही बसमधून पिडित तरुणीने आरडाओरडा केला नाही का, तिचा आवाज कोणाला ऐकू आला नाही का, असे प्रश्न उपस्थित झाले होते. त्यानंतर आता शिवशाही बसची शास्त्रोक्त पडताळणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. स्वारगेट एसटी बसस्थानकात घडलेल्या अत्याचार प्रकरणात बसमधून आवाज बाहेर येतो किंवा नाही, याची पोलिसांनी शास्त्रोक्त पडताळणी करण्यात आले आहेत. या पंचनाम्यावेळी वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि ध्वनितंत्रज्ञ उपस्थित होते. अत्याचार झालेली शिवशाही बस वातानुकूलित असल्यामुळे त्याच्या काचा बंद होत्या. त्यामुळे आवाज बाहेर ऐकू गेला नाही. आरोपी दत्ता गाडेच्या विरोधात भक्कम पुरावे जमा करण्यासाठी पोलिसांनी पडताळणी केली आहे.(Swarget Depo Crime News Update)
स्वारगेट बस स्थानकात 25 फेब्रुवारीला 26 वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार (Swarget Depo Crime News Update) झाला होता. या वेळी बसच्या दोन्ही बाजूला काही बसही लावलेल्या होत्या. त्यामुळे तरुणीने अत्याचारावेळी आरडा ओरडा केला नाही का, तिचा आवाज बाहेर कोणाला ऐकू आला नाही का, असे प्रश्न उपस्थित झाले होते. त्याचा पोलिसांनी तपास केला असून, त्यामध्ये असं स्पष्ट झालं आहे की, तरुणीने आरोपीला प्रतिकार केला. मोठ्याने आरडाओरड करून मदत मिळवण्यासाठी प्रयत्न केला होता.शिवशाही बस वातानुकूलित असल्याने काचा बंद होत्या. त्यामुळे आवाज बाहेर ऐकू गेला नाही. आरोपी दत्ता गाडेविरोधात भक्कम पुरावे जमा करण्यासाठी पोलिसांनी पडताळणी केली आहे.(Swarget Depo Crime News Update)
आवाज बाहेर गेला की नाही?
स्वारगेट अत्याचार प्रकरणाच्या तपासाच्या दृष्टीने या तडताळणीमध्ये महत्त्वाची माहिती मिळावी, यासाठी पुणे पोलिसांनी बसमध्ये प्रत्यक्ष ध्वनिप्रयोग देखील करून पाहिला आहे. यामध्ये बसमधून मोठ्याने आवाज केल्यास तो बाहेर ऐकू जातो का, याची तपासणी यावेळी करण्यात आली आहे. तज्ज्ञांच्या उपस्थितीत हा शास्त्रोक्त पंचनामा झाला. प्राथमिक अहवालानुसार, बस वातानुकूलित असल्याने बाहेर आवाज ऐकू आला नाही, असे निष्पन्न झाले आहे.
काय आहे प्रकरण?
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर एका 26 वर्षीय तरुणीवर डेपोमध्येच असलेल्या शिवशाही बसमध्ये 25 फेब्रुवारीच्या पहाटे बलात्काराची घटना घडली होती. पुण्यामधून फलटणच्या दिशेनं प्रवास करणाऱ्या तरुणीवर बलात्कार झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली होती. ही धक्कादायक घटना समोर आल्यानंतर या प्रकरणातील फरार आरोपी दत्तात्रय गाडे याचा पुणे पोलीस शोध घेत होते. या घटनेनंतर राज्यात खळबळ माजली होती.तर या प्रकरणातील आरोपी शिरूर तालुक्यातील त्याच्या गावातील एका ऊसाच्या शेतात लपून बसला होता. हा आरोपी स्वत:ला कंडक्टर भासवून पीडित महिलेला ताई म्हणून तिचा विश्वास मिळवला होता. आरोपीनेच ती बस दाखवली होती तसेच बसमध्ये अनेक लोक असल्याचं त्यानं भासवलं होतं. मात्र, बस पूर्णपणे रिकामी होती.
फिर्यादी तरूणीने बसमधून बाहेर येण्याचा प्रयत्न केला होता. मला बाहेर सोडा, अशीही विनंती तिने केली होती. मात्र, आरोपीने तिला मारहाण करून जबरदस्तीने तिच्यावर दोनवेळा लैंगिक अत्याचार केला आहे. यानंतर तो पळून गेला. पीडितेने नंतर मित्राच्या सांगण्यावरून फिर्याद दिली आणि गुन्हा दाखल केला.हा आरोपी अत्यंत सराईत आहे. तो मोबाईल बंद करून फिरत होता. आजवर त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

