एक्स्प्लोर
पुण्यात पोलीस स्टेशनच्या कोठडीतच आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न
पुणे : पुण्याच्या देहू रोडच्या पोलिस स्टेशनमध्ये कोठडीतच एका आरोपीनं आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. अविनाश खंडागळे हा आरोपी कलम 395 अंतर्गत अटकेत होता. या आरोपीला तळेगाव पोलिसांनी अटक केली होती.
शनिवारी रात्री आरोपीनं पोलीस स्टेशनच्या कोठडीतच आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. द्रुतगती मार्गावर प्रवाशांना लूटणाऱ्या टोळीचा तळेगाव पोलिसांनी तीन तासात पर्दाफाश केला होता.
अविनाश त्यातलाच आरोपी आहे. त्याच्यावर बुलढाणा आणि अहमदनगर जिल्ह्यात गुन्हे दाखल आहे. तसंच यासोबत अटक करण्यात आलेल्या आरोपींवर दिल्ली, बुलडाणा आणि अहमदनगरमध्ये बलात्कार, दरोडा आणि शस्त्र विक्रीचे असे पाच गुन्हे दाखल आहेत. तसेच या आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
काय आहे प्रकरण?
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बुधवारी पहाटे दोनच्या सुमारास मुंबईहुन पुण्याच्या दिशेने एक कुटुंब प्रवास करत होत. मात्र चालकाला झोप अनावर झाल्याने, द्रुतगती मार्गावरील ताजे पेट्रोल पंप जवळ त्यांनी गाडी थांबवली. चेहऱ्यावर पाणी मारून झोप उडवण्याचा प्रयत्न करत असताना, मागून एका गाडीत आठ अज्ञात आले आणि गाडीत बसलेल्या प्रवाश्यांना चाकूचा धाक दाखवून ऐवज लंपास केला.
दरम्यान झालेल्या झटापटीत गाडीतील लहान मुलगी किरकोळ जखमी झाली तर आठ पैकी एक चोरटा भलतीकडे पळून गेला. जखमी मुलीला रुग्णालयात दाखल करायला जाताना घडला प्रसंग कुटुंबाने उर्से टोल नाक्यावरील तळेगाव पोलिसांना सांगितला.
या नंतर पोलिसांनी तातडीनं कारवाई करत या आरोपींच्या मुसक्या आवळल्या. यानंतर त्यांच्यावरील गुन्हे उघडकीस आले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement