Supriya Sule On Sudhir Mungantiwar : सुधीर मुनगंटीवारांच्या वक्तव्याने राजकारण तापलं, सुप्रिया सुळे संतापल्या, म्हणाल्या मोदींनी...
पंतप्रधान नरेंद्र मोदी मंचावर असताना असं गलिच्छ वक्तव्य करणं योग्य नाही. मोदी याचा मानसान्मान त्यांच्या पक्षाच्या लोकांनी ठेवला पाहिजे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
पुणे : चंद्रपूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी चंद्रपूरच्या मोदींच्या दौऱ्यादरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यावर आता सुप्रिया सुळेंनीदेखील ( Supriya Sule) संताप व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) मंचावर असताना असं गलिच्छ वक्तव्य करणं योग्य नाही. मोदी याचा मानसान्मान त्यांच्या पक्षाच्या लोकांनी ठेवला पाहिजे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. मोदींनी त्यांच्यावर कारवाई करावी, असंही त्या म्हणाल्या. पुण्यात प्रचार करत असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयावर भाष्य केलं आहे.
सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
'नरेंद्र मोदी पक्षाचे नाही तर देशाचे पंतप्रधान आहेत. देशाची एक नागरिक म्हणून त्यांना एक विनंती आहे, की व्यासपीठावरून त्यांच्या पक्षाचे मंत्र्यांनी अतिशय गलिच्छ भाषण मागच्या आठवड्यात केले आहे,त्याबद्दल मोदीनी काहीतरी ॲक्शन घ्यावी राजकारण होत राहील पण हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. सगळ्याच पक्षाच्या आणि सगळ्यांनी महाराष्ट्राची संस्कृती जपली पाहिजे. गेल्या वेळेस मोदी यांच्या समोर एक गलिच्छ वाक्य बोलणं झालं हे थांबलं पाहिजे. त्याचा मी निषेध करते माझी अपेक्षा आहे मोदी याचा मानसान्मान त्यांच्या पक्षाच्या लोकांनी ठेवला पाहिजे अशी भाषा थांबली पाहिजे अशा व्यक्तींवर ॲक्शन घेतली पाहिजे', अशी मागणी त्यांनी मोदींना केली आहे.
35% पाणी शिल्लक, ट्रिपल इंजिन खोके सरकार प्रचारात व्यस्त
डिसेंबरपासून जवळपास मी सातत्याने दुष्काळाची परिस्थिती आहे. हे शेतकरी अडचणीत आहे.मजूर अडचणीत आहे हे सातत्याने बोलत आहे. माझ्या मतदारसंघात उजनीत एक थेंब पाणी नाही, नाझरेमध्ये एक थेंब पाणी नाही. संपूर्ण महाराष्ट्रात 35% पाणी शिल्लक आहे पुरेल की नाही अशी गंभीर परिस्थिती आहे हे ट्रिपल इंजिन खोके सरकार अतिशय असंवेदनशील आहे प्रचारात व्यस्त आहे त्यांना दुष्काळाचं काही घेणेदेणे नाही, असा आरोप त्यांनी सरकारवर केला आहे.
'जागा वाटपाबाबत पहिल्यापासून हाच फॉर्म्युला'
महाविकास आघाडीच्या जागेसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केली गेली. जागावाटपात रस्सीखेच सुरु आहे का? असे प्रश्न उपस्थित केले गेले मात्र त्यावर सुप्रिया सुळेंनी स्पष्टीकरण दिलं आहे. जागा वाटपाबाबत पहिल्यापासून हाच फॉर्म्युला ठरला होता,त्यामुळे त्यात मला असं काही वाटत नाही बदल झाला असेल.
इतर महत्वाची बातमी-