एक्स्प्लोर
मुंबईतील मराठा मोर्चाला सुकाणू समितीचा पाठिंबा
मुंबईत होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाला सुकाणू समितीने पाठिंबा दिला आहे. पुण्यात सुकाणू समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. त्यात शेतकरी नेते आणि सुकाणू समितीचे सदस्या रघुनाथदादा पाटील यांनी याबाबत माहिती दिली.

पुणे : मुंबईत होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाला सुकाणू समितीने पाठिंबा दिला आहे. पुण्यात सुकाणू समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. त्यात शेतकरी नेते आणि सुकाणू समितीचे सदस्य रघुनाथदादा पाटील यांनी याबाबत माहिती दिली. मुंबईत येत्या 9 ऑगस्ट रोजी मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाला शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी लढणाऱ्या सुकाणू समितीने पाठिंबा दर्शवल्याने आता मराठा मोर्चालाही आणखी बळ मिळणार आहे. कोपर्डी प्रकरणानंतर राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आले होते. यामध्ये लाखोंच्या संख्येने जनसगार लोटला होता. त्यामुळे मुंबईतील मोर्चाकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. त्यात आता सुकाणू समितीने मुंबईतील मोर्चाल पाठिंबा जाहीर केला आहे. पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी मागण्यांसाठी ऐतिहासिक संप केल्यानंतर, शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली. यात अनेक शेतकरी नेत्यांचा समावेश आहे. दरम्यान, येत्या 15 ऑगस्टला प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्र्यांना झेंडावंदन करु द्यायचं नाही. प्रत्येक जिल्ह्यातील मंत्र्यांना 14 ऑगस्टला अडवा आणि रास्तारोको करा, असा आदेशही पुण्यातील सभेतून देण्यात आला आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण























