एक्स्प्लोर
सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी 8 दिवस बंद
दरड कोसळण्याच्या धोक्यामुळे सिंहगड किल्ला पुढील आठ दिवस पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

पुणे: दरड कोसळण्याच्या धोक्यामुळे सिंहगड किल्ला पुढील आठ दिवस पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
रविवारी संध्याकाळी सिंहगडावर जाणाऱ्या रस्त्यावर अचानक मोठी दरड कोसळली. सुदैवाने त्यामध्ये कोणालाही इजा झाली नाही. मात्र सिंहगडावर जाणाऱ्या रस्त्यालगत अनेक ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता आहे.
ही धोकादायक दरड हटवण्याचं काम आजपासून सुरु झालं आहे. तर उंचावरील दगड काढण्याचं काम उद्यापासून सुरु करण्यात येणार आहे.
सिंहगडाच्या सुरक्षेसाठी 1 कोटी 65 लाख रुपये राज्य सरकारने मंजूर केले असले, तरी गेली दोन वर्षे हे पैसे नुसतेच पडून आहेत. या पैशांचा उपयोग धोकादायक ठिकाणी लोखंडी जाळ्या बसवण्यासाठी होणं गरजेचं आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग त्याबाबत करत असलेल्या दिरंगाईमुळे पर्यटकांची सुरक्षा धोक्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्धा
बीड
बातम्या
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
