Amol Kolhe : 23 जागांचा निर्णय घेणाऱ्या नेतृत्वाला चारच जागा मिळतात ही शोकांतिका; अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर हल्लाबोल
जे नेतृत्व एकेकाळी 23 जागांचे निर्णय घेऊ शकत होते त्यांना अवघ्या आता चार जागा मिळतात. ही परिस्थिती लोकसभेला असेल तर विधानसभेला काय परिस्थिती असेल?, असा प्रश्न अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला आहे.
पिंपरी - उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी वेगळा निर्णय घेत भाजप सोबत जाण्यास पसंती दिली. राज्य सरकारमध्ये सामील होत शिंदेंच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली. अनेक आमदार देखील अजित पवारांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये सामील झाले. परंतु आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एक गट नाराज झाल्याच्या बातम्या झळकल्या आहेत. त्यावर माध्यमांशी बोलताना अजित पवारांच्या पक्षातील नाराजी विषयी शिरुर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी भाष्य केले आहे.
अमोल कोल्हे म्हणाले की, खरं तर हा त्यांच्या पक्षातील अंतर्गत प्रश्न आहे. कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये अशा प्रकारच्या नाराजी असणे स्वाभाविक आहे. कारण जे नेतृत्व एकेकाळी 23 जागांचे निर्णय घेऊ शकत होते त्यांना अवघ्या आता चार जागा मिळतात. ही परिस्थिती लोकसभेला असेल तर विधानसभेला काय परिस्थिती असेल हा संभ्रम कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होणे स्वाभाविक आहे.
त्याचबरोबर महायुतीची खूप मोठी घसरण होणार आहे. सर्व्हे मध्ये देखील ज्या चार जागा अजित दादांना भाजपने देऊ केल्या आहेत त्या चारही जागा मिळत नसल्याचे चित्र सर्व्हेमधून समोर आले आहे. दरम्यान ज्या जागा मिळाल्या आहेत त्या चार जागांवर एक घरात उमेदवारी द्यावी लागली तर एक पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना जागा लढवावी लागत आहे आणि उर्वरित दोन जागांवर उमेदवार आयात करावे लागले असल्याने पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होणे स्वाभाविक आहे, असंही ते म्हणाले. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नाराजी अशी पक्षाच्या बाहेर येत असेल तर ही लोकसभा निवडणुक आणि त्यानंतर होणारी विधानसभा निवडणूकीचे चित्र संभ्रमात असल्याच्या चर्चा देखील जोर धरू लागल्या असल्याचं ते म्हणाले.
आढळराव पाटलांवरही हल्लाबोल
महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ही माजी शेवटची निवडणूक आहे, असं म्हणत मतदारांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला. यावर माध्यमांनी डॉ. कोल्हे यांनी विचारणा केली असता डॉ. कोल्हे म्हणाले की, ही लोकसभेची निवडणूक आहे. कोणाची पहिली निवडणूक की शेवटची याची नाही. त्यामुळे आढळराव पाटील यांच्या वयाचा मान ठेवत मी त्यांना एवढंच सांगेल की आपण देशाचं बोलूयात, देशाचं, जनेतेच बोलूयात. त्यांना काय वाटत मला काय वाटत यापेक्षा जनतेला काय वाटत हे महत्वाचं आहे, असा हल्लाबोल त्यांनी आढळराव पाटलांवर केला.
इतर महत्वाची बातमी-
Amol Kolhe On Adhalrao Patil : माझी शेवटची निवडणूक, या वक्तव्यानंतर आढळराव- कोल्हेंमध्ये जुंपली!