एक्स्प्लोर

Amol Kolhe On Adhalrao Patil : माझी शेवटची निवडणूक, या वक्तव्यानंतर आढळराव- कोल्हेंमध्ये जुंपली!

माझी यंदाची ही शेवटची निवडणूक आहे, असं भावनिक आवाहन शिरूरमधील अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजी आढळरावांनी केलं. त्यावर अमोल कोल्हेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

शिरुर, पुणे : माझी यंदाची ही शेवटची निवडणूक आहे, असं भावनिक आवाहन शिरूरमधील अजित पवार (Ajit Pawar) गटाचे उमेदवार शिवाजी आढळरावांनी (Adhalrao patil ) केलं. पण देशाची निवडणूक असताना आढळरावांनी हे मनोरंजक वक्तव्य केलं, यातून त्यांचा मी पणा अधोरेखित झाला, अशी खोचक टीका त्यांचे विरोधक खासदार अमोल कोल्हेंनी केली. मी राजकारणातून निवृत्त होऊ नये, अशी कोल्हेची इच्छा असेल आणि ते भावनिक झाले असतील तर पुन्हा लढेन, असं म्हणत आढळरावांनी कोल्हेंची (Amol Kolhe) खिल्ली उडवली.

शिरुर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे आणि महायुतीचे उमेदवार आढळराव पाटील हे कायम एकमेकांवर टीका करताना दिसतात. एकमेकांच्या विकास कामांवर प्रश्न चिन्ह उपस्थित करत असतात. कधी कांद्याच्या प्रश्नावरुन टीका केली जाते तर कधी शेतकऱ्यांच्या हमीभावावरुन टीका केली जाते. मात्र आता प्रचारादरम्यान भावनिक साद घालण्याचा प्रयत्नदेखील सुरु असल्याचं दिसत आहे. 

आढळराव पाटील हे स्वत:चं मनोधैर्य वाढवण्याचं काम करत आहेत. सुरुवातीला ते म्हणाले की 2019 चा बदला घ्यायचा आहे आणि आता ते थेट शेवटची निवडणूक असल्याचं आढळराव पाटील म्हणत आहे. यातून आढळराव पाटलांचा मी पणा दिसून येत आहे. देशासाठी, देशाच्या कल्याणासाठी आणि देशातील प्रश्नांसाठी त्यांना काम करायचं नाही. देशात बेरोजगारीचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांच्या समस्या आहेत. त्यावर न बोलता थेट माझी शेवटची निवडणूक असल्याचं म्हणून ते लोकांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र लोकांना आता ही भावनिक साद महत्वाची नाही त्यांना प्रश्न सोडवणारा नेता हवा आहे, असं अमोल कोल्हे म्हणाले. 

आढळराव पाटलांनी अमोल कोल्हेंच्या विधानाची चांगलीच खिल्ली उडवली आहे. अमोल कोल्हे काय विधान करतात आणि त्याला काय उत्तर द्यायचं हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र जर त्यांची इच्छा असेल की मी अजून चार निवडणुका लढवाव्या तर मी अजून लढेन. एवढे वर्ष मी काम केलं आता दुसऱ्याला संधी द्यावी असं मला वाटत आहे मात्र जर माझी शेवटची निवडणुकीचं ऐकून अमोल कोल्हे भावनिक झाले असतील तर मी निवडणूक लढेन, असं आढळराव पाटलांनी स्पष्ट केलं आहे.  

इतर महत्वाची बातमी-

Vasant More : भर सभेत फेसबूक लाईव्ह करत माध्यमांवर टीका, मग सारवासार; वसंत मोरेंना माध्यमांसमोर दिलगीरी का व्यक्त करावी लागली?

महत्त्वाच्या बातम्या

Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Mumbai Crime Navy Sailor: मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह! नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह! नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Bhavesh Kaware and Raj Thackeray: मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
Embed widget