Adhalrao Patil Vs Amol Kolhe : मला आव्हान-प्रतिआव्हानात गुंतवणूक ठेवण्याचा कोल्हेंचा डाव, आढळराव यापुढं मौन बाळगणार!
शिरुर लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार आढळराव पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या दावे प्रतिदावे आणि उत्तर प्रत्युत्तर सुरुच असल्याचं दिसत आहे
शिरुर, पुणे : शिरुर लोकसभा मतदार संघाचे (Shirur Loksabha Election) महायुतीचे उमेदवार आढळराव पाटील (Adhalrao Patil) आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या दावे प्रतिदावे आणि उत्तर प्रत्युत्तर सुरुच असल्याचं दिसत आहे. एकमेकांना वेगवेगळे चॅलेन्ज देताना दिसत आहे. त्यावरुन आता आढळराव पाटलांनी अमोल कोल्हेंवर चांगलाच निशाणा साधला आहे. मला आव्हान-प्रतिआव्हानात गुंतवून ठेवायचा डाव अमोल कोल्हेनी आखला आहे. मी उत्तरं देत नाही असं जनतेला ते दाखवू इच्छितात, असा आरोप आढळराव पाटलांनी अमोल कोल्हेंवर आढळराव पाटलांनी केला आहे.
'मला आव्हान-प्रतिआव्हानात गुंतवून ठेवायचा डाव अमोल कोल्हेंनी आखला आहे. मी उत्तरं देत नाही असं जनतेला ते दाखवू इच्छितात. असं म्हणत शिवाजी आढळरावांनी मी यापुढं कोल्हेंना प्रतिउत्तर देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. शिरूर लोकसभेतील प्रश्न संसदेत मांडताना आढळरावांनी पंधरा वर्षे केवळ त्यांच्या कंपनीचं हित जोपासलं, असा आरोप कोल्हेनी केला. मग आढळराव चांगलेच संतापले. कोल्हेंनी आरोपांचे पुरावे द्यावे, मी लोकसभेतून माघार घेतो अन्यथा त्यांनी निवडणुकीतुन माघार घ्यावी. आढळरावांचं हे आव्हान कोल्हेनी स्वीकारलं. त्यानंतर आढळरावांनी कोल्हेंचा ऐंशी टक्के खासदार निधी परत गेल्याचा आरोप केला. आता आढळरावांनी याचे पुरावे द्यावेत अन्यथा लोकसभेच्या रिंगणातून माघार घ्यावी, असं प्रतिआव्हान दिलं. त्यानंतर आढळरावांनी मात्र हे आव्हान स्वीकारण्याऐवजी कोल्हे जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला. मला आव्हान-प्रतिआव्हानात गुंतवून ठेवण्याचा कोल्हेंचा डाव आहे. मी उत्तरं देऊ शकत नाही, असं ते जनतेला दाखवू इच्छितात. त्यामुळं यापुढं मी त्यांना प्रतिउत्तर देणार नाही, अशी भूमिका आढळरावांनी घेतली आहे.
आढळराव पाटील अन् अमोल कोल्हेंमध्ये 'तू तू मै मै' सुरुच!
आढळराव पाटील अन् अमोल कोल्हेंमध्ये 'तू तू मै मै' सुरुच असल्याचं दिसत आहे. त्यातच आधी कोल्हेंनी आढळराव पाटलांना डमी उमेदवार म्हणत डिवचलं होतं. त्यानंतर मी दमी नाही तर डॅडी उमेदवार आहे, असं प्रत्युत्तर आढळराव पाटलांनी दिलं होतं. त्यासोबतच दोघेही प्रत्येक सभेत एकमेकांवर विविध मुद्द्यांवर टीका करताना दिसतात. आता कंपनीच्या प्रकरणात नेमकं काया उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
इतर महत्वाची बातमी-