Amol Kolhe "सोन्या टीव्हीला बघते, तुझं कौतुक वाटतं रे बाबा"; आजीने मायेनं फिरवला अमोल कोल्हेंच्या डोक्यावरुन हात!
प्रचारावेळी एका आजीने अमोल कोल्हेंचं कौतुक केलं आहे. हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. आंबेगाव परिसरात आज अमोल कोल्हे प्रचार करत आहे.
पुणे : शिरुर लोकसभा मतदार संघाचे (Shirur Loksabha Constituency) महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांचा दणक्यात प्रचार सुरु आहे. याच प्रचारादरम्यान ते लहान-लहान गावामध्ये जाऊन नागरिकांच्या भेटी घेत आहेत. त्यांचे आशिर्वाद घेत आहेत. याच प्रचाचारादरम्यान अनेक जणांना मतदानाचं आवाहनदेखील करत असल्याचं दिसत आहे. याच प्रचारावेळी एका आजीने अमोल कोल्हेंचं कौतुक केलं आहे. हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. आंबेगाव परिसरात आज अमोल कोल्हे प्रचार करत आहे. याच परिसरातील आमोंडी गावातील या आज्जी आहेत. त्यासोबतच प्रचारादरम्यान दुसऱ्या आजीने कांद्यांचा प्रश्न आणि शेतकऱ्यांची व्यथा मांडल्या आहेत.
व्हिडिओत नेमकं काय आहे?
"सोन्या टीव्हीला बघते तुझं कौतुक वाटतं रे बाबा" असं म्हणत आमोंडी गावातील एका आज्जीने खासदार अमोल कोल्हे यांच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवत विजयी होण्यासाठी शुभेच्छा देताना दिसत आहे. त्यासोबत मी तुतारी चिन्ह लक्षात ठेवेन आणि त्यालाच मतदान करेन, असंही आजी बोलताना दिसत आहे.
तर दुसरीकडे एक आजी शेतकऱ्यांची व्यथा आमोल कोल्हेंना सांगताना दिसत आहे. या दौऱ्यात कोल्हे यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांशी थेट कांदा काढताना शेतात जाऊन संवाद साधला. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत कांद्याच्या भावाबाबत चौकशी केली. यावेळी मजूर महिलांनी कांदा उत्पादनात येणारा खर्च आणि हातात येणारे उत्पादन असमाधानकारक असल्याचे सांगितले. यावेळी केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या धोरणावर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
देशाला पूर्णवेळ कृषिमंत्री नसावा देशाचं दुर्दैव!
कांद्यांच्या प्रश्नावर बोलताना अमोल कोल्हे म्हणाले, अगोदर 40% कांदा निर्यात शुल्क लाधला आणि जपानवरून घाईघाईने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून कांदा आम्ही खरेदी करणार म्हणून सांगितलं आणि कांद्याचे भाव पाडले, किलोमागे कांदा उत्पादक शेतकर्यांचे 30 रुपये नुकसान होत आहे. शेतकऱ्याच्या आशेवर पाणी फिरवण्याचे काम मोदी सरकारने केलं आहे. पंतप्रधान प्रत्येक गोष्टीची गॅरंटी देतात परंतु शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव देण्याची गॅरंटी देऊ शकत नाही हे दुर्दैव आहे. मध्यप्रदेशच्या निवडणूका झाल्यापासून अजूनही देशाला पूर्णवेळ कृषिमंत्री नसावा हे आपल्या देशाचे दुर्दैव आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.
पाहा व्हिडीओ-
इतर महत्वाची बातमी-