एक्स्प्लोर

Sharad Mohol Case : मुन्नाने शरद मोहोळला का संपवलं? समोर आलं धक्कादायक कारण...

Sharad Mohol Case : शरद मोहोळ हत्या प्रकरणात पुणे पोलिसांनी आठ जणांच्या मुसक्या आवळल्या असून हत्येचे कारण समोर आले आहे.

Sharad Mohol Case :  पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळची (Sharad Mohol) आज दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेने पुण्यासह राज्यात एकच खळबळ उडाली. पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा तातडीने तपास करत आठ आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यातील प्रमुख आरोपी साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर याला शिरवळमधूनच पोलिसांनी ताब्यात घेतलं. शरद मोहोळची हत्या का झाली, याचा उलगडा होण्यास सुरुवात झाली आहे. 

पुण्यातील कोथरुड (pune kothrud) परिसरात गोळीबार करण्यात आलाय. शरद मोहोळ कोथरुडमधील सुतारदरा या ठिकाणी जात असताना दुचाकीवरुन आलेल्या अज्ञातांनी त्याच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. कोथरुडमधील एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, तिथेच शरद मोहोळने प्राण सोडले.  

आरोपींना अटक

या गोळीबाराच्या घटनेनंतर पुणे पोलिसांची गुन्हे शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. काही तासातच एका आरोपीचे नाव समोर आले. त्यानंतर पोलिसांनी धरपकड करण्यास सुरुवात केली. शरद मोहोळ खून प्रकरणात आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुण्यातील खेड शिवापूर जवळील लपून बसलेल्या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर मुख्य आरोपी मुन्ना पोळेकरला शिरवळमधून ताब्यात घेतले. 

मोहोळला का संपवलं?

या प्रकरणातील काही आरोपींचे शरद मोहोळसोबत मोठे वाद झाले होते. जमिनीवरून आणि आर्थिक गोष्टीवरून वाद झाले होते. त्याचाच बदला घेण्यासाठी आज या आरोपींनी शरद मोहोळ याला जीवे मारण्याचा कट रचला असल्याची माहिती समोर आली आहे. 

गेल्यावर्षी तडीपारची कारवाई

गुंड शरद मोहोळवर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पिंटू मारणे हत्या प्रकरणात त्याला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. याप्रकरणात तो जामिनावर बाहेर आला. दासवे गावचे सरपंच शंकर धिंडले यांचे अपहरण प्रकरणात त्याला पुन्हा अटक करण्यात आली. जुलै 2022 मध्ये शरद मोहोळला पुणे जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले होते. 

कोण होता शरद मोहोळ? (Who Is Sharad Mohol)

ज्या मुळशी पॅटर्न चित्रपटाने पुण्यातील आणि मुळशी खोऱ्यातील गुन्हेगारीची जगताची ओळख झाली, त्याच मुळशी तालुक्यातील शरद मोहोळ होता. गुंड संदीप मोहोळचा ड्रायव्हर म्हणून शरद मोहोळ काम करत होता. मात्र, याच संदीप मोहोळची हत्या झाल्यानंतर तो गुन्हेगार म्हणून नावारुपास आला. शरदचे आई वडिल शेतकरी असून बेताच्या परिस्थितीत मोठा होऊनही गुन्हेगारीकडे वळला होता. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
Navneet Rana: नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
Ajit Pawar : रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar PC : सयाजी शिंदे राष्ट्रवादीत, जबाबदारी काय? अजितदादा काय म्हणाले?Nashik Shree Ram Murti : नाशिक तपोवनमध्ये 70 फूट श्रीरामाच्या भव्य मूर्तीचे लोकार्पणRahul Shevale PC | शिंदेंच्या दसरा मेळाव्यात 2 लाखांपेक्षा जास्त शिवसैनिक येतील- राहुल शेवाळेNavneet Rana PadYatra | नवरात्री निमित्ताने राणा दाम्पत्याची अंबादेवी मंदिरात पदयात्रा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
Navneet Rana: नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
Ajit Pawar : रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Raj Thackeray SSC: राज ठाकरेंना 10 वीच्या बोर्ड परीक्षेत किती मार्क?;  मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..
राज ठाकरेंना 10 वीच्या परीक्षेत किती मार्क?; मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
Maharashtra Rain : कधी उघडणार पाऊस? पुढील 5 दिवस कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती
कधी उघडणार पाऊस? पुढील 5 दिवस कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती
सयाजी शिंदेंना राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी, अजित पवारांची घोषणा; विधानसभेपूर्वीच काढला हुकमी एक्का
सयाजी शिंदेंना राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी, अजित पवारांची घोषणा; विधानसभेपूर्वीच काढला हुकमी एक्का
Embed widget