Shahaji Bapu Patil In Pune: चंद्रकांत खैरे औरंगाबादला राहतात आणि गोळ्या ढगात मारतात; शहाजी बापू पाटलांचा खैरेंना टोला
चंद्रकांत खैरे औरंगाबादला राहतात आणि ढगात गोळ्या मारतात. वातावरण खराब केल्याशिवाय त्यांना काही वेगळे उद्योग नाही, असं विधान शिंंदे गटातील आमदार शहाजी बापू पाटील यांनी केलं आहे.
Shahaji Bapu Patil In Pune: चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) औरंगाबादला राहतात आणि ढगात गोळ्या मारतात. वातावरण खराब केल्याशिवाय त्यांना काही वेगळे उद्योग नाही, असं विधान शिंंदे गटातील (shivsena) आमदार शहाजी बापू पाटील यांनी केलं आहे. पुण्यातील मार्केट यार्डमधील एका सत्कार समारंभात ते बोलत होते.
शिवसेनेचे माजी खासदार यांनी राजकीय वर्तुळात चर्चा होईल असं विधान केलं होतं. बंडखोर आमदांपैकी 10 ते 15 आमदार त्यांंच्या संपर्कात असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यावर शहाजी पाटलांनी त्यांना टोला लगावला आहे. चंद्रकांत खैरे राहतात, औरंगाबादला. त्यांचा अजून आकडाही निश्चित नाही. यातील 10 धरायची की 15 धरायचा. खैरे यांना नेमकं काय म्हणायचे आहे. ढगात गोळ्या मारून वातावरण भांबावून सोडण्याचा त्यांचा उद्योग आहे. त्यांना काही येत नाही. त्यांना कळून चुकलेलं आहे. फक्त शेवटच्या गटांगळ्या मारतो माणूस, तसं त्यांच्याकडून गटांगळ्या मारण्याचे काम चालू आहे, असं त्यांच्या शैलीत त्यांनी उत्तर दिलं आहे.
आमच्यातल्या प्रत्येकाच्या अपेक्षा वेगळ्या आहेत. एखाद्या मतदारसंघाच्या शेजारी मोठे चांगले काम मंजूर झाले की आपल्याही मतदारसंघात असं काम व्हावं, आमदाराला वाटत असतं. सुहास कांदे यांना वाटलं असेल की त्या आमदाराचा काम झालं, माझं राहिलं. एकादं काम करून घेण्यासाठी आमदाराचा पाठपुरावाही महत्वाचा असतो. आपण पाठपुरावा करून संबंधित कामे मार्गी लावून घेतली पाहिजेत. मी सरकारवर नाराज नाही, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं.
गेलं दोन महिने महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झाले. काही राजकीय घटना घडल्या त्यामुळे सरकार बनलं. सरकार चांगलं सुरु आहे. हा सगळा अनुभव चांगला आहे. दोन महिन्यात सरकारचा कारभार चांगला असल्याने सरकारला यश येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. दसरा मेळावा अजून दूर आहे. मेळावा जवळ आल्यावर मुख्यमंत्री काय धोरण घेतात यावर सगळं अवलंबून आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच उपस्थितीतच मेळावा व्हावा, अशी इच्छादेखील त्यांनी व्यक्त केली .
सभागृहात गप्प का?
पहिल्या अधिवेशनात माझं दुर्दैव झालं. माझ्या नातवाचा बारसं होता. त्यानंतर चुलत्याची पंचाहत्तरावी होती. तालुक्यातील तरुणाचा मोठा वाढदिवस, असं त्यांनी स्पष्ट केलं. या अधिवेशनात नाही तर पुढच्या अधिवेशनात मला संधी मिळणार आहे. तेव्हा मी नक्की बोलेन. प्रश्न विचारील, असं ते म्हणाले