(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Dr. Mangala Narlikar Passes Away: ज्येष्ठ गणितज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांचं निधन
Dr. Mangala Narlikar : ज्येष्ठ गणितज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांचं निधन झालं असून वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Dr. Mangala Narlikar Passed Away : ज्येष्ठ गणितज्ञ (Mathematician) डॉ. मंगला नारळीकर (Mangala Narlikar) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 80व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉ. मंगला नारळीकर या जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ जयंत नारळीकर (Jayant Narlikar) यांच्या पत्नी आहेत. याशिवाय त्या लेखिकाही आहे. लहान मुलांना अगदी सोप्या भाषेत गणित समजावून सांगणाऱ्या लेखिका म्हणून त्यांची ओळख होती.
डॉ. मंगला नारळीकर यांचे आज पहाटे कर्करोगाने निधन झाले. काही वर्षांपूर्वी मंगला नारळीकरांना स्तनाच्या कर्करोगाचं निदान झालं होतं. त्यावर उपचार घेऊन त्या बऱ्याही झाल्या होत्या. मात्र त्यानंतर त्यांना फुफ्फुसाचा कर्करोगाचं निदान झालं. त्यावर पुण्यात उपचार सुरू होते. त्या 80 वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या त्यांच्या मुलीच्या पुण्यातील घरी त्या रहात होत्या.
एक गणितज्ञ आणि लहान मुलांना सोप्या भाषेत गणित समजावून सांगणार्या लेखिका म्हणून त्यांची ओळख होती. जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या पत्नी असूनही संशोधन आणि लेखन यामध्ये त्यांची स्वतंत्र ओळख होती. महाराष्ट्र सरकारच्या पाठ्यपुस्तक निर्मीती समितीवर देखील त्यांनी काम केले. सकाळी अकरा वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
पाहा व्हिडीओ : Mangala Naralikar Passed Away : Jayant Naralikar यांच्या पत्नी मंगला नारळीकर यांचं निधन
पुण्यातील अंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोल भौतिक केंद्रात सोमवारी सकाळी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. त्यानंतर दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पूर्वाश्रमीच्या मंगला राजवाडे यांचा जन्म 17 मे 1943 रोजी झाला. त्यांनी प्रगत गणितावर काम केलं आहे.
मंगला नारळीकर यांनी मुंबई विद्यापीठतून 1962 साली बीए ही पदवी घेतली होती. त्यानंतर 1964 साली त्या एम.ए. (गणित) झाल्या. या परीक्षेत त्यावेळी त्या विद्यापीठातून पहिल्या आल्या होत्या. त्यांना तत्कालीन कुलपतींकडून सुवर्णपदकसुद्धा मिळाले होते.
डॉ. मंगला नारळीकर यांनी अनेक इंग्रजी आणि मराठी पुस्तकं लिहिली. त्यापैकी काही निवडक पुस्तकं खालीलप्रमाणे :
- A Cosmic Adventure (अनुवादित, मूळ मराठी : आकाशाशी जडले नाते, लेखक प्रा. जयंत नारळीकर)
- An easy Access to basic Mathematics (शालेय विद्यार्थ्यांसाठीचे पुस्तक)
- गणितगप्पा (भाग 1, 2)
- गणिताच्या सोप्या वाटा (शालेय विद्यार्थ्यांसाठीचे पुस्तक)
- नभात हसरे तारे (सहलेखक : डॉ. अजित केंभावी आणि डॉ. जयंत नारळीकर)
- खगोलविज्ञानविषक पुस्तक पहिलेले देश
- भेटलेली माणसं (प्रवासवर्णन)