Satish Wagh Case : सतीश वाघ यांची हत्या होणारी तीन कारणं आली समोर; पोलिसांनी सांगितली सर्व हकिकत, नेमकं काय घडलं?
Satish Wagh Murder Case : सतीश वाघ यांच्याकडून होणारी मारहाण, आर्थिक व्यवहार हातात यावेत तसेच याप्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय जावळकर यांच्याशी असलेले संबंध यातून ही हत्या करण्यात आला आहे.
पुणे: पुण्यातील सतीश वाघ यांची (Satish Wagh Murder Case) हत्या त्यांच्याच पत्नी मोहिनी वाघ यांनी सुपारी देऊन केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोहिनी वाघ यांना काल (बुधवारी) अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेच्या संदर्भात पुराव्याच्या आधारे मोहिनी वाघकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी या घटनेची कबुली दिली. सतीश वाघ यांच्याकडून होणारी मारहाण, आर्थिक व्यवहार हातात यावेत तसेच याप्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय जावळकर यांच्याशी असलेले संबंध यातून ही हत्या करण्यात आला आहे.(Satish Wagh Murder Case)
अक्षय जावळकर हा वाघ (Satish Wagh Murder Case) यांच्याकडे 15 वर्षांपासून भाडेकरू होता. यातून त्याची आणि मोहिनी वाघ यांच्याशी ओळख झाली होती आणि त्यांच्यात जवळीक झाली. दुसऱ्या बाजूला, सतीश वाघ हे मोहिनी यांना मारहाण करत होते याच जाचाला कंटाळून मोहिनी ने हे कृत्य करायचे ठरवले. या साठी 5 लाख रुपये हे अक्षय जावळकर यानेच इतर आरोपींना दिले. मात्र, संपूर्ण कटामध्ये मोहिनी वाघचा सहभाग होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांनी एबीपी माझाला माहिती दिली आहे. (Satish Wagh Murder Case)
नेमकं काय म्हणालेत शैलेश बलकवडे?
सतीश वाघ यांचं पहाटेच्या सुमारास चालण्यासाठी गेल्यानंतर त्यांचं अपहरण करण्यात आलं होतं, त्यानंतर त्यांची हत्या करून त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटात फेकण्यात आला. या प्रकरणातील चार जणांना पहिल्याच दिवशी अटक करण्यात आली होती. पुन्हा एका फरार आरोपीला उस्मानाबाद मधून अटक करण्यात आली होती, त्यांची चौकशी करण्यात आली, त्यानंतर बरेचसे पुरावे पहिल्या दहा दिवसांमध्ये पोलिसांनी गोळा केले होते. त्याच्या अनुषंगाने सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ यांचा तपास पोलिसांनी केला. त्यांना चौकशीवेळी काही प्रश्न विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी त्यांचा गुन्हा कबुल केला आहे. या प्रकरणामागची तीन कारणे समोर आली आहेत. मोहिनी वाघ यांना त्यांच्या पतीकडून होणार त्रास, त्याचबरोबर मारहाण, आर्थिक व्यावहार त्यांच्या हातात यावे अशी त्यांची इच्छा होती.तिसरं कारण अक्षय जावळकर आहे, त्यासोबत मोहिनी वाघचे संबंध होते, अतिरिक्त पुरावे गोळा करण्याचे काम पोलिस सध्या करत आहेत, अशी माहिती देखील पोलिसांकडून देण्यात आली आहे. (Satish Wagh Murder Case)
आरोपीची आणि मोहिनी वाघ यांची ओळख कशी झाली
आरोपी अक्षय जावळकर हा जवळपास पंधरा वर्षे भाडेकरू म्हणून राहत होता. तो आई-वडिलांसोबत त्यांच्याकडे भाडेकरू म्हणून राहत होता. 2001 ते 2016 या दरम्यान अक्षय आणि त्यांचा परिवार हा सतीश वाघ यांच्याकडे भाड्याने राहत होते. 2016 नंतर त्यांनी घर सोडलं, त्यानंतर त्यांनी जवळपास दुसरीकडे भाड्याने घर घेतलं, तरी देखील त्यांच्यात संवाद होता, अशी माहिती आहे. तर पाच लाखांपैकी काही रक्कम ही आधीच देण्यात आली होती. ही रक्कम जावळकरने दिली आहे. मोहिनी वाघने ही रक्कम दिली आहे का असा तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. आत्तापर्यंत सहा आरोपींना अटक झाली आहे. आणखी आरोपींची समावेश असण्याची शक्यता कमी आहे, मात्र त्याचाही तपास सुरू आहे.
अक्षय जावळकर कोण आहे?
अक्षय जावळकर हा सतीश वाघ (Satish Wagh Murder Case) हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी आहे. 32 वर्षीय अक्षय जावळकरचे सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी यांच्यांशी संबंध होते. पोलिसांच्या माहितीनुसार 8 वर्षांपासून अक्षय आणि मोहिनी यांचं लव्ह अफेअर होतं, अक्षयचं कुटुंब 2001 पासून सतीश वाघ यांच्याकडे भाडेकरु म्हणून राहत होतं. अक्षय हा जावळकर कुटुंबाचा एकुलता एक मुलगा आहे. आई,वडील आणि अक्षय तिघे जण सतीश वाघ यांच्याकडे भाडेकरु होते. अक्षयच्या वडिलांचा भेळचा, वडापावचा गाडा आहे, तिथेच अक्षयही काम करतो. अक्षय आणि मोहिनी यांच्या प्रेमसंबंधाबाबत सतीश वाघ यांना 8 वर्षांपूर्वी कुणकुण लागली. त्यानंतर अक्षयच्या कुटुंबाने सतीश वाघ यांची खोली सोडून दुसरीकडे राहायला गेले. मात्र, अक्षयचं वाघ यांच्या घरी येणे-जाणे सुरुच होतं. सतीश वाघ यांचा मुलगा आणि अक्षय हे मित्र होते, अशी माहिती आहे.(Satish Wagh Murder Case)