एक्स्प्लोर

Satish Wagh Case : 48 वर्षांच्या मोहिनी वाघ यांचं 32 वर्षांच्या इंजिनिअरसोबत अफेअर, भाड्याच्या खोलीत अनैतिक संबंधांना अंकुर फुटला

Satish Wagh Murder Case : सतीश वाघ आणि मोहिनी वाघ यांच्या मुलाच्या मित्रासोबत मोहिनी वाघचे असलेल्या अनैतिक संबंधातून पती सतीश वाघ यांची हत्या घडवून आणल्याचं उघड झालं आहे.

Satish Wagh Murder Case :  पुण्यातील भाजपचे आमदार योगेश टिळेकर (MLA Yogesh Tilekar) यांचे मामा सतीश वाघ (Satish Wagh Murder Case) यांचं काही नऊ डिसेंबरला अपहरण करुन निर्घृण हत्या करण्यात आली होती. शिवाय हत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटात फेकून देण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू होता. काहींना अटक देखील करण्यात आली होती. काल (बुधवारी) पोलीस तपासात (Pune Crime) सर्वात मोठा खुलासा समोर आला. शेजाऱ्यासोबत असलेल्या प्रेम संबंधात अडसर ठरत असलेल्या नवऱ्याची सुपारी देऊन पत्नीनेच काटा काढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हॉटेल व्यावसायिक सतीश वाघ (Satish Wagh Murder Case)  यांची त्यांच्या पत्नीनेच पैसे देऊन हत्या करायला लावली आहे. मोहिनी वाघ (Mohini Wagh) असं या प्रकरणातील आरोपी पत्नीचे नाव आहे. दरम्यान ही हत्या प्रेमसंबंधातून झाल्याची धक्कादायक माहिती आहे. 

48 वर्षांच्या मोहिनी वाघ यांचं 32 वर्षांच्या इंजिनिअरसोबत अफेअर

सतीश वाघ आणि मोहिनी वाघ यांच्या मुलाच्या मित्रासोबत मोहिनी वाघचे असलेल्या अनैतिक संबंधातून पती सतीश वाघ यांची हत्या घडवून आणल्याचं उघड झालं आहे. भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा सतीश वाघ यांची नऊ डिसेंबरला अपहरण करून हत्या करण्यात आली होती. मात्र, सतीश वाघ यांची हत्या पैशांसाठी करण्यात आलेल्या अपहरणातून नाही तर अनैतिक संबंधांतून झाल्याचं समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. पुणे पोलिसांनी सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ हीला काल (बुधवारी) अटक केली आहे. मोहिनी वाघचे वय सध्या 48 वर्षे असून तिचा प्रियकर अक्षय जावळकर हा 32 वर्षांचा आहे. अक्षय जावळकर हा मोहिनी वाघाच्या मुलाचा मित्र होता. मुलाच्या वयाचा असलेल्या अक्षय आणि मोहिनीचे अनैतिक संबंध असतील अशी शंका सुरुवातीला कोणाला आली नाही. मात्र, सतीश वाघ यांना हे समजताच मोहिनी-सतीश आणि अक्षय यांच्यामध्ये वाद सुरु झाले होते.अनेक वर्षे त्यांच्यातील वाद धुमसत होता आणि त्यातून सतीश वाघ त्यांची हत्या झाल्याची माहिती आहे.

अक्षय हरीश जावळकर हा सतीश वाघ यांचा पूर्वीचा भाडेकरू

सतीश तात्याबा वाघ यांच्याकडे आरोपी अक्षय हरीश जावळकर हा सतीश वाघ यांच्याकडे पूर्वी भाडेकरू म्हणून राहत होता. त्या वेळी मोहिनीसोबत त्याचे प्रेमसंबंध निर्माण झाले. यासंबधीची कुणकुण सतीश वाघ यांना लागल्यामुळे त्यांच्या पत्नीकडूनच खुनाची सुपारी देऊन नवऱ्याचा काटा काढण्याचा डाव आखला. मोहिनी वाघने अक्षयला नवरा सतीश यांचा खून करण्यास सांगितले. त्यासाठी पाच लाख रुपये देण्याची तयारी दाखवली. त्यापैकी दीड लाख रुपये तिने अक्षयकडे दिले होते. त्यानंतर अक्षयने चार महिन्यांपूर्वी सतीश यांना मारण्यासाठी पवनला सुपारी दिली होती. त्यानंतर पवनने त्याचा साथीदार नवनाथ आणि विकासला आपल्यासोबत सहभागी करून घेतले.अक्षयने आरोपींना दीड लाखाची रक्कम दिली असल्याची माहिती समोर आली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हे 9 डिसेंबरला सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉकवा गेले असताना पाच जणांनी त्यांचे अपहरण करून अवघ्या 15 मिनिटांमध्ये गाडीतच वाघ यांच्यावर 72 वेळा वार करून त्यांचा निर्घृण खून केला. तासाभरात या सर्व गोष्टी घडल्या त्यानंतर त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटात फेकून दिला. गुन्हे शाखेने त्यांचं अपहरण झालेल्या ठिकाणाहून परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींना अटक केली.पोलिसांना सतीश वाघ यांच्या पत्नीचा गुन्ह्यात सहभाग असल्याच्या निष्कर्षापर्यंत पोहोचले, तिला आता पोलिसांनी अटक केली आहे.  (Satish Wagh Murder Case)

आणखी वाचा - Satish Wagh: सतीश वाघ प्रकरणात बायकोच मास्टरमाईंड; पैसे अन् व्यवहारासाठी घरची कारभारीण जीवावर उठली, आधी फक्त हल्ला करण्याची मागणी पण नंतर....

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9PM TOP Headlines 09 PM 20 January 2025Pankaja Munde on Beed Guardian Minister | बीडचं पालकमंत्रिपद दिलं असतं तर आनंद झाला असता-पंकजा मुंडेZero Hour Jitendra Awhad : धनंजय मुंडेंबाबत जितेंद्र आव्हाडांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 08 PM 20 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Embed widget