एक्स्प्लोर

Russia Ukraine War: युरोपियन देशात भारतातील गुलाबाला मोठी मागणी, यंदा उलाढाल 40  कोटींच्या घरात पोहचण्याचा अंदाज

Russia Ukraine War: रशिया-युक्रेनच्या युध्दामुळं पुण्याच्या मावळमधील मुकुंद ठाकरेंना कमालीचा फायदा झाला आहे. मुकुंद ठाकरेंच्या गुलाबाला परदेशातून मोठी मागणी आहे.

पिंपरी-चिंचवड: शिया-युक्रेनच्या युध्दामुळं (Russia Ukraine War) भल्याभल्यांचं कंबरडं मोडलेलं असताना भारतातील गुलाब उत्पादक शेतकरी मात्र मालामाल होणार आहे. म्हणूनच हा गुलाब (Rose) उत्पादक शेतकरी यंदाच्या उत्पादनात मोठी वाढ करण्यासाठी कंबर कसत आहेत. गेल्या वर्षी व्हॅलेंटाईन डेसाठी भारतातून 21 कोटींची निर्यात झाली होती. यंदा त्यात दुप्पटीने वाढ करण्यासाठी शेतकऱ्यांनी चंग बांधलाय. पण रशिया-युक्रेनच्या युद्धाचा लाभ गुलाब उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. 

रशिया-युक्रेनच्या युद्धाचा लाभ कसा काय होणार? 

रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळं (Russia Ukraine War)  महागाईचा भडका (Inflation) उडाला. भारतातील भल्याभल्यांचं तर कंबरडं मोडलंच, सोबतच प्रत्येक व्यक्तीला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आजही याची झळ सोसावी लागत आहे. पण रशिया-युक्रेनच्या युध्दामुळं पुण्याच्या मावळमधील मुकुंद ठाकरेंना कमालीचा फायदा झाला आहे. मुकुंद ठाकरेंच्या  गुलाबाला परदेशातून मोठी मागणी आहे. म्हणूनच गेल्या वर्षी ज्या पंधरा एकरमधून त्यांनी दहा लाख गुलाबाचं उत्पादन घेतलं होतं त्याच क्षेत्रात यंदा त्यांनी सोळा लाख गुलाबाच्या उत्पादनाचं नियोजन आखलंय. 

भारतात मोठ्या प्रमाणात गुलाब उत्पादन  हे अशा पद्धतीने पॉलिहाऊसमध्ये (Pollyhouse)  घेतलं जाते. तसं युरोपियन देशात हेच गुलाब उत्पादन ग्लासहाऊसमध्ये (GlassHouse)  घेतलं जातं. कारण तिथं मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी (Snow Fall)  होते. बर्फवृष्टी झाली की तिथलं वातावरण बिघडते. या वातावरणाचा समतोल राखण्यासाठी जनरेटरचा वापर केला जातो. परंतु रशिया युक्रेनच्या युध्दामुळं तेलाच्या किंमती गगनाला भिडल्यात. त्यामुळं गुलाब उत्पादनाचा खर्च आवाक्याबाहेर गेला. परिणामी यंदा युरोपियन देशातील शेतकऱ्यांनी गुलाब उत्पादन घेतलेलं नाही. त्यामुळंच भारताच्या गुलाबाला मोठी मागणी वाढली आहे. मावळ तालुक्यातील सव्वा दोनशे हेक्टर क्षेत्रावर गुलाब फुल बहरतो. म्हणूनच देशातील गुलाब फुलाच्या उत्पादनात मावळ तालुक्याचा पन्नास टक्के वाटा असतो. 

भारतातील जवळपास बाराशे एकर क्षेत्रावरील गुलाब उत्पादनातून गेल्या वर्षी फक्त व्हॅलेंटाईन-डेसाठी (Valentine Day) 21 कोटींची निर्यात झाली होती. पण यंदा वाढलेली मागणी पाहता यंदाच्या व्हॅलेंटाईन-डे वेळी तब्बल 40 कोटींच्या निर्यातीचा अंदाज आहे.  युरोपियन देशाला गुलाब फुलांचं आगार म्हटलं जातं. पण रशिया-युक्रेन युद्ध अन् त्यामुळं महागलेल्या तेलांमुळं तिथलं यंदाचं गुलाब उत्पादन थांबलं. यातूनच भारतीय गुलाब उत्पादकांना मिळालेल्या संधीचं ते सोनं करतायेत अन् मालामाल होत आहेत. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

Nashik Cold : बेक्कार थंडी! नाशिककरांसह गुलाबाची शेतीही गारठली, आजच तापमान 9.5 अंशावर  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget