एक्स्प्लोर

Rohit Pawar : तरुणांच्या प्रश्नासाठी रोहित पवार सरसावले; युवा संघर्ष यात्रेला सुरुवात; प्रमुख मागण्या कोणत्या?

Rohit Pawar Yuva Sangharsh Yatra : आमदार रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रेला सुरुवात केली आहे. पुण्यातून या यात्रेला सुरुवात होणार असून नागपूरला या यात्रेची सांगता होणार आहे. या यात्रेच्या प्रमुख मागण्या कोणत्या आहेत पाहुयात...

पुणे : आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी युवा संघर्ष यात्रेला (Yuva Sangharsha Yatra) सुरुवात केली आहे. पुण्यातून (Pune) या यात्रेला सुरुवात होणार असून नागपूर (Nagpur) ला या यात्रेची सांगता होणार आहे. पुण्यात महात्मा फुले वाड्यात (Mahatma Phule Wada) सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंना अभिवादन करुन रोहित पवारांच्या संघर्ष यात्रेला सुरुवात होणार आहे. तरुणांच्या विविध मागण्यासाठी ही संघर्ष यात्रा असणार आहे आणि या यात्रेत तरुणांचा मोठा सहभागदेखील असणार आहे. ज्या जिल्ह्यात ही यात्रा जाणार आहे, त्या जिल्ह्यातील तरुणांना या यात्रेत सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या यात्रेच्या प्रमुख मागण्या कोणत्या आहेत पाहुयात...

युवा संघर्ष यात्रा कशासाठी..?

- कंत्राटी नोकरभरती रद्द करण्यासाठी.
- 2 लाख 50 हजार उमेदवारांची रखडलेली भरती प्रक्रिया तात्काळ सुरु करण्यात यावी, या मागणीसाठी.
- अवाजवी परीक्षा शुल्क रद्द करण्यासाठी.
- जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, या मागणीसाठी.
- सक्षम आणि कार्यक्षम आरोग्य व्यवस्था उभी करण्यात यावी, या मागणीसाठी.
- क्रीडा विभागाचं सक्षमीकरण व्हावे, या मागणीसाठी.
- होतकरू खेळाडूंना संधी मिळावी, या मागणीसाठी. 
- पेपरफुटी विरोधात कायदा यासाठी.
- शाळा दत्तक योजना रद्द करण्यासाठी.
- बेरोजगार युवांच्या शैक्षणिक कर्जावरील व्याज माफी मिळावी यासाठी
- नोकरदार महिला आणि विद्यार्थिनींसाठी वसतिगृहे मिळावी यासाठी. 
- समुह शाळा योजना रद्द करण्यासाठी.
- रखडलेल्या नियुक्त्या त्वरित देण्यात याव्यात यासाठी
- महिला सुरक्षेसाठी शक्ती कायदा आणण्यासाठी.
- सारथी, बार्टी, महाज्योती आणि TRTI संस्थाचे सक्षमीकरण होण्यासाठी.
- नोकर भरतीतील भ्रष्टाचार रोखण्यात यावा, या मागणीसाठी.
- TRTI संस्थेसाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद मिळालीच पाहिजे.
- सर्व भरती प्रक्रिया MPSC मार्फत करण्यात यावी या मागणीसाठी.
- प्रयोगशील युवा शेतकऱ्यांसाठी विशेष योजना असावी या मागणीसाठी.
- शिक्षकांची रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत या मागणीसाठी.
- असंघटीत क्षेत्रातील युवांसाठी Reskilling, Up Skilling देण्यात यावे, या मागणीसाठी.
- युवा आयोगाची स्थापना करण्यात यावी, या मागणीसाठी.
- विद्यार्थ्यांसाठी जिल्हानिहाय अद्ययावत वसतिगृह मिळालेच पाहिजे.
- महिलांची सायबर सुरक्षा सक्षमपणे राबिविण्यासाठी.
- तालुका स्तरावर MIDC ची स्थापना आणि अस्तित्वात असणाऱ्या MIDC च्या सक्षमीकरणासाठी,
- अमरावती या Two Tier शहरांमध्ये IT क्षेत्राच्या विकासासाठी धोरण आणण्यात यावे या मागणीसाठी.
- ड्रग्जच्या विळख्यात सापडलेली तरुणाईला वाचविण्यासाठी.

कसा असेल युवा संघर्ष यात्रेचा प्रवास?

पुणे ते नागपूर असा हा 800 किलोमीटरचा प्रवास असणार आहे एकूण 45 दिवसांचा प्रवास असून पुण्यातील तुळापूर येथून या यात्रेला सुरुवात होऊन काष्टी, कर्जत, पाटोदा, बीड, जातेगाव, पिंपळगाव, कुंभार, परतुर, जिंतूर, सेनगाव, वनोजा, वाशिम, कारंजा, पापळ, पुलगाव, सेवाग्राम, बाजार गाव, नागपूर येथे या युवा संघर्ष यात्रेचा समारोप 7 डिसेंबर रोजी होणार आहे.

महत्वाच्या इतर बातम्या :

रोहित पवारांची आजपासून संघर्ष यात्रा, सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंना अभिवादन करून संघर्ष यात्रा सुरू

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vikas Thakre : आमची स्वबळावर लढण्याची तयारी पूर्ण : काँग्रेस आमदार विकास ठाकरेAnjali Damania on Dhananjay Munde :मुंडेंच्या विरोधात पुरावे सादर केलेत;अजितदादा म्हणालेत,निर्णय घेऊJob Majha : जॉब माझा : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड येथे विविध पदांसाठी नोकरीच्या संधी :  ABP MajhaGuardian Minister : नावं गायब करण्यात, तटकरेंचा हातखंड शिंदेंचे आमदार गोगावले,थोरवे,दळवींचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Bhandara : 62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Nashik Guardian Minister : एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
Embed widget