एक्स्प्लोर
डीएसकेंचा धडा अभ्यासक्रमातून वगळा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती यांना 17 फेब्रुवारी रोजी अटक केली होती.
मुंबई : बीकॉमच्या तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमातून डी एस कुलकर्णी यांच्यावरील धड वगळा, असा आदेश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिला आहे. विद्यापीठाने तसं परिपत्रकच जाहीर केलं आहे. याशिवाय बीकॉमच्या पहिल्या वर्षाच्या अभ्यासक्रमातून डॉ. प्र.चि.शेजवलकर यांचा लेख वगळण्याचा आदेशही देण्यात आला आहे.
गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती यांना 17 फेब्रुवारी रोजी अटक केली होती. सध्या ते येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहेत. त्यामुळे विद्यापीठाने त्यांचा धडा अभ्यासक्रमातून वगळण्याचा आदेश आहे.
परिपत्रकानुसार, टीवायबीकॉम अभ्यासक्रमातील बिझनेस इन्टरप्रिन्युअरशिप स्पेशल पेपर IIच्या बिझनेस इन्टरप्रिन्युअरशिप कोर्स कोड-306g या विषयातील प्रथम सत्रातील Unit No 3 मधील 'द स्टडी ऑफ ऑटोबायोग्राफिक ऑफ फॉलोईंग इन्टरप्रिन्युअर्समधील डी एस कुलकर्णी हा भाग शैक्षणिक वर्ष 2018-19 पासून अभ्यासक्रमातून वगळण्यात येत आहे.
तर एफवायबीकॉम अभ्यासक्रमाच्या मराठी विषयातील 'यशोगाथा' या पुस्तकातील डॉ. प्र.चि.शेजवलकर यांचा लेख क्र.11 वास्तूउद्योगातील अग्रणी (पान क्र 63 ते 67) शैक्षणिक वर्ष 2018-19 पासून वगळण्यात येत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
बातम्या
बातम्या
Advertisement